समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

       

  
पृथ्वी सुर्या भोवती फिरते  हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थानधोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .

             सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत  आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण  होते  पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात  विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत

              जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्या दिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर  भारत स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र्य भारताची स्वतंत्र्य अशी कालगणना असावी असा विचार समोर आला त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खगोल अभ्यासक आणि ज्योतिष या लोकांची एक समिती नेमून त्यास सादर कार्य सोपवले त्यांनी देशभरातील विविध कलागणनेचा अभ्यास करून स्वतंत्र्य भारताची कालगणना सुरु केली ती म्हणजे भारतीय सौर दिनांक हि कालगना .जी विविध वृत्तपत्र आणि दूरदर्शन आणि आकाशवाणी द्वारे दररोज सांगितली जाते  भारतीय सौर  कालगणनेची सुरवात देखील   २१ मार्चला होते . बँकेच्या चेकवर आपण हि कालगना वापरू शकतो  २१ मार्च नंतर उत्तर गोलार्धात उष्मा वाढत जातो जो २१ जूनपर्यंत असतो २२ डिसेंबर ते २२ जून या कालावधीत ऊत्तर गोलार्धात उन्हाळा समजला जातो तर याच कालावधीत दक्षिण गोलार्धात हिवाळा ऋतू असतो

        21मार्चनंतर सूर्य कर्कवृताकडे  भ्रमण करतो सूर्य कार्कवृतावर  २२जूनला असतो त्यानंतर तो दक्षिणेकडे  प्रवास करायला सुरवात करतो आणि दक्षिणायन सुरु होते जे २२ दिसेबर  पर्यंत सुरु राहते (यामध्ये 21 सप्टेंबर ला सुर्य परत विषववृतावर असतो ) 22डिसेंबरला सुर्य मकरवृतावर असतो . त्यानंतर तो परत भासमान पध्दतीने कर्कवृतावर सरकतो त्यांनतर उत्तरायण सुरु होते . आपल्या भारतीय समजतीनूसार  मकरसंक्रातीला उत्तरायण सुरु होते . पण प्रत्यक्षात तो सूर्याचा मकरराशीतील प्रवेशअसतो . काही हजार वर्षापूर्वी सूर्याचा मकर राशीतील प्रवेश आणि उत्तरायण एकाच दिवसी होत असे मात्र पृथ्वीच्या परांचन गतीमुळे  हा फरक पडला आहे.  (ज्योतिषशास्ञा नुसार  पंचांगाचे सायन आणि निरयन पंचाग असे  जे दोन प्रकार पडलेत ते या मुळेच हा

उत्तरायण सुरु होण्याचा फरक फरक मानायचा की नाही ) आता सुर्याचा मकर राशीतील प्रवेश  15 जानेवारीला होतो आणि दर 70वर्षानी हा दिवस एक दिवस पुढे पुढे जात आहे . सुर्याचा या भासमान प्रवासात तो दोन ठिकाणी विषवृताला छेदतो त्या संपाद बिंदू पैकी एका बिंदू पाशी एके काळी आपले राशीचक्र सुरु होत असे . आता होत नाही . कारण पृथ्वीची परांचन गती .जिच्यात आता बदल होत आहे .याछेदन बिंदूलाच खगोलीय भाषेत राहू आणि केतू म्हणतात

         पृथ्वीवरील ऋतुचक्राच्या निर्मितीत या उत्तरायण आणि दक्षिणायनाचे महत्व अन्ययसाधारण आहे . किंबहूना त्यामुळेच पृथ्वीवर विविध ऋतू चक्र निर्माण झाले असे म्हटल्यास वावगे ठरु नये .त्यामुळे हे ठरवणारे दिनांक सर्व मानवजातीसाठी महत्वाचे आहेत जे आहेत २१ मार्च २२ जून २१ सप्टेंबर आणि २२ डिसेंबर . आपल्या भारतीय संस्कृतीसह जगभरातील प्राचीन संस्कृतीचे सण उत्सव या दिनांकांशी जोडले गेले आहेत त्यामुळे आपणासाठी हे दिनांक अत्यंत महत्त्वाचे आहेत हे नक्की  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?