पर्यटनाची अपार क्षमता मात्र दुर्लक्षित जिल्हा लातूर

 


आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या ३६ जिल्ह्याचा विचार केला असता  प्रत्येक जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत पर्यटनस्थळांनी आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा समृद्ध आहेलातूर सारखा क्षेत्रफळाचा दृष्टीने छोट्या जिल्ह्यात मोडणारा महाराष्ट्राचा एका कोपऱयात असणारा जिल्हा देखील त्यास अपवाद नाहीये . लातूर या जेमतेम पाच तालुक्याच्या  जिल्ह्यात दोन भुईकोट किल्ले , एक लेणी ,एक निसर्ग पर्यटन केंद्र ,एक बालाजीचे मंदिर  , दोन महादेवाची मंदिरे  एक मनमोहक गार्डन , आदी पर्यटनस्थळे आहेत .एसटीचा आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत  नुकतीच या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या

माझ्या या प्रवाशाची सुरवात नेहमीप्रमाणे शनिवारी झाली . शनिवारी पहाटे सकाळी सहा वाजता नाशिक लातूर या बसने मी लातूरसाठी निघालो नाशिकहून लातूरला दोन मार्गे जाता येते एका मार्ग हिंगोलीमार्गे  आहे तर दुसरा मार्ग आंबाजोगाईमार्गे आहे मी नाशिकहून लातूर आणि परत नाशिक या दोन्ही वेळेस  आंबाजोगाईमार्गे प्रवास केला या साठी मला मला नाशिकहून लातूर प्रवासासाठी सव्वा बारातास  तर लातूरहून नाशिकच्या प्रवास्यांसाठी अकरा तास प्रवास करावा लागला . मी नाशिक अहमदनगर जामखेड आष्टी कडा पाटोदा , केज आंबाजोगाई या मार्गाने प्रवास केला  माझ्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नाशिक ते लातूर या प्रवाश्यासाठी तास लागणार


होते मात्र रस्त्याची अवस्था आणि गाडीला असणारे स्पीडलॉक  यामुळे माझ्या अंदाजापेक्षा गाडी उशिरा पोहोचल्याने माझे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले मात्र नंतर पर्यटनस्थळाला अपेक्षेपेक्ष कमी वेळ लागल्याने सर्व स्थळे बघता आली

   लातूरला दोन बस्थानके आहेत त्यातील एक गावाच्या मध्यभागी आहे तर दुसरे काहीसे गावाच्या कोपऱ्यात आहे माझी बस  दुसऱ्या  स्थानकावर विसावली तेथून २० रुपये प्रतिसिट या दाराने शेअर रिक्षा आहे त्याच्या वापर  करत गावाच्या मध्यभागी आलो आणि राहण्याची सोय केली प्रवास्यात दमणूक झाल्याने आणि गाडी माझ्या अंदाजापेक्षा तीन तास उशिरा लातूरला पोहोचल्याने बराच उशीर झाला होता परिणामी  त्या दिवशी स्थलदर्शनचा कार्यक्रम केला नाही

     दुसऱ्या दिवशी उदगीर येथील किल्ला बघितला उदगीर हे गाव लातूर नांदेड रस्त्यावर अष्टमोड (नाशिक पुणे परिसरात ज्यास फाटा म्हणतात त्यास लातूरला स्थानिक भाषेत मोड म्हणतात ) येथून उजवीकड़े वाळल्यावर आपण सुमारे तासाभरात  पोहोचतो  लातूर ते उदगीर प्रवास्यास सुमारे दोन तास लागतात . बसस्टॅन्डपासून किल्ल्ला येथे २० रुपयात रिक्षा करून जात येते किल्ल्याचे संवर्धनाचे काम सध्या पुरातत्व  खात्यामार्फत सुरु असल्याने किल्ला पर्यटकानं बघायला बघता येत नाही मात्र मी पोहोचलो तेव्हा तेथील  सुरक्षारक्षक जागेवर नसल्याने मला किल्ल्यात प्रवेश करायला कोणीच अडवले नाही किल्ला सुमारे दीड तासात पूर्ण फिरता येण्यासारखा आहे

   त्यानंतर   मी उदगीरपासून १७ किमीवर असलेल्या हत्तीबेट निसर्ग पर्यटन केंद्राला भेट दिली उदगीरहून साकोळे येथे जाणाऱ्या बसने येथे जाता येते देवर्जन या गावापासून सुमारे चार किलोमीटरवर हे एका टेकडीवजा डोंगरावर


हे पर्यटन केंद्र उभारले आहे टेकडीच्या माथ्यावर दोन मंदिरे आहेत टेकडीच्या आसपास विशेष झाडे नसली तरी टेकडीवर मात्र मोठ्या प्रमाणत वनराई आहे ती  बघितल्यावर मी माझ्या स्थलदर्शनची सांगता करत लातूरला मुकामी आलो उदगीरला जाण्यसासाठी  गावातील पहिल्या क्रमांकाच्या  सी बी एसपासून बसेस आहेत 

   तिसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर स्थलदर्शनला सुरवात केली त्यादिवशी मी औसा येथील किल्ला  आणि मंदिर खारोसे येथील लेणी आणि लातूर मधील मंदिरला भेट देत नाशिसाठी प्रस्थान केले लातूरहून निलंगा येथे जाणाऱ्या रस्त्यावर २५ किमीवर औसा हे गाव आहे तर त्याच रस्त्यावर पुढे २० किलोमीटरवर खारोसा लेणी आहेत लातूरहून निलंगा किंवा कर्नाटकमधील बिदर भालकी येथे जाणाऱ्या  बसने या स्थळांना भेट देता येऊ शकते . जर या मार्गावरची  बस मिळाल्यास लातूरहून तुळजापूर सोलापुर या मार्गे जाणाऱ्या बसेसमार्फत आपण औसा या गावी येऊ शकतो स्वतःची गाडी असल्यास औसा तुळजापूर रस्त्यावरील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हा किल्ला देखील आपण बघू शकतो नळदुर्ग हा किल्ला श्री क्षेत्र तुळजापूर पासून २५ किमीवर आहे असो नळदुर्ग किल्ला हा एक सव्वा तासात सहज बघून होतो मी धाराशिव जिल्ह्यात फिरत आसतना नळदुर्ग किल्ला बघिताला असल्याने यावेळी तो किल्ल्ल मी बघितला नाही

    औसा किल्ला पर्यटंकाना बघता येतो त्या त्यासाठी १० रुपये आकारण्यात  येतात किल्ला ३४ एकरावर पसरलेला असून किल्यात पुरातच खात्यामार्फत संवर्धनाचे काम सुरु असून आजमितीस फक्त पाणी का महल हीच एक वास्तू शिलक आहे बाकी सर्व बांधकामाची पडझड झाली आहे मात्र किल्याची तटबंधी शिल्लक आहे .पुण्यातील शनिवारवाड्यासारखे तटबंधीवरून फिरता येते फरक एव्हढाच कि शनिवार वाड्याची तटबंधी ही दीड पावणेदोन एकराच्या परिसराला आहे येथे हे क्षेत्र ३४ एकर आहे औसा येथील बालाजी मंदिर देखील बघण्यासारखे आहे गावाच्या निलंगा येथील बाजूला काहीसे गावाबाहेर असणाऱ्या या मंदिर परिसरात राहण्याची सोय आहे  मंदिर सकाळी सहा  ते रात्री  नऊपर्यंत उघडे असते या दरम्यान दुपारी १२ ते या दरम्यान दर्शन बंद असते

   खरोसा लेणी हीं जैन आणि हिंदू देवतांच्या मूर्ती असणाऱ्या लेणी आहेत सुमारे सात ते आठ लेणी असून चार लेण्यात मुर्त्या आहेत या चार लेण्यात विशेष सोइ केलेल्या असल्याने त्या सहज ओळखू येतात लेणी ज्या टेकडीसारख्या डोंगरावर आहेत त्या डोंगराच्या पायथ्यापासून लेण्यापर्यत   सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला असल्याने आपण सहज लेण्याच्या परिसरात पोहोचतो  लेण्यांनंतर डोंगराच्या माथ्यावर एक दर्गा आणि देवी

मंदिर आहे मात्र लेण्यांनंतर दर्गा आणि मंदिर परिसरात पोहोचण्यासाठी कच्ची वाट आहे मात्र जेमतेम हि कच्ची वाट जेमतेम तीन ते चार  मिनिटात संपते लेणीला जरी खरोसा हे नाव असले तरी लेणी गावापासून सुमारे दीड किलोमीटवर असणाऱ्या संथा जवळका मोड या बस थांब्यांजवळ  आहे या बस थांब्यापासून  सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटरवर लेण्या आहेत लेणी परिसरात एका माकडाचा वावर आहे मात्र ते एकमेव माकड प्रवाश्यांना काहीही करत नाही असे स्थानिकांनी मला बोलतांना सांगितले लेणी लेणी परिसर आपण सहज अर्ध्या तासात बघून येऊ शकतो

