तंत्रज्ञानाची अत पासून इती पर्यंत माहिती देणारे पुस्तक इन्फोटेक


सध्याचे आपले संपूर्ण विश्व हे तंत्रज्ञाने व्यापलेले आहे हे कोणीही मान्यच करेल आपल्यास तंत्रज्ञाने निर्मण केलेले उपकरण वापरतना त्यामागील तांत्रिक बाजूचे ज्ञान नसले तरी फारसे बिघतड नाही मात्र ते तांत्रीक ज्ञान समजल्यावर होणारा  आंनद काय तो वर्णावा . मात्र ते ज्ञान इंग्रजीत असल्याने अनेकजण त्यापासून मुकतात . बरे या माहितीचा  मराठी अनुवाद वाचून या संकल्पना समजून घ्याव्यात तर मूळच्या इंगजी भाषेतील मात्र रोजच्या दैनंदिन जीवनात वापरताना सहजतेने वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचे संस्कृतच्या प्रभावाखालील भाषांतर वाचून मुळात अवघड नसलेला विषय अवघड झाल्याने समजत नाही त्यामुळे अनेकजण ज्ञानाचा आनंदाला पारखे होतात.  हीच बाब लक्षात घेऊन या संकल्पना मराठी भाषिकांना सहजतेने समजावा या उद्देश्याने  मूळच्या इंगजी भाषेतील संकल्पना तसाच ठेवत संकल्पनेतील आशय मराठीत मांडणारे लेखक म्हणजे अच्युत गोडबोले . अच्युत गोडबोले यांनी मानसशात्र, अर्थशास्त्र, बायोलॉजी नॅनोशास्त्र ,फिजिक्स  ,वेस्टन म्युझिक , आदी विविध विषयांची माहिती सोप्या मराठी भाषेत जवळपास २९ पुस्तके लिहली आहेत यातीलच एक पुस्तक म्हणजे त्यांनी इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाची माहिती देणारे इन्फोटेक हे पुस्तक

                      नाशिक जिल्ह्यातील घोटी या गावचे मूळ प्रकाशन असलेलय मधुश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित हे पुस्तक आपणास इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी च्या विविध गोष्टींची अत्यंत सोप्या भाषेत ज्यांचे आठवावीपर्यंत शिक्षण झाले आहे अश्या व्यक्तीला देखील समजले अश्या भाषेत अत्यंत सविस्तर माहिती देते . मराठीत ब्लॉकचेन सारख्या तांत्रिक विषयाची माहिती  देणारे पुस्तक असो किंवा ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फ्री

व्हाईस या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणारे पुस्तक अश्या नवनवीन विषयावरची माहितीपूर्ण पुस्तके प्रसिद्ध करणारे प्रकाशन म्हणून घोटीचे मधुश्री प्रकाशन ओळखले जाते त्यांची हीच परंपरा हे पुस्तक पुढे नेते ४८८ पानाच्या या पुस्तकात भागामध्ये आपणास इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या विविध घटकांची सविस्तर म्हणता येईल अशी ओळख होते या पुस्तकाच्या प्रत्येक भागाची विभागणी विविध प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे त्याद्वारे लेखकाने ही माहिती आपल्यासमोर मांडली आहे नाशिकमधील महत्वाची अग्रगण्य साहित्यिक संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या पुस्तक संस्ग्रहातून मी हे पुस्तक मी नुकतेच वाचले

