ज्ञानभाषा मराठी!


फेब्रुवारी महिन्याचा शेवटून दुसरा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे जगजाहीर आहे. मराठीतील थोर कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या, या दिवशी समाजमाध्यमांमध्ये मराठीची थोरवी गाणाऱ्या, तीला अभिजात भाषेचा दर्जा का आवश्यक आहे ? तसेच मराठी कशी जगातील एक प्रमुख भाषा आहे, मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?   मराठी वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे. हे सांगणाऱ्याविविध पोस्ट आपण दरवर्षी  बघतो .आता मी मराठीतच बोलणार, लिहणार असा संकल्प देखील आपल्यापैकी अनेक जण या निमित्ताने करतात. मात्र दरवर्षी मराठीबाबत ठराविक गोष्टींचीच उजळणी होते,मात्र घोडे काही पुढे जात नाही, असो

    ब्रिटीश लोक तंत्रज्ञानात पुढे होते. ज्यामुळे त्यांनी भारतासह जगभरातील विविध सत्ताधिशांचा पराभव केला, आणि संख्येने कमी असून देखील ते तेथील सत्ताधीश झाले. सत्ताधिशांची भाषा म्हणून इंग्रजी जगभर पसरली, परीणामी आज ती जगातील एक सर्वत्र बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे. आपली मराठी नेमकी मार खाते ती इथेच. सर्वसामन्यांना समजेल अस्या मराठीत मोठ्या
प्रमाणावर ज्ञान उपलब्ध नाही. परीणामी ते सर्वसामान्य लोक वापरत नाहीत. तंत्रज्ञानाच्या अभावामुळे मराठी लोक जगात प्रभावी ठरत नाही. मराठी लोक प्रभावी ठरत नसल्याने त्यांची भाषा मराठी आपसुकच मागे पडते, आणि आपण मराठीसाठी दरवर्षी ठराविक मुद्देच घोळत राहतो.

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात ज्या भाषेत तंत्रज्ञान आहे, त्याच भाषेचा विकास होणार, हे जगजाहीर आहे, आणि या बाबत मराठीत प्रचंड अनास्था आहे. वाचलेले सहजतेने समजू शकते, अस्या मराठी भाषेत तंत्रज्ञानाची माहिती अच्युत गोडबोले यांच्या व्यतिरीक्त कोणी दिली आहे का ? याबाबत माहिती घेतल्यास समोर येणारे चित्र निराशाजनक आहे. रोजच्या व्यवहारात इंग्रजी शद्ब वापरले जात असताना संस्कृतप्रचूर शद्ब वापरून विषय समजून घेतल्याने काहीसी अडचण निर्माण होवू शकते. ती अडचण दाखवून त्यापुढचे व्यक्ती ती संकल्पना समजण्यासाठी इंग्रजीचाच आधार घेताना दिसते, त्यामुळे मराठीचा ज्ञानभाषा बनण्याचा मार्ग खुंटतो आज इंग्रजी समजण्यात येणाऱ्या अनेक संकल्पना जसे अल्फा, बीटा, लँमडा विविध ग्रहांची नावे ही लँटिन आहेत. मात्र ती इंग्रजीत सहजतेने स्विकरली त्याचे वरुण ग्रह, कुबेर ग्रह, हर्षल ग्रह असे नांमांतरण केले नाही. आपल्याकडे विज्ञानात संशोधन होण्याऐवजी भाषा संशोधन होते.  

           नाशिकच्या साहित्य संमेलनात अध्यक्ष डाँक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हाच मुद्दा आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडला होता. एखादी संकल्पना मराठीत सांगणे म्हणजे सर्वसामान्यांना समजेल अस्या भाषेत समजावून सांगणे यासाठी प्रसंगी इंग्रजी शद्बाचा आधार घेवून समजवावून सांगणे


होय नकी  त्या इंग्रजी संकल्पननेच संस्कृतप्रचूर मराठीत भाषांतर करणे नव्हे ,हे मराठीतील लोकांनी समजावून घेणे आवश्यक आहे. हे समजावून न घेतल्याने, आज ग्रामीण महाराष्ट्रातील इंग्रजीचा गंध नसलेली आणि शहरातील इंग्रजीचा स्पर्श असलेली युवा पिढी असी दरी  विज्ञानाबाबत निर्माण झाली आहे, ती वेगळीच .

                मी माझे जीमेल  मराठीत वापरतो. त्याठिकाणी inbox हा शद्ब इनबाँक्स असा लिहलेला असतो, outbox हा शद्ब आउट बाँक्स असा लिहलेला असतो  . त्यांचे संदेशपेटी,  बाह्यपेटी असे नामकरण केलेले नसते. ही बाब लक्षात घेणे आवश्यक असते. या संस्कृतप्रचूर मराठीची थट्टा करणारे अनेक विनोद आपण अनेकदा वाचतो(किमान मी तरी खुपदा वाचले आहेत) आपण त्या समस्येवर हासतो मात्र ती दुर करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही.मराठीतील हे संस्कृत प्रचरण थांबवून प्रसंगी इंग्रजी भाषेचा आधार घेत मराठी ज्ञानभाषा बनवणे हेच मराठीचा विकास करण्यासाठी आवश्यक आहे, असे मला वाटते.

 आँक्सफर्ड विद्यापीठ दरवर्षी इंग्रजी भाषेत दाखल झालेले मुळचे इंग्रजीत्तेर शद्बांची यादी प्रसिद्ध करते.जर इंग्रजी भाषिक इतर भाषेतील शद्ब सहजतेने स्विकारते, तसेच आपण करायला हरकत काय आहे.

