जी २० आणि भारत

    


भारत या वर्षी जी २०चे अध्यक्षपद भूषवत आहे हे एव्हाना सगळ्यांना माहिती असेलच . या अध्यक्षपदाच्या कालावधीत विविध  स्तरावरील अधिकारी मंत्रीगण यांच्या देशभरातील वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या विविध परिषद देखील आता आपणास अंगवळणी पडल्या असतील . या विविध शहारत होणाऱ्या परिषदांमुळे भारताताची जगात एका वेगळी ओळख होत असल्याने आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसलो तरीही एक जवाबदार नागरिक म्हणून आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे (स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीने एकवेळ स्वतःचे नाव विसरले तरी चालेल मात्र जी २० च्या परिषदेला विसरायला नको स्पर्धा परीक्षेत शहर आणि त्यांच्या विषय आणि आणि कोणत्या शहरात कधी परिषद झालीयावर पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न येऊ शकतो  )  चला तर मग जाणून घेउया एप्रिल पर्यंतच्या जी २०च्या परिषदा कोणकोणत्या शहरात झाल्या .

      भारताला या परिषदेचे अध्यक्षपद मिळाले, डिसेंबर २०२२ ला . ते मिळाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसानी म्हणजेच डिसेंबरपासून उदयपूर या शहरात जी २० देशांच्या शेर्पांची तीन दिवशीय परिषद झाली डिसेंबरमध्ये हि परिषद होऊन आठवडच होत नाही तोच १३ डिसेंबरला  बेंगरुळु या शहरात जी २०च्या देशांच्या मध्यवर्ती बँकेच्या (आपल्या येथील रिझर्व बँकेच्या समकक्ष ) उप प्रमुखांची पहिली बैठक झाली जी १५ डिसेंबरपर्यंत चालली . एकीकडे ही परिषद सुरु असताना १३ ते १६ डिसेंबर यादरम्यान मुबंईत पहिली डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपची बैठक झाली २० डिसेंबरला जी २० देशांच्या फायनास आणि हेल्थ टास्क फोर्सची ऑनलाईन बैठक पार पडली आणि डिसेंबर महिन्याची सांगता झाली या नंतर जी २० विषयक बैठका नव्या वर्षात अर्थात जानेवारी २०२३ पासून सुरु झाल्या

        जानेवारीमध्ये पहिली जी २० विषयक बैठक झाली ती ते ११ जानेवारीला कोलकत्ता या  शहरात .कोलकाता या शहरात झालेल्या जी २० च्या बैठकच वैशिष्ट म्हणजे  आर्थिक एकत्रीकरणांसाठी कार्यान्वयीत झालेली पहिली जागतिक भागीदारी होतो  (First Global Partnership for Financial Inclusion) भारताच्या पूर्व टोकाला झालेल्या या बैठकीनंतर पुढची जी २०ची बैठक झाली ती याच्या पूर्णतः दुसऱ्या टोकावर असलेल्या पुण्यात ,पुण्यात १६ आणि १७ जानेवारीला झालेली  ही  बैठकी ओळखली जाते ती जी २० देशांची पायाभूत

सोयीसुविधा उभारण्यासाठी कार्यरत गटांची पहिली बैठक म्हणून पुण्यातील बैठक संपल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी अर्थात १८ जानेवारीला तिरुअतनतपूरम या शहरात आरोग्य विषयक कार्य करणाऱ्या कृती गटाची सर्वसंमती साठी बैठक चंदीगढला (1st G20 Health Working Group Meeting to Commence) झाली हि बैठक २० जानेवारीपर्यंत चालली त्यानंतर सुमारे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर ३० आणि ३१ जानेवारीला चेन्नई या शहरात इंटरनॅशनल फायनांशियल आर्किस्टकचल वर्किंग गृपची बैठक झाली हि या प्रकारची पहिली बैठक होती त्यानंतर जानेवारीत जी २०च्या बैठका झाल्या नाहीत

