31वर्षे अभिमानाची*


आकाशातील उपग्रह ग्रह, तारे, तेजोमेघ, दिर्घीका यांच्या अभ्यासासाठी असणाऱ्या दुर्बिणी आपण आजकाल अनेकांकडे बघतो. .दुरवरुन येणाऱ्या प्रकाशाचे दृश्य स्वरूप त्या आपणास दाखवतात. मात्र एकुण प्रकाश लहरींपैकी फारच कमी प्रकाशलहरी आपणास दिसतात.  आपणास ज्या दुर्बिणी दिसतात त्या या दिसणाऱ्या प्रकाशलहीरीचे दृश्य स्वरूप असते .मानवी डोळ्यास न दिसणाऱ्या रेडिओ लहरीमध्ये गँमा किरण, एक्स रे, अल्टा साउंड किरण, आदींचा समावेश होतो. आपणास दिसणाऱ्या प्रकाशलहरींपेक्षा यांचे विश्व खुपच मोठे आहे. या लहरीच्या अभ्यासातून अनेक रंजक बाबी मानवास ज्ञात झाल्या आहेत. जसे कृष्णविवरांचे अस्तिव, लाल महाराक्षसी तारा ,श्वेतबटू तारा, न्युट्राँन स्टार वगैरै. या प्रकाशलहरींचा अभ्यासासाठी ज्या दुर्बिणी उभारल्या जातात. त्यांना रेडीओ दुर्बिणी उभाराव्या लागतात. या रेडीओ दुर्बिणी उभारणे त्यातून निरीक्षण करणे हे वैयक्तिक एकाचे कार्य नाही. त्यासाठी प्रचंड पैसा, जागा, मनुष्यबळ लागत असल्याने हे कार्य सरकारी पातळीवरच करण्यात येते .जगातील अनेक भागात अस्या सरकारी पाठबळ्यावर रेडिओ दुर्बिणी आहेत. आपल्या भारतातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा आहे.
    जगातील सर्वात मोठी आणि भारतातील पहिली जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे 1992 एप्रिल 20रोजी  उभारण्यात आली. आज 2023 साली या दुर्बिणीचा31 वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने समस्त खगोलशास्त्र प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.
      नाशिकहून पुण्याला जाताना जर फारशी वर्दळ नसेल, तसेच हवा स्वच्छ असेल तर नारायण गावापासून 6 किलोमीटर अलीकडे या दुर्बिणी रस्त्यावरुन बघता येवू शकतात.     महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामधल्या खोडद (अक्षांश: १९ उत्तर रेखांश: ७४ पूर्व.) येथील दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत.या दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. दुर्बिणी पॅराबोलिक आकाराचे तारांचे जाळे आहे.जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्टझ ते १४२० मेगाहर्टझ या वर्णपटातल्या
लहरींचा अभ्यास होतो. यांचे व्यवस्थापन पुण्यातील आयुका येथून होते.  आयुकातून विहीत परवानगी आणल्यास त्या जवळून बघता देखील येवू शकतात.
     आपल्याकडे विज्ञानाबाबत फारच अनास्था असते. मी राहतो त्या नाशिकमध्ये असणारे तारांगण जगाला कोरोनाचा क सुद्धा माहित नसल्याचा काळापासून बंद आहे. मात्र ते सुरु करण्याबाबत कोणीही फारसा पुढाकार घेत नाही. घरोघरी मातीच्या चूली, किंवा पळसाला पाने तीनच या म्हणीनूसार जी स्थिती नाशिकची, तीच समस्त भारतीयांची आहे. त्यामुळे जगातील सगळ्यात मोठी रेडीओ दुर्बिण आपल्या महाराष्ट्रात असून देखील तीची माहिती खुपच कमी लोकांना असते. मात्र हे चित्र हळूहळू बदलत आहे. पुर्वीपेक्षा जास्त लोकांना या विज्ञानतिर्थाची माहिती आहे. मात्र तरीदेखील हे प्रमाण कमीच आहे. हे वाढायलाच हवे. राष्ट्रीय विज्ञानदिन अर्थात 28फेब्रुवारी रोजी आपणास या दुर्बिणी बघता येतात. तसेच या कार्यालयाच्या साप्ताहिक सुट्टी च्या दिवशी अर्थात बुधवारी देखील पूर्व परवानगीने आपणास त्या बघता येतात.28फेब्रुवारी रोजी पुर्व परवानगीची आवश्यकता नसते.हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
 पुर्वी सकाळ हे दैनिक विज्ञानाला समर्पित साप्ताहिक पुरवणी काढत असे. कालांतराने ते बंद पडले. ते पुन्ह सुरु व्हायला हवे. ते लवकरात लवकर सुरु होवो, असी मनोकामना व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?