                घटाकांमध्ये विभागलेल्या या पुस्तकातील पहिला घटक डेटा या विषयाबाबत माहिती देतो या घटकामध्ये सहा प्रकरणामध्ये बिट्स आणि बाइट्स म्हणजे काय आपण सहजतेने म्हणतो कि कम्प्युटरला फक शून्य आणि एकची भाषा समजते ते नक्की काय असते  मल्टिमीडिया  डेटा कॉम्प्रेशन -एन्क्रिशन . डीएमएस  एफएमएस तसेच डीबीएमएस या सारख्या डेटा मॅनेजमेंट सिस्टीम , डेटा मायनिंग आणि डेटा वेअर  हाऊस बिग डेटा आदी विषयी माहिती मिळते दुसऱ्या घटकाचे नाव जीपीएस गूगल मॅप्स जी आय एस हे आहे यामध्ये प्रकरणाद्वारे सॅटेलाईट्स जिओग्राफ़िकल पोझीशनींग सिस्टीम अर्थात (जीपीएस गूगल मॅप्स आणि जी आय एस गूगल स्ट्रीट व्ह्यू , गूगल अर्थ याविषयी महती मिळते प्रकणात विभागलेल्या सेन्सर्स IOT , IIOT असे नाव असलेल्या तिसऱ्या प्रकरणात बारकोडस एनएफसी  आणि रिमोट सेन्सिंग इंटरनेट ऑफ थिंग्स , सेन्सर्स आणि एंबेडेड सिस्टीम आदींची माहिती देण्यात आली आहे इतर महत्वाची तंत्र असे नाव असलेलय चवथ्या घटकात प्रकरणाद्वारे

ब्लॉकचें बिटकॉइन डी प्रिंटींग , व्हर्चुएल रियालिटी , क्लाउड काम्पुटिंग गूगलग्लास आणि अंगमेन्डेतड रियालिटी आदींची तर नेटवर्किंग आणि इंटनेट या विषयीच्या विविध गोष्टींची माहिती आपणस पाचव्या घटकामध्ये मिळते सध्यासगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या मोबाईलच्या विषयी त्याच्या इतिहास , फ्रिक्वेन्सी रियुज जीपीएस आणि सीडीएम .एस एमएसएस ,जनरेशन्स आणि कॉन्ह्र्जन या घटकाच्या आधारे माहिती सहाव्या भगत तीन प्रकरणाद्वारे मिळते  सध्या खूप चर्चेत असलेल्या अर्टिफीशियल इंटेलनजन्स या घटकाची माहिती आपणास प्रकरणाद्वारे होते ती सातव्या घटकांमधून भविष्याचे तंत्रज्ञान असे नाव असलेल्या आठव्या भागात इंडस्ट्री पाईंट , बायो कम्प्युटर नॅनो कम्प्युटर क्वांटम कॉम्पुटर आदीची ओळख आपणस होते नववे प्रकरण आधीच्या तुलनेत बरेच किचकट असून यामध्ये पहिल्या प्रकरणात सांगितलेल्या बाईविषयी सविस्तर सर्व तांत्रिक बाबीचा समावेश करत माहिती देण्यात आली आहे

      सध्या अनेकदा ऐकू येणारी बँडविथ ही संकल्पना मुळात काय आहे ईमेलचे कार्य कोणत्या कार्यपद्धतीवर चालते नेटवर्क टोपोलॉजीज म्हणजे काय ?नेटवर्क ट्रान्समिशनच्या पद्धती कोणत्या आहेत ? आदी संस्ख्या अनेक बाबींची ओळख आपणस हे पुस्तक वाचल्यावर होतेआपण इंटरनेटवर अनेकदा डेटा एककीकडून दुसरीकडे नेताना फाईल कॉम्प्रेस करतो त्यावेळी फाईलवर प्रत्यक्षात काय प्रकीर्या होते हि कॉम्प्रेस फाईल मूळ रूपात येते म्हणजे नक्की काय प्रक्रिया होते हे करण्यामागची मुळातील संकल्पना काय आहे नेटफ्लिक्सह सारख्या कंपन्यांचे कार्य असे कसे विस्तारित गेले आदींची माहितीआपणास या पुस्तकाद्वारे मिळते  पुस्तकामध्ये निव्वळ शाब्दिक माहिती देण्यात आलेली नसून योग्य त्या ठिकाणी योग्य अश्या आकृत्या वापरून विषय अधिकाधिक सोपा करण्याच्या लेखकाने  प्रयत्न केल्याचे आपणस पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते

ज्यांना  इन्फॉर्मनशन टेक्नॉलॉजी या विषयाचा काहीच गंध नाही अश्या व्यक्तीला या विषयात बऱ्यापैकी साक्षर करण्याचे कार्य हे पुस्तक वाचल्यामुळे होते मग वाचताय ना हे  पुस्तक


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?