हमारे पास ८० है !


     ज्येष्ठ सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एक डॉयलॉग प्रसिद्ध आहे "मेरे पस मा है " हाच डायलॉग भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राबाबत म्हणायचं झाल्यास हमारे  ८० है ,तुम्हारे पास  कितने है असा म्हणावा लागेल ,कारण भारताला नुकताच ऐंशीवा ग्रँडमास्टर मिळाला आहे चेन्नई येथील रहिवाशी असलेले आणि दक्षिण रेल्वेत कार्यरत असणारे विग्नेश एन आर हे भारताचे ८० वे ग्रँडमास्टर ठरले आहेत .त्यांनी  जर्मनी देशात सुरु असलेल्या २४ व्या नॉर्द वेस्ट कप २०२३या स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनीचे इंटरनॅशनल मास्टर असलेल्या Ilja Schneider यांना पराभवाचा धक्का देत ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५०० इलो रेटिंगचा टप्पा यशस्वीरीत्या पार करत भारताच्या ग्रँडमास्टरच्या संख्येत एकाची वाढ केली  . विशेष आनंदची बाब म्हणजे भारताचे ५९ वे ग्रँडमास्टर विशाख नारायण राजेश्वरी यांचे ते बंधू आहे . विंगेश आर एन आणि विशाख नारायण राजेश्वरी हि भारतातील ग्रँमडमास्तर मिळणारी पहिली भावांची जोडी आहे  विशाख नारायण राजेश्वरी  यांनी २०१९ मध्ये ग्रँडमास्टर हा 'किताब आपल्या झोळीत टाकला होता त्यांनतर ४ वर्षांनी त्यांच्या भावाने हा किताब मिळवला आहे .

  २०१५साली वयाच्या १७ व्यावर्षी त्यांनी कतार मास्टर २०१५ या स्पर्धेत सहाव्या फेरीखरीसच त्यांनी अनेक ग्रँडमास्तरविरुद्ध सफाईदार खेळाचे प्रदर्शन करत त्यांनी ग्रँडमास्तरपदासाठी आवश्यक असणारा पहिला निकष पूर्ण केला त्यांना इंटरनॅशनल मास्टर हा 'किताब मिळवल्यावर काही महिन्यातच त्यांनी ग्रँडमास्तरचा पहिला निकष पूर्ण केला होता हे विशेष .त्यांनी दुसरा निकष ऑगस्ट २०१७ मध्ये अबुधाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या अबुधाबी मास्टर या स्पर्धेत प्राप्त केला याही वेळेस त्यांनी काही ग्रँडमास्टर खेळाडूंवर रोमहर्षक विजय
संपादित केले. त्यानंतर तिसरा निकष त्यांनी तिसरा आणि अंतिम निकष २०१८ साली झालेल्या पहिल्या गुजरात ओपन या स्पर्धेत मिळवला त्यानंतर त्यांचे ग्रँडमास्टर होणे हि निव्वल एक औपचारिकता होती ती त्यांनी  ४ व्या नॉर्द वेस्ट कप २०२३ या स्पर्धेत पूर्ण केली त्यामुळे ते भारताचे ८० वे तर तामिळनाडू या राज्याचे २९ वे ग्रँडमास्टर झाले आहेत . (स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारताच्या ग्रँडमास्टर खेळाडूंची नवे देऊन हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या प्रश्नाची तयारी करणे योग्य ठरेल )
    आपल्याकडे अनेकदा वैयक्तिक खेळ म्हंटल्यावर भालाफेक गोळाफेक टेनिस आदी मैदानी खेळच गृहीत धरले जातात आणि बुद्धिबळासारखे खेळ दुर्लीक्षेले जातात मात्र या दुर्लक्षतेकडे कान डोळा करत आपले लक्ष खेळावर केंद्रित करत सध्या भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेगेल्या काही महिन्यात भारताची वाढलेली
ग्रँडमास्टरची संख्या याचेच प्रत्यंतर दर्शवत आहेत . गरज आहे ती त्यांचे कौतुक करून त्यांचा उच्छाह वृद्धिगत करण्याची


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?