     खरोसा आणि औसा येथील स्थलदर्शनानंतर मी लातूर शहरात असणाऱ्या मंदिर आणि दर्ग्याला भेट दिली सर्व ठिकाणे शहरात मध्यवस्तीत असून त्या ठिकाणी रिक्षाच्या माध्यमातून सहजतेने पोहोचता येते हि सर्व मंदिरे सुमारे दोन तासात अगदी आरामात बघून होतात . लातूर शहर हे महानगरपालिकेचे शहर  असून महमनगरपालिकेची छोटीसी बससेवा आहे . मला वास्तव्याच्या तीन दिवसात अत्यंत म्हणजे अत्यंत तुरळक बसेस या धावताना दिसल्या लातूरला असणाऱ्या एम आय डीसीमध्ये स्टील आणि लोखंडावर प्रक्रिया करणारे आणि तेलबियांपासून तेल काढणारे , डाळ निर्मितीचे अनेक छोटे कारखाने आहेत मात्र नाशिकला जसा महिंद्राचा .अशियन पेंट चा कारखाना आहे अशा मोठा कारखाना मात्र लातूर परिसरात नाही मी तीन दिवसात जे लातूर शहर बघितले त्यामध्ये रस्त्याची स्थिती फारच उत्तम होती मागे परभणी शहरात फिरताना मला रस्त्याची समस्या जाणवली होती लातूरला त्याच्या मागसुस देखील नव्हता मात्र परभणी आणि लातूर या दोन्ही महानगरपालिका या डी वर्गवारीतील असून देखील मला खाद्यपदार्थ्यांच्या किमतीचा विचार करता लातूर शहर कणभर महाग आहे

  लातूर जिल्ह्यात फिरताना मला जागोजागी सिमेंटचे रस्ते बांधण्यात येत असल्याचे दिसले धाराशिव जिल्ह्यात फिरताना मला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले रस्ते आढळले होते त्यावेळी तेथिल स्थानिकांशी बोलताना त्यांनी देखील याबाबत काहीसा नाराजीचा सूर लावला होता लातूर जिल्ह्याची दक्षिणेकडील बाजू कर्नाटक राज्याला लागून आहे लातूर शहरापासून सत्तर किमीवर तर उदगीर शहरापासून वीस किलोमीटरवर कर्नाटक राज्य सुरु होते मात्र या ठिकाणी सर्वत्र मला मराठीच ऐकू येत होती औषधाला देखील कन्नड भाषा ऐकू येत नाही उदगीरचा अपवाद वगळता कर्नाटकाच्या एसटीबसेस देखील दिसत मोठ्या संख्येने नाहीत  धाराशिव जिल्ह्यत देखील मला हीच परिस्थिती दिसली होती मला कोल्हापूरला फिरत असताना सर्वत्र मराठीच ऐकू येत असली तरी कर्नाटकच्या बसेस मोठ्या प्रमाणत दिसल्या होत्या सलातूर शहराच्या मुख्य बस्थानकात देखील मला सर्व मराठी वर्तमानपत्रच दिसले ध्या राजकीय अस्मितेचा मुद्दा झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत हे  निरीक्षण महत्त्वाचे आहे  आहे मला फिरताना राहुरी नंतर सर्वत्र मोकळ्या जमिनी आणि शेती सुरु असणाऱ्या जमिनीचा पाठशिवणीचा खेळ दिसला मात्र या खेळात मोकळ्या जमिनीचे प्रमाण मोठे होते उदगीर परिसरात मला काही प्रमाणत उसाची वाहतूक होताना दिसली याबाबत स्थानिकांशी बोलल्यावर लातूर जिल्हा जरी दुष्काळी स्वरूपाचा असला तरी जिल्ह्यतात तीन साखर कारखाने आहेत पाच तालुक्याच्या दुष्काळी जिह्ल्यात हे विशेष नोंद घेण्याची बाब आहे माझ्या मते लातूर जिल्ह्यास पर्यटनाची अपार क्षमता मात्र दुर्लक्षित जिल्हा या श्रेणीत टाकण्यास काहीच हरकत नसावी

   पहिल्या दिवशीचा अर्धा तासाचा अपवाद वगळता मला बेमोसमी पावसाने कुठेही त्रास दिला नाही यावेळी जो पाऊस झाला तो तुरळक स्वरूपाचा होता मात्र दुसऱ्या दिवशी लातूर आणि रेवापूर तालुक्यात गारपीट झाल्याचे समजले त्यामुळे शेतीचे  मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात होते मला मात्र मात्र त्यावेळी लातूर शहरात असल्याने असेल पावसाचा विशेष त्रास झाला नाही पावसाने त्रास दिल्याने माझे लातूर जिल्हा पर्यंत अगदी उत्तम झाले  लातूर जिल्ह्यात फिरल्याने माझ्या एसटीमार्फत दर रविवारी फिरण्याच्या उपक्रमांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्याच्या अपवाद ववगळता  संपूर्ण महाराष्ट्र राज्य गुजरातच्या दक्षिण गुजरात आणि मध्य गुजरात या गुजरातच्या प्रादेशिक विभागतात प्रदेशाचं समावेश झाला आहे या फिरण्यातमध्ये मला आलेल्या अनुभवनाविषयी मी नंतर कधीतरी लिहिलं तूर्तास इतकेच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?