ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर

     

आपण जगाच्या नकाश्यावर नजर टाकल्यास आपणास इंडोनेशिया या  देशांनंतर  असंख्य बेटे दिसतात ती पार ऑस्टेलिया या देशाला वळसा घालत पॅसिफिक महासागरात विसावलेली दिसतात या प्रदेश्याला  सर्वसाधारणपणे ओशियाना ही  संज्ञा वापरतात . ऑस्टेलिया ,न्यूझीलंड पपूया न्यू गिनी फिलिपाइनास , टोंगो आदी सुमारे १५ लहान मोठे देश या प्रदेशात आहे हे सांगायचे कारण म्हणजे गेल्या २०२२ वर्षात प्रामुख्याने मध्यपूवेर्तील देश [ या मध्यपूवेर्तील काही देशांचा समूह म्हणजे आखाती देश होय .संपूर्ण मध्यपूर्व देशांना आखाती देश म्हणत नाहीत (इराणच्या आखाताशी ज्याच्या समुद्र किनारा आहे असे इराण इराक सौदी अरेबिया कतार कुवेत यु ए इ आदी देशांनाच आखाती देश म्हणतात )या आखाती देशांखेरीज येमेन सारखे काही देशांना एकत्रितपणे मध्यपूर्व देश म्हणतात ] आणि आग्नेय आशियातील देशांचा यशस्वी दौरा केल्यानंतर या वर्षे फेब्रुवारी महिन्यात आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस (सुब्रह्मण्यम ) जयशंकर या ओशियाना भागातील देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे ओशियानामध्ये गुंजतो भारताचा स्वर असे म्हटल्यास वावगे ठरू नये 
         परराष्ट्र मंत्री  डॉ. एस. जयशंकर १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान फिजी देशातील नाडी, येथे भारत आणि फिजी सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या जागतिक हिंदी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी फिजीला भेट देतील. पराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच  फिजी भेट असेल. डिसेंबर 2022 मध्ये फिजीमध्ये नवीन सरकार स्थापन झाले या नवीन सरकारबरोबर अनेक विषयांवर करार देखील  यावेळी करण्यात येतील गेल्याच आठवड्यात ५ ते १० फेब्रुवारी या दरम्यान  फिजीचे  उपपंतप्रधान प्रा. बिमन प्रसाद यांनी भारताला दिलेल्या पहिल्या उच्चस्तरीय
भेटीनंतर ही भेट होत आहे हे आपण या भेटीचे परिणाम अभ्यासताना लक्षात घेयला हवे फिजीचा दौरा आटोपल्यावर आपले परराष्ट्रमंत्री तेथूनच ऑस्टेलियाचा दौऱ्यावर जातील थिटे पाले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर १८ फेब्रुवारी रोजी सिडनी, शहारला भेट देतील  फेब्रुवारी२०२२  मध्ये डॉ एस जयशंकर यांनी परराष्ट्रमंत्री या नात्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा भेट दिली तेव्हापासून ही त्यांची तिसरी ऑस्ट्रेलिया भेट असेल. सिडनीमध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वासोबत बैठका घेणार आहेत.  या बैठकांबरोबरच परराष्ट्र मंत्री यावेळी प्रथमच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या रायसिना@सिडनी परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.
          जानेवारीला शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याचा विचार करता फिजीचे उपपंतप्रधान  प्रा. बिमन प्रसाद ,न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्रीश्रीमती  नानया माहुता आणि एल स्लावाडोर च्या परराष्ट्र मंत्री अलेक्झांड्रा हिल टिनोको,यांनी भारताचे दौरे केले होते या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचा विचार करणे अधिक सयुक्तिक ठरेल या सर्व दौऱ्याच्या एकत्रित अभ्यास आपण  इंदोरसंस्थानांचे राजकवी भा .रा तांबे यांच्या मावळत्या दिनकरा या कवितेतील असतील शिते जमतील भुते या काव्यपंक्तीच्या अनुषंगाने केल्यास भारताचे जागतिक राजकारणातील दिवसोंदिवस अढळ होणारे स्थान लक्षात येते जे आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?