भारत जगाचे आशास्थान


भारत जगाचे आशास्थान झाल्याचे वारंवार सिद्ध होताना सध्या दिसत आहे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील  एल साल्वाडोर या देशाच्या  परराष्ट्रमंत्री श्रीमती अलेक्झांड्रा हिल टिनोको या भारत भेटीवर येऊन काही दिवस उलट नाहीत तोच त्याच भागातून दुसऱ्या देशाचं अर्थात गयाना या देशाचे उपराष्ट्रपती  डॉ. भरत जगदेव २० ते २५  फेब्रुवारी या दरम्यान  भारताच्या दौऱ्यासाठी आले होते  आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या आमंत्रणावरून त्यांनी हा दौरा केला

  डॉ. जगदेव 22-24 फेब्रुवारी 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे TERI (द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत सहभागीझाले होते आपल्या या दौऱ्यात गयानाच्या उप्राष्ट्र्पतींनी आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपले उपराष्ट्रपतीजगदीप धनखर 

आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंक , आपले पेट्रोलियम मंत्रीनरेंद्रसिंग तोमर  आदींशी   ट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कृषी, कृषी प्रक्रिया, शिक्षण, आरोग्यसेवा, क्षमता वाढ, आयसीटी, अक्षय ऊर्जा आणि हवामान बदल यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, परस्पर देशाचे शिक्षण , परस्पर संवाद याबाबतचे सहकार्य वाढवण्यासासाठी कारवायांच्या उपाय योजना  आदींवर चर्चा केली गयानाचे राष्ट्रपती डॉ. इरफान अली,जानेवारी 2023 मध्ये 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते त्या पार्श्वभूमिवर या दौऱ्याचा अभ्यास करायला हवा 

        गयाना हा ब्रिटिश राजवटीतून मे १९६६ मध्ये स्वतंत्र्य झळा तेव्हापासून भारताचे गायनाशी राजनीतिक केंद्र आहे त्याठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्या नावाने भारतिय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या केंद्राची स्थापनइंदिरा गांधींच्या कार्यकाळात झाली भारताच्या  पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६८ मध्ये गयानाला भेट दिली होती, भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती दिवंगत डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी १९८८ मध्ये गयानाला भेट दिली होती आणि भारताचेउपराष्ट्रपती श्री भैरोसिंग शेखावत यांनी २००६ साली  गायनाचा दौरा केला होता भारत आणि गयाना एकमेकांना धोरणात्मक भागीदार म्हणून पाहतात आणि

परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर विचारांचे स्पष्ट अभिसरण असलेल्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सहकार्य करतात. गयानाने मात्र आर्थिक कारणांमुळे १९९० मध्ये भारतातील आपले मिशन बंद केले, परंतु २००४ मध्ये ते पुन्हा सुरू केले गायनाचे राष्ट्रप्रमुख आणि भारताचे पंतप्रधान हे या आधी वेगवेगळ्या आंतराष्ट्रीय पातळीवर भेटले आहेत या आधी  गयानाचे  Moses Nagamootoo यांनी पुद्दुचेरी येथे जागतिक तमिळ आर्थिक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी १२ ते १५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान भारताचा खाजगी दौरा केला. तत्पूर्वी, पंतप्रधान Moses Nagamootoo यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये खाजगी पक्षांच्या निमंत्रणावरून भारताला भेट दिली होती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?