भारत ऑस्ट्रेलिया मधुरतेकडून अधिक मधुरतेकडे


सध्या ऑस्टेलियाचे पंतप्रधान  अँथनी अल्बानीज चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत . या दौऱ्यात ते विविध विषयांवर भारताशी करार करत पूर्वी असणारे भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील मधुर संबंध अधिकच मधुर करतील .भारताचे माजी पंतप्रधान  पी व्ही नरसिंह यांनी सुरु केलेल्या लुक ईस्ट पॉलिसीचा पुढील टप्पा अर्थात ऍक्ट ईस्ट पॉलिसी  अंतर्गत भारत सध्या आपल्या पूर्वेकडील सदस्यांशीसंबंध वाढवण्यावर भर देत आहे त्या अंतर्गत या घडामोडी अभ्यासाव्या लागतील. या लुक ईस्ट पॉलिसीमधील घडामोडी बघितल्यास  गेल्या दीड ते दोन वर्षात भारताने पूर्वेकडील देशांमध्ये ऑस्टेलियाया या देशाशी संबंध वाढवण्यावर विशेष भर दिलेला दिसत आहे

   २०२१मध्ये ऑस्टेलियाने भारताला Talisman Sabre या युद्ध अभ्यासात सहभागी करावे असे सूतोवाच केले  . हा युद्ध अभ्यास ऑस्ट्रोलीया  आणि अमेरिकेकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात येतो . या युद्ध अभ्यासात जमिनीवरील आणि पाण्यावरील तसेच हवाई तिन्ही प्रकारच्या युद्धाभ्यास केला वाजतो ऑस्ट्रोलियाच्या ईशान्य दिशेला असणाऱ्या कोरल रिल्फ प्रदेशात आणि हवाई बेटांवर हा युद्धाभ्यास होतोयामध्ये

सहा ते सात देश सहभागी होत असतात दर दोन वर्षांनी हा युद्ध अभ्यास होतो 2021 सालचा युद्ध अअभ्यास झाल्यानंतर ऑस्ट्रलियाने हे  संकेत दिले तसेच भारताच्या प्राचीन शिल्पकला चित्रकला , धातुकाम याचा याच्या वारसा सांगणाऱ्या मात्र सुभाष कपूर या व्यक्तीकडून नैतिक अनैतिक मार्गाने ऑस्ट्रेलिया च्या राष्ट्रीय संग्रहात दाखल झालेल्या 14  कलाकृती ऑस्ट्रलियाने भारताला परत करण्याचे आश्वासन दिले

       त्यानंतर २०२२ या साली २१ मार्च रोजी ऑस्टेलियायाचे तत्कलीन पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत ऑस्टेलिया भारतात विविध गोष्टींसाठी एकत्रितरित्या १५०० करोड भारतीय रुपये  इतक्या रक्कमेची गुंतवणूक ऑस्ट्रेलिया करणार असल्याचे जाहीर केले या भारतीय चलनातील १५०० करोडच्या मदतीमध्ये सौर पॅनलइलेट्रीक कार , मोबाईल या सारख्या उपकरणाच्या निमिर्तीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या लिथियम सारख्या धातूच्या बाबत भारत सक्षम होण्यासाठी करावयाच्या संशोधनासाठी तसेच प्रदूषणविरहित ऊर्जा निर्मितीसाठी भारताची प्रगती होण्यासाठी १९३ करोड रुपयाची तरतूद समाविष्ट आहे याचवेळी   १३६ कोटी रुपये दोन्ही देशांनी एकत्रितरित्या राबवायच्या अवकाश संशोधनासाठी तर १५२ कोटी रुपये भारत ऑस्ट्रेलिया सहकार्य केंद्रासाठी राखीव ठेवण्यात येत आहे या सहकार्य केंद्रामार्फत परस्पर सांस्कृतिक आदानप्रदान , व्यापारी संबंध वाढवणे , तसेच शिष्यवृत्ती देणे ही कार्ये करण्यात येतील ९७ कोटी रुपये व्यापरात सहकार्य कोशल्य विकास आणि संशोधनासाठी राखून ठेवण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले

२०२२ याच वर्षी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान  जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे  रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले होते मागच्या महिन्यात २३ मे रोजी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता दौऱयावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियात पत्रकारांना संबोधित करताना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सयांनी सांगितले की , भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण संबंध वाढवण्यात मंत्री राजनाथ सिंग यांचा मोलाचा वाटा आहे आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा संरक्षण स्तंभ वाढवण्यासाठी मी 

त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”  भारत हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जवळच्या सुरक्षा भागीदारांपैकी एक आहे आणि भारत-पॅसिफिकमधील आमच्या भागीदारांसोबत ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिकदृष्ट्या सखोल संबंधांना पुनरुज्जीवित करण्यावर सरकारचा भर आहे. “हिंदो-पॅसिफिकमध्ये अनेक दशकांपासून शांतता आणि समृद्धी आणणाऱ्या नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेवर दबाव येत आहे, कारण आम्हाला भौगोलिक व्यवस्थेत बदल होत आहेत,”  कोणत्याही देशाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकारी मंत्री यांच्या वक्तव्यना गांभीर्यांनेच घेण्याचे असते आपल्या बोलण्याचे कोणतेही अनुचित अर्थ निघणार नाहीत यशासाठी या व्यक्ती कायमच काळजी घेत असतात त्या पार्श्वबभूमीवर आपण या वक्तव्याना अभ्यासायला हवे

गेल्याच महिन्यात २० फेब्रुवारीला आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे ऑस्टेलियाच्या दौऱ्यावर गेले होते तिथे त्यांनी सिडनी, शहारला भेट दिली  फेब्रुवारी२०२२  मध्ये डॉ एस जयशंकर यांनी परराष्ट्रमंत्री या नात्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा भेट दिली तेव्हापासून ही त्यांची तिसरी ऑस्ट्रेलिया भेट होती सिडनीमध्ये त्यांनी  ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वासोबत बैठका घेतल्या या बैठकांबरोबरच परराष्ट्र मंत्री यावेळी प्रथमच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या रायसिना@सिडनी परिषदेलाही उपस्थित राहिले होते

कोणत्याही दोन देशातील परराष्ट्र संबंध हि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे देशात कोणत्याही विचारसरणीचे सरकार आले तरी या प्रक्रियेत मोठा बदल होत नाही मागच्याच सरकारच्या कृतिकार्यक्रम त्यांना पुढे न्यावा लागतो या पार्श्वभूमीवर आपणास सध्या भारतात आलेल्या ऑस्टेलियाचे पंतप्रधान  अँथनी अल्बानीज यांच्या दौऱ्याचा अभ्यास करताना गेल्या आपणस गेल्या दोन वर्षातील वाटचाली माहिती असणे आवश्यक आहे त्या माहिती असल्यास आपणास सध्या होणारे करार अधिक उत्तमरीत्या समजू शकतात मी याच न्यायाने हि माहिती आपंनसमोर आणली आहे

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?