अस्थिरतेचा मोठा इतिहास असणारा देश पाकिस्तान

     

मंगळवार ९ मे रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लमबाद येथे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नॅशनल अकाउंटशी ब्युरो (नॅब )ने  अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकाच आगडोंब उसळला आहे . एका ट्रस्टच्या जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी हि अटक करण्यात आली आहे इम्रान यांच्यावर पाकिस्तानात सुमारे १४० खटले दाखल करण्यात आले असून त्यातील एका खटल्यात अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी ते इस्लामाबाद  उच्च न्यायालयात गेले असता एका नाट्यमय घटनेनंतर त्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे हे समजल्यानंतर पाकिस्तानातील जनतेत खदखदत असलेला असांतोष बाहेर येऊन त्याने उग्र हिसंक रूप धारण केले त्यामुळे पाकिस्तनात सर्व देशात  जमाबंदी जाहीर करण्यात येऊन समाजमाध्यमाने बंद करण्यात आली आहे 
    तसे बघायला गेल्यास विरोधकांवर सुडाचे राजकारण करण्याची पाकिस्तानात मोठी पंरपरा आहे १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यावर आठवड्याभरात म्हणजेच २१ ऑगस्ट १९४७रोजी पाकिस्तानचे तत्कालीन गव्हनर जनरल मोहंमद अली जिना यांनी पाकिस्तानच्या वायव्य सरहद प्रांताचे सरकार राजकीय
आकसेपोटी बडतर्फ केले होते तसेच पाकिस्तानची राजधानी कराची करून सिंध प्रांताने हैदराबाद येथे वा  अन्य ठिकाणी सिंध प्रांताची राजधानी करावी या आपल्या मागणीमीध्ये हो ला हो न करता सिंध प्रांत आणि पाकिस्तानची राजधानी कराची शहरच असावे हा आपला मुद्दा लावून धरल्याने मोहंमद अली जिना यांनी त्यावेळचे सिंधचे मुख्यमंत्र्यास विविध खटल्यात जाणीपूर्वक अडवून टाकले मात्र या खटल्यातून ते सुटले हे बघून एक टाईपरायटर चोरला या आरोपाखाली त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली होती पाकिस्तानचे निर्माते मोहंमद अली जिना यांचा पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर एक वर्ष एक महिन्यात म्हणजे ११ सप्टेंबर १९४८ ला मृत्यू झाला हे बाब लक्षात घेता सिंधमधील राजकारण केव्हा सुरु झाले हे आपण लक्षात घेऊ शकतो 
           सन १९५१ ते १९५६ पर्यंत वारंवार बदलललेले पंतप्रधान  याचीच साक्ष देतात . ९० च्या दशकांत नवाझ शरीफ आणि बेनझीर भुट्टो यांच्या कार्यकाळात देखील याचा प्रत्यय येतो बेनझीर भुट्टो यांच्या सत्ताकाळात नवाझ शरीफ यांना देशाबाहेर दुबईत आश्रय घ्यावा लागला होता नवाझ शरीफ यांच्या कार्यकाळात बेनझीर भुट्टो याना देश सोडून लंडनला जावे लागले होते याच कार्यकाळात बेनझीर भुट्टो यांचे पती  पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी  कागृहात होते हे लक्षात घेता पाकिस्तान मधील राजकारणी व्यक्ती विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतात हे समजते ज्याला मागच्या वर्षी २०२२ साली एप्रिल महिन्यात माजी झालेले पंतप्रधान देखील इम्रान खान देखील अपवाद ठरले नाहीत 
       बांगलादेशची निर्मिती होण्यामागे जी अनेक कारणे होती त्यातील एक कारण शेख मुजुबुर रहेमान याना १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण पाकिस्तानचा विचार करता सार्वधिक जागा मिळल्यावरसुद्धा पंतप्रधानपद 
नाकारणे हे होते . शेख मुजुबुर रेहमान यान पंतप्रधानपदी रोखण्यामागे अनेक करणे होती त्यापैकी  राजकीय विरोधकाला सत्तास्थानापासून रोखणे हे देखील एक कारण होते हे नाकारून चालणार नाही
इम्रान खान देखील त्यांचे सरकार  राजकीय विरोधकांच्या भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणावर कायदेशीर कारवाई करत असल्याने विरोधकांनी एकत्र येत त्यांचे सरकार उलथवून टाकले असा आरोप केलाच आहे ते बघता अस्थिरतेचा मोठा इतिहास असणारा देश पाकिस्तान असे म्हटल्यास वावगे ठरत नाही 
#पाकिस्तान 
#Pakistan
#इम्रान_खान
#Imran_Khan 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?