भारत उभारती नव्हे झालेली महासत्ता


जगाच्या नकाश्यावर नजर फिरवली असता पाकिस्तान नंतर इराणच्या पश्चिमेला समुद्र काहीसा आता गेलेला दिसतो जागतिक राजकारणाचा विचार करता अत्यंत स्फोटक म्हणून ज्याचा उल्लेख होतो  ते इराणचे आखात म्हणजे हाच प्रदेश होय / या आखाताला ज्यांच्या समुद्रकिनारा लागून आहे त्यांना आखाती देश म्हणतात  प्रामुख्याने अरबी भाषा या प्रदेश्यात बोलली जाते मुस्लिम  बांधवांचा प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो अनेक भारतीय या प्रदेशात नोकरीच्या निमित्याने वास्तव्यास आहेत नैसर्गिक इंधनाचे कोठार असलेल्या या प्रदेशाशी भारताचे व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणत आहेत  जे दिवसोंदिवस वाढतच आहेत

  व्यापार करणे सोईचे व्हावे प्रदेश जागतिक बाजरपेठेत एक प्रबळ गट म्हणून उदयास यावा या हेतूने या प्रदेशातील देशांकडून  स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे गल्फ कंट्री कोऑपरेशन होय हि संघटना तिच्या अद्याक्षरांवरून जी सी सी म्हणून ओळखली जाते सौदी अरेबिया कुवेत ओमान कतार बहारीन आणि युनाटेड अरब अमिरात हे सहा देश याचे संस्थापक सदस्य आहेत तर हे सर्व सांगायचे  कारण असे की २० मार्च रोजी सौदी अरेबिया देशाची राजधानी असलेल्या रियाध या शहरात झालेली पहिली भारत आणि गल्फ कॅट्री कोऑपरेशन या संघटनेदरम्यान झालेली पहिली सिनियर ऑफिसर मिटिंग होय

या बैठकीत  भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व CPV&OIA चे सचिव डॉ. औसफ सईद, करत होते तर GCC शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे  GCC सहाय्यक महासचिव डॉ. अब्दुल अझीझ बिन हमाद अल-ओवैशाक,करत   होते. या बैठकीत GCC च्या सर्व 6 सदस्य देशांचा सहभाग होता. सदर बैठक  आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सप्टेंबर 2022 मध्ये रियाध भेटीदरम्यान भारत-GCC सल्लामसलत यंत्रणेवर स्वाक्षरी केलेल्या MOU च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती.

  या बैठकीत  भारत-GCC देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीतील प्रगतीबद्दल दोन्ही बाजूंनी आनंद व्यक्त केला. भारत-GCC मुक्त व्यापार कराराला (FTA) लवकर अंतिम रूप देण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या बैठकीत भारताकडून  GCC देशांदरम्यान अक्षय ऊर्जा, अन्न सुरक्षा, आरोग्य, IT क्षेत्र आणि दहशतवादविरोधी अधिक सहकार्यासाठी आमंत्रित केले . दोन्ही बाजूंनी भारत आणि GCC देशांमधील सहकार्याच्या विशिष्ट क्षेत्रांची पूर्तता करण्यासाठी संयुक्त कार्यगटाच्या स्थापनेचा प्रस्ताव दिला. या संयुक्त कार्यगटांचे नेतृत्व तज्ञ करतील आणि प्राधान्य क्षेत्रांमध्ये नियमित आणि सतत प्रगती सुनिश्चित करतील. दोन्ही बाजूंनी वाढत्या व्यापार आणि गुंतवणुकीसह ऐतिहासिक संबंधांवर बांधलेल्या भारत-GCC देशांमधील संबंधांमधील प्रगती आणि या प्रदेशात अंदाजे 8.5 दशलक्ष भारतीय डायस्पोराच्या उपस्थितीबाबत संबंधितांचे अभिनंदन केले आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 154 अब्ज अमेरिकी डॉलरच्या  एकूण व्यापारासह GCC हा व्यापार गट म्हणून भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले  यावेळी लोकांशी असलेले संबंध आणखी वाढवण्याची गरज आहे. या चर्चेत महत्त्वाच्या प्रादेशिक मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.

एकंदरीत भारताची दाखल जग आता मोठ्या आदराने घेत आहे हेच यातून सिद्ध होतेय

भारत उभारती नव्हे झालेली महासत्ता 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?