भारताचा जगात वाढता डंका


 जगात भारताचा डंका सातत्याने वाढत असल्याचे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात  दोन देशांचे परराष्ट्रमंत्री आणि एका देशाचे उपपंतप्रधान नवी दिल्लीत अधिकृत दौऱ्यावर आले होते  येत्या काळाची भारत महासत्ता असल्याचेच यातून दिसत आहे

     तर मित्रानो . आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी त्यांच्या ऑक्टोबर २०२२ च्या न्यझीलंड दोऱ्याच्या वेळी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत न्यझीलंडच्या परराष्ट्र मंत्री श्रीमती ननया माहुता या फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान भारताच्या भेटीवर आल्या होत्या . न्यझीलंडच्या परराष्ट्र मंत्री माहुता परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यात त्यांनी दिल्ली आणि मुंबईला भेट दिली यावेळी त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ होते  न्यूझीलंड आणि भारताच्यापरराष्ट मंत्र्यांदरम्यान यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली या मुद्यामध्ये  आर्थिक सहकार्य, शैक्षणिक देवाणघेवाण, संरक्षण संबंध आणि लोकांशी संपर्क यासह द्विपक्षीय बाबींच्या संपूर्ण श्रेणीवर आदी विविध विषयांचा समावेश होता . या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली आणि नियमांवर आधारित, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकसाठी भारत आणि न्यूझीलंडच्या सामायिक दृष्टिकोनावर सविस्तर चर्चा केली यावेळी न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी  भारताच्या पुढाकाराने जागतिक स्तरावर आकारास येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) फ्रेमवर्क कराराच्या स्वाक्षरी

केलेल्या प्रती सुपूर्द केल्या जगात पेट्रोल डिझेल सारख्या जागतिक तापमानवाढीस साह्य करणाऱ्या जैविक इंधनाच्या ऐवजी पर्यावरणपूरक सौर ऊर्जेचा वापर जगाने अधिकाधिक करावा यासाठी भारताने पुढाकार घेऊन जागतिक मोहीम सुरु केली आहे जगातील विविध देश या मोहिमेचा याआधीच भाग झाले आहेत आता न्यूझीलंड या मोहिमेचा भाग झाला आहे

याच दरम्यान ते १० फेब्रुवारी दरम्यान पॅसिफिक महासागरातील एक बेत स्वरूपात अस्नणाऱ्या आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींची मोठी संख्या असलेल्या फिजी या देशाच्या उपप्रांतप्रधन असलेल्या बिमन चंद प्रसाद, यांनी भारताचा दौरा केला डिसेंबर २०२२ मध्ये श्री सिटिव्हनी राबुका.यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यावर फिजीच्या सरकारमधील कोणत्याही नेत्याने केलेला हा पहिलाच दौरा होता दिल्लीत, परराष्ट्र  मंत्री डॉ. एस. जयशंकर याची  फेब्रुवारी रोजी उपपंतप्रधान प्रसाद यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकझाली या बैठकीत  दो दोन्ही देशांच्या लोकांमध्ये असलेल्या जवळच्या संबंधाचा पुनरुच्चार करण्यात आला ज्यामध्येभारत आणि फिजी यांच्यातील सहकार्य आणि विकास भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली, ज्यात आरोग्य, शिक्षण आणि लोक-लोक संबंध यांचा समावेश आहे.याखेरीज बेंगळुरूमध्ये, फिजीचे उपपंतप्रधान प्रसाद यांनी पहिल्या इंडिया एनर्जी वीक (IEW) 2023 मध्ये हजेरी लावली.तसेच 3. परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांनी उपपंतप्रधान प्रसाद यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

याच दरम्यान पृथ्वी गोलावर भारताच्या पूर्णतः विरुद्ध १८० अंशावर असलेल्या दक्षिण अमेरिका खंडातील देश असलेल्या एल साल्वाडोर या देशाच्या  परराष्ट्रमंत्री श्रीमती अलेक्झांड्रा हिल टिनोको, या ते १३ फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी दिल्ली आग्रा जयपूर या शहरांना भेट दिल्या . त्यांच्या हा परराष्ट्र मंत्री म्हणून पहिलाच भारत दौरा होता . आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर  यांनी 10 फेब्रुवारी 2023 रोजी हैदराबाद हाऊस येथे भेट देणारे परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी  दोन्ही मंत्र्यांनी राजकीय आणि आर्थिक संबंधांसह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीवर चांगली चर्चा केली आणि आरोग्य-सेवा, सौर उपक्रम, क्षमता निर्माण, व्यापाराचा विस्तार आणि लोक-लोक संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्याचा निर्णय घेतला.तसेच  दोन्ही मंत्र्यांनी परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचार विनिमय केला. त्यांनी भारत-एसआयसीए संबंध मजबूत करण्यास सहमती दर्शवली. डॉ. जयशंकर यांनी २०२८ -२९  साठी UNSC च्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीसाठी एल साल्वाडोरच्या समर्थनाचे स्वागत केले.

एकंदरीत येत्या काळात भारत आगामी काळात महासत्ता होणार हेच या घडामोडीतून हेच या घडामोडीतून दिसून येत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?