जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने -

        


सघ्याच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी असणारा विषय म्हणजे बदलत जाणारे हवामान . यामघ्ये सर्वच वयोगटातील व्यकती सहभागी असतात . म्हाताऱ्या व्यक्ती किंबहूना अधिकच . आमच्यावेळी हे असं नव्हतं असा त्यांचा सर्वसाधरण सूर असतो. या बदलत्या हवामानाचा किंबहूना एकूणच समस्त्हवामाचा अभ्यास करणरे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र . भुगोलाच्या प्राक्रुतिक भुगोल या मूख्य शाखेची दुय्यम शाखा असणाऱ्या शास्त्राची जनसामन्यांना ओळख व्हावी या हेतूने जागतिक स्तरावर  साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्त्र दिवस . जो 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो.    

आपल्या भारतात ब्रिटीश राजवटीत 1903 साली शिमला येथे आजच्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली. काही वर्षानी कामाचा व्याप वाढल्याने शिमला येथील कार्यालयाचे विभाजन करण्यात येउन पुणे येथील शिवाजीनगर भागात नविन कार्यालय उघडण्यात आले . हेच ते पुण्याचे प्रसिध्दशिमला ऑफिस

     भारतासारख्या खंडप्राय देशात हवामानशास्त्राचा अभ्यास अधिक महत्त्वाचा आहे. कारण् आपली बहूसंख्य अर्थव्यवस्था अजूनही शेतीप्रधान आहे . हवामानशास्त्रााचा अभ्यास आपल्याकडे योग्य त्या प्रमाणात होत नाही.

किंबहूना भुगोलात त्यातही हवामानशास्त्रात रोजगाराच्या अनंत संधी आहेत . याचीच जाणिव अनेकांना नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवांच्या धर्तीवर भुगोल विषयात मास्टर केलेल्या व्यक्तीसांठी स्वतेत्र परीक्षा घेतली जाते. ज्यायोगे हवामानशास्त्रात उत्त्म पध्दतीने करीयर करता येते.

   आपल्याकडे हवानानशास्त्र आणि खात्याविषयी अनादर  जाणवतो. हवामान खात्याने सांगीतलेना पाउस पडणार महणजे प्रत्यक्षात नाही पडणार , आणि हवामान खाते म्हणतेय ना नाही पडणार म्हणजे नक्क्ीच पडणार असा थटटचेचा सूर हवामानशास्त्र  आणि खात्याबाबत दिसतो असे हे घडते ते हवामानशास्त्राचा अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीमुळे. हवामानशास्त्र अत्यंत जटील शास्त्र आहे.आणि सध्यचा बदलत्या हवामानामूळे त्यातील जटीलता अधिक प्रमाणात वाढलीये.अमेरीका सारख्या  देशत देखील जास्तीत जास्त एका आठवडयरचा अंदाज व्यक्त केला जातेा, तो देखील प्रचंड प्रमानात पैसा खर्च करून . याउलट भारतात अतयंत तुटपुज्या खर्चात 4 महिन्याचा अंदाज आपणकडून व्यक्त केला जातो.या तुटपुंज्या खर्चात आपण अत्यंत अचूक अंदाज व्यक्त करतो आपली अचूकता पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे त्यामागे आपल्या हवामानशास्त्र शास्त्रज्ञांचे  मोठे योगदान आहे

     जागतिक हवामानशास्त्र संघटनेतर्फे जगाची विभागणी क्षेत्रनिहाय विविध गटात केली आहे प्रत्येक गटातील सक्षम अश्या  हवामानविषयक देशपातळीवरच्या संघटनांना त्या त्या प्रदेशात अधिकाधिक सुस्सजय अश्या वेधशाळा उभारण्याची जवाबदारी देण्यात आली आहे या सक्षम वेधशाळा त्या त्या प्रदेशातील अन्य देशांच्या वेधशाळांना मदत करण्याचे बनधन जागतिक हवामानशास्त्र संघटनेकडून घालून देण्यात आले आहे  भारताच्या समावेश दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया या गटात होते या गटाची जवाबदारी भारतावर सोपववण्यात आली आहे आपल्या गटात नेपाळ वगळता अफगाणिस्तानसह संपूर्ण दक्षिण आशिया आणि म्यानमार कंबोडिया मलेशिया सिंगापूर व्हिएतनाम . लाओस आदी देश येतात . दूरदर्शनवर  गुलाम काश्मीर (पाकिस्तानने अनधिकृतरित्या नियंत्रणात ठेवलेला काश्मीरचा भाग )मधील हवामानअंदाज व्यक्त करण्यात आलेला असतो त्यामागे त्या प्रदेश्यात आणि समस्त पाकिस्तानात भारतीय हवामान खात्याच्या स्थापन करण्यात आलेल्या वेधशाळा असतात. नेपाळच्या समावेश चीनच्या प्रदेशात करण्यात आला आहे

      सघ्याचा विज्ञानाना भारतीय मान्सूमवर प्रभाव टाकणारे 17 घटक माहिती आहेत. या 17 घ्टकांच्या अभ्यास करून भारतीय हवामान खाते मान्सूमचा अंदाज व्यक्त करते. यातील कित्येक घटक जसे अल निनो आल्प्स पर्वतावरील बर्फाचे प्रमाण , जेट स्टीम आदि घटक तर भारताच्या सीमांपलीकडील आहेत. त्याबाबत अन्य देशांनी दिलेल्या माहितीवर पुर्णपणे अवलूंबून रहावे लागते. त्यामूळे अंदाज चूकू शकतात.   आपण्सर्वानी भारतीय हवामान खात्याचा आदर करायला हवा .ज्यासाठी जागतिक हवामान दिनासारखा चांगला मुहूर्त तो कोणता असणार?


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?