 फेब्रुवारी महिन्याच जी २० गटाची पहिली बैठक झाली ती चेन्नई या शहरात जी २० गटाची पहिली शैक्षणिक कार्य करणाऱ्या कृतिगटाची बैठकीच्या स्वरूपात जी एक आणि  दोन फेब्रुवारीला झाली याशिवाय याच कालावधीत  Sustainable Finance Working Group meeting सुद्धा झाली याच कालावधीत ते फेब्रुवारी दरम्यान जोधपूर शहरात पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची पहिली बैठक पार पडली ते फेब्रुवारी दरम्यान कच्छच्या रणात पहिली पर्यटनाविषयीची बैठक पार पडली याच दरम्यान एनर्जी ट्रान्समिशन वर्किंग ग्रुपची बैठक पार पडली या ग्रुपची पुढील बैठक गांधीनगर येथे होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले ते ११ फेब्रुवारी दरम्यान जागतिक हवामानांबद्दल विषयक कृतिगतची बैठक बेंगरुळु या शहरात संपन्न झाली १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान इंदोर या शहरात कृषी विषयक कार्य करणाऱ्या कृती गटाच्या कृषी उप सहाय्यकांची बैठक झाली सांस्कृतिक विषयक कार्य करणाऱ्या कृतिगतची पहिली बैठक खजुराहो या लेण्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या गावात २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान झाली याच दरम्यान लखनऊ या शहरात तीन दिवशीय बैठक झाली लखनऊ ला झालेल्या

बैठकीचा अजेंडा डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप हा होता १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन येथ मॉडेल ईंडिया जी २० हि एकदिवशीय बैठक पार पडली (सुषमा स्वराज या भारताच्या माजी विदेश मंत्री आहेत ज्या पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात विदेश मंत्री होत्या त्यांच्या नावाच्या वास्तूचे महत्व स्पर्धा परीक्षेसाठी मोठे आहे असो ) यामध्ये तरुणाविषयक कृती कार्यक्रमांची दिशा ठरवण्यात आली २२ ते २५ फेब्रुवारी रोजी बंगळुरू या शहरात जी २० देशांच्या वित्तमंत्री आणि देशांच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हनरनाची पहिली तर उप गव्हांरणाची दुसरी बैठक पार पडली . २६ आणि २७ फेब्रुवारी छत्रपती संभाजी नगर येथे सांस्कृतिक विषयक बैठक पार पडली या नंतर  फेब्रुवारी महिन्यात जी २०च्या बैठका झाल्या नाहीत

           मार्च महिन्याचा विचार करता ते मार्च यादरम्यान भष्ट्राचारविरोधी कृती गटाची बैठक गुरुग्राम येथे पार पडली (गुरुग्राम हे जरी एन सी आर मध्ये येत असले तरी हे हरियाणाच्या भाग आहे ) आणि मार्चला हैदराबाद या शहारत  आर्थिक एकत्रीकरणांसाठी कार्यान्वयीत झालेली पहिली जागतिक भागीदारी होतो  (First Global Partnership for Financial Inclusion)ची दुसरी बैठक झाली १५ ते १७ मार्च दरम्यान अमृतसर या शहरात शैक्षणिक विषयक कृतिगतची दुसरी बैठक पार पडली २१ ते २३ मार्च दरम्यान उदयपूर शहरात   दुसरी Sustainable Finance Working Group ची बैठक पार पडली २४ आणि २५ मार्चला चेन्नई या शहरात 

दुसरी  Framework Working Group ची बैठक पार पडली २४ मार्चलाच मुबंईत पहिले व्यापारविषयक बैठक पार पडली २८ ते ३० मार्च या दरम्यान विशाखापट्टणम या शहरात  Infrastructure Working Groupची बैठक झाली या प्रकारची हि दुसरी बैठक होती याच दरम्यान २९ ते ३१ मार्च दरम्यान चंदिगढ या शहरात दुसरी  Agricultural Deputies Meeting of Agriculture Working Groupची बैठक झाली ३० मार्च ते एप्रिल या दरम्यान गांधीनगर या शहरात पहिली  Disaster Risk Reduction Working Group ची बैठक झाली याच दरम्यान गांधीनगर या शहरात दुसरी Environment and Climate Sustainability Working Group (ECSWG)ची बैठक झाली या बैठकीबरोबर मार्च महिन्याची सांगता होते

       एप्रिल महिन्यात दार्जलिंगमध्ये पर्यटन विषयक गटाची दुसरी बैठक पार पडली ते एप्रिल यादरम्यानEmployment Working Group ची दुसरी बैठक गुवाहाटी येथे झाली

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?