    तसेच एखादी भाषा शिकणे आणि एखाद्या भाषेच्या माध्यमातून शिकणे यात खुप फरक आहे. इंग्रजी सध्याचा काळात आवश्यक आहे, यात दुमत नाही. मात्र याचा अर्थ इंग्रजी माध्यमातून शिकणे,

असा नव्हे. मराठी माध्यमातून शिकूनसुद्धा इंग्रजी भाषा उत्तम करता येते, ही बाब सध्याचा पालकांना समजणे आवश्यक आहे. जर हे समजले तर   आणि तरच मराठी भाषा  विकसित होईल अन्यथा नाही हे   लक्षात घेयला हवे

      याबाबत मी माझा ऐक अनुभव सांगू इच्छितो, मी काही वर्षापूर्वी  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम. बि. ए. केले. माझी पार्श्वभुमी काँमर्सची नसल्याने तयारी करणे सोईचे व्हावे, यासाठी अकरावी आणि बारावीची काँमर्सची पुस्तके आणली.  मातृभाषेतून शिकल्यास विषय उत्तम समजतो, या गृहीतकानुसार त्यांची भाषा मराठी होती.मात्र त्यात वापरलेल्या संकल्पना आणि प्रत्यक्षात वापरत असलेल्या संकल्पना यांचा मेळच बसेना त्यामुळे इंग्रजी पुस्तकातूनच त्या संकल्पना समजावून घ्यावा लागल्या.जो माझा अनुभव असेल तोच इतरांचा देखील असणारच.या सारख्या अनुभवामुळे बहुतेक सर्वच जण तांत्रीक संकल्पना समजण्यासाठी इंग्रजीचा वापर करतात परीणामी मराठी काहीसी मागे पडते, असे मला वाटते.

      एखादा विषय मराठीतून सांगणे म्हणजे, कित्येकदा उच्चारण्यास कठीण संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या भाषेतील शद्ब मुळच्या इंग्रजी भाषेतील शद्बांना प्रतीशद्ब म्हणून देणे नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. तर मुळचे इंग्रजी शद्ब कायम ठेवून त्यातील आशय लोकांना सवय झालेल्या

मराठीत मांडण्यांची गरज आहे. याबाबत अच्युत गोडबोले यांची विविध तांत्रीक संकल्पना स्पष्ट करणारी पुस्तके रोल माँडेल म्हणून घेता येतील.ज्यामध्ये इंग्रजी शद्ब तसेच ठेवून मराठीत त्याचे स्पष्टीकरण दिलेले असते.

आज सर्वत्र इंग्रजीचा वापर होत असला तरी, आजदेखील मोठ्या प्रमाणात लोक फक्त मराठीचा वापर करतात. त्यांना इंग्रजी भाषेची हुकुमत नसते, आणि संस्कृतचा प्रभाव असणाऱ्या मराठीमुळे त्यांना विषय समजण्यास त्रास होतो.आंतीमतः त्यांचा तो विषय कमकुवत राहतो. आज 2022मध्ये देखील अस्या लोकांची संख्या मोठी आहे. परीणामी एक मोठा वर्ग ज्ञानापासून दुर जात आहे. ज्याचा शेवट मराठी ज्ञानभाषा न होण्यात होत आहे. लेखाच्या

 

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या ज्ञानापासून दुर जाणाऱ्या लोकांमुळे जगात मराठी लोक प्रभावी ठरत नाही. परीणामी मराठी भाषेचे प्रश्न कायम राहतात.

माझा अनुभव असा आहे की, काही एटीममध्ये भाषा आँप्शनमध्ये मराठी हा पर्याय निवडल्यास फारसा प्रोग्राम नसल्याने ट्राझीशन कँन्सल करत इंग्रजीचा वापरच करावा लागतो. हे चित्र बदलायला हवेच .मात्र सर्वत्र वाइटच स्थिती आहे,असे नाही.मी  गेल्या कित्येक वर्षांपासून  फेसबुक ट्टिटर,व्हाँटसप , कु अँप , इमेल अँड्रेस, मोबाईल मराठीत वापरत आहे. काहीही अडचण येत नाही. एखादी गोष्ट अनेक लोकांनी वापरल्यास त्यात झपाट्याने सुधारणा होतात, हा जगाचा नियम आहे माझी काँपी केल्यास मराठीचा उत्कर्ष होणारच!  ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असे मानण्यात काही गैर नाही.कोणतीही नविन गोष्ट करण्यासाठी सुरवातीला अडचण येतेच(आठवा न्युटनचा पहिला नियम)मात्र काही वेळाने तीचा सराव होवून जातो.

माझ्या मते कोणत्याही भाषेत सध्या टिकायचे असल्यास तिच्यातील साहित्य परंपरा, तीचे प्राचीनत्व यापेक्षा ती किती तंत्रज्ञानस्नेही आहे, यालाच महत्त्व आहे. आज मराठीत अनेक ब्लॉग आहे, अनेकजण फेसबुकवर देवनागरी मराठीत लिहीतात.त्यामुळे पुर्वीप्रमाणे त्याबाबत समस्या नाही. मात्र तंत्रज्ञानस्नेही मराठी याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काहीही होत नाही.हे चित्र बदलायलाच हवे. नाही म्हणायला आँनलाइन साहित्याबाबत एक स्वतंत्र  साहित्य संमेलन होते.मात्र त्या साहित्याचा समावेश अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केल्यास सोन्याहुन पिवळे असेच म्हणावे लागेल.ते तसे होण्याची इच्छा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना होवो ही इश्वरचरणी प्रार्थना

मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?