१८५७च्या जिहाद : स्वातंत्र्य समराची नव्या अंगाने मांडणी करणारे पुस्तक


एखाद्या घटनेकडे  बघायचे अनेक दृष्टिकोन असू शकतात जर घटना इतिहासातील असेल तर हि गुंतागुंत अधिकच वाढते त्यातही देशाच्या इतिहासावर परिणाम करणारी घटना असेल तर हे दृष्टिकोनाचे कंगोरे अजूनच वाढतात त्यातील सर्वच मोठ्या प्रमाणात समाजमान्य असतील असेही  दृष्टिनच्या बाबतीतसमर्थकांपेक्षा विरोधातकांची टीकाकारांचीच संख्या जास्त असन्यासाच्या देखील संभव असू शकतो  मात्र असे असले तरी त्या दृष्टिकोणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते हाताची पाचही बोटे सारखी नसली तरी आपण त्यांच्या स्वीकार करतोचना त्या प्रकारे याही दृष्टिकोचा पण स्वीकार करायला हवा जरआपण तो स्वीकार केला तर आणि तरच आपण त्या इतिहासीक घटनेला पूर्णपणे न्याय देणारे ठरू अन्यथा नाही भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर याचे महत्व अजूनच वाढते अल्पमतातील असले तरी त्यांचे मत समजवून घेणे त्यास योग्य अश्या नैतिक मार्गाचा अवलंब करत विरोध कारे यालाच खरी लोकशाही म्हणतात हाच दृष्टिकोन मनात घेत मी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या मदतीने १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचले 
      आपल्या भारताच्या इतिहासाचा विचार केला असता १८५७चा उठाव याकडे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध या दृश्ष्टिकोनातून बघणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे मी सुद्धा याच मताचा पुरस्कर्ता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या देशप्रेमींचा प्रयत्नामुळे समाजात या घटनेचा तयार झालेल्या प्रतिमेच्या विरुद्ध मत मांडणाऱ्या या पुस्तकात १० प्रकरणे आणि एक परिशिष्ट यांच्या मदतीने याचा पूर्णतः विरुद्ध मतप्रदर्शन केले आहे ३७६ पानाच्या या पुस्तकात पानाच्या तळाशी दिलेल्या तळटीपा आपल्याला लेखकाने दिलेल्या माहितीला पूरक अशी माहिती देत लेखकाचा मुद्दा अखोरेखित करण्यास मदत्तच देतात ,पुस्तकात लेखकाने वेळोवेळी संदर्भ पुरवले आहेत संदर्भ कसे अभ्यासावे हे पुस्तकाच्या सुरवातीला स्पष्ट केले आहे पुस्तकाच्या शेवटी ७ पानमध्ये १६० पुस्तकांची संदर्भ यादी दिली आहे 
     पुस्तकाच्या १० प्रकारांममध्ये पाचवे प्रकरण पूर्ण आणि आठवे प्रकरणाचा अपवाद वगळता अन्य सर्व पुस्तकामध्ये १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध नसून एका विशिष्ट धर्मियांनी ब्रिटिशनमुळे गेलेले त्यांचे राज्य सिहासन पुन्हा मिळावे यासाठी छेडलेलेले धर्मयुद्ध होते याचे दाखले देण्यात आले आहे पाचव्या प्रकरणात १८५७ चा उठाव कश्या प्रकारे लढण्यात येऊन ब्रिटिशांनी तो कोणत्या प्रकारे मोडूनकाढला हे सांगितले आहे तर आठव्या प्रकरणात दक्षिण भारतात या स्वातंत्र्य समराचे काय प्रतिसाद उमटले हे सांगितले आहे या प्रकरणात काही प्रमाणत धार्मिक टीका कमी आढळते पहिल्या प्रकरणात प्रास्ताविक असून लेखकाने हा ग्रन्थ का लिहला ? त्यासाठी संदर्भ ग्रंथ कसे एकत्रित केले याविषयी विवेचन करण्यात आली आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात १७५७ च्या प्लासीच्या लढाईपाससून धार्मिक चळवळीद्वारे उठावाची स्थिती कशी निर्माण करण्यात अली हे सांगितले आहे चवथ्या प्रकरणात उठावाची तत्कलीन परिस्थी सांगण्यात आली आहे सहाव्या सातव्या आणि आठवाव्या प्रकरणात भारताच्या विविध भगत उठावाचे प्रेरक आणि लाभधारक कोण होते या विषयी विवेचन करण्यात आले आहे ९ व्य प्रकरणात स्वातंत्र्य समरात विविध
सत्ताधिकारी वर्गाकडून प्रसिद्ध करण्यात  आलेल्या फतव्याची माहिती देण्यात आली आहे शेवटच्या दहाव्या प्रकरणात त्यावेळची सामाजिक सौदार्ह्य कसे होते याविषयी सांगितले आहे 
         एखादी गोष्ट आपणास नावडू शकते एखादी गोष्ट आवडू शकते नावडत्या गोष्टीचा विरोध देखील आपण करू शकतो त्यात व्वगे देखील काही नाही मात्र आपण ज्या गोष्टीचा विरोध करत आहोत तिचे आपणास किमान काही नाही तरी माहिती असणे आवश्यक आहे एखाद्या गोष्टीची काहीच माहिती नसताना तिचा ईरोध करणे गैर आहे शेषराव मोरे यांच्या या पुस्तकात मांडलेल्या निष्कर्षाशी आपण असहमत असाल म्हणून आपण त्यास विरोध करत असू तर त्या पुस्तकात नाकी काय लिहले आहे याची आपणस काही अंशी तरी माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी तरी आपण हे पुस्तक किमान एकदा तरी वाचायलाच हवे मग वाचताय ना हे पुसतक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?