शनी जयंती विशेष


यंदा
शुक्रवार 19मे रोजी वैशाख महिन्याची अमावस्या आहे. भारतीय  तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या  दिवशी भगवान सुर्याची प्रथम  पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळेकेलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला, असी धारणा आहेशनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते ,कृष्णवर्णीय झाले. या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला. त्यांनी त्यास हळू  चालण्याचा शाप दिला. पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती  चालगती अजूनच मंदावली. माझ्या माहितीनुसार  भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही. भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी  रंजक आहे, तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे

        गेल्या काही महिन्यापर्यंत शनी ग्रह 83 उपग्रहांसह सौरमालितील सर्वाधिक उपग्रह असणाऱ्या ग्रहांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.मात्र गुरु ग्रहाला 12नवे उपग्रह असल्याचे समजल्याने गुरु ग्रहाच्या उपग्रहांची संख्या ही 92झाल्याने शनी ग्रहांचा हा दर्जा गेला  शनीला असणाऱ्या 83उपग्रहांमध्ये. सर्वात मोठा उपग्रह टायटन तर बुध ग्रहाएव्हढा मोठा आहे.आपल्या सौरमालीकेतील ज्या एकमेव उपग्रहावर वातावरण आहे  तो म्हणजे

टायटन होय  ज्या खगोलीय वस्तूच्या उपग्रहावर आज हा लेख लिहीत असताना जीवनास आवश्यक असे वातावरण आहे. तसेच पाणी असण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांना वाटते तो उपग्रह  टायटन शनीच्याच उपग्रह आहेटायटनवर मिथेनचा मोठा साठा आहे .टायटनवर मिथेनचा पाउस पडत असावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. टायटनवर मिथेन वर जगणारे प्राथमिक स्वरुपाचे अमिबा सारखे जीव असावेत असे अनेक खगोल शास्त्रज्ञांना वाटते. पुढील अवकाशीय मोहिमांसाठी इंधन म्हणून या मिथेनचा उपयोग होइल, असे शास्त्रज्ञांना विश्वास आहे.दूर्बिणीतून बघीतल्यास पिवळ्या रंगाचा हा खगोलीय गोल वायूचा गोळा आहे. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर सुरवातीच्या काळात ज्या खगोलीय वस्तूवर ती प्रथमतः रोखण्यात आली, त्यापैकी एक म्हणजे शनी होय. शनी ग्रह हा त्याचा कड्यांसाठी प्रसिद्ध आहे..वास्तविक गुरु, शनी, युरेनस , नेपच्यून  या सर्व ग्रहांना कडे आहेत. मात्र कडी असलेला ग्रहाचा विचार करता सर्वप्रथम विचार येतो तो शनीचाच. शनीचा एखादा उपग्रह किंवा धुमकेतू शनीच्या प्रचंड जवळ आल्याने शनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचे तूकडे झाले तेच तूकडे आज कड्याचा रुपात फिरत आहेत. असा शास्त्रज्ञांचा कड्यांबाबत कयास आहे .ही कडी उंचीचा बाबतीत काही मीटर उंच आहे .मात्र त्यांचा विस्तार कित्येक हजार किलोमीटर आहे. हे एक कडे नसून विविध कडे आहेत. मात्र त्याची विभागणी सात प्रकारात करण्यात येत आहे. तसेच या कड्यांमध्ये कित्येक हजार किलोमीटरची फट देखील आहे. या फटीमधून शनीचे अनेक उपग्रह सुद्धा भ्रमण करतात .शनीची कडी पृथ्वीशी
काही अंशाचा कोन करतात त्यामुळे ती दिसतात. मात्र काही वर्षांनी ती एकाच पातळीत येतात.त्यावेळी शनी  ग्रहाचे  अवलोकन करणे  खुपच रंजक असते. या 2023ला 27आँगस्ट हा योग येत आहे. यावेळी शनी ग्रहाचे एका जाडसर रेषेमुळे दोन तूकडे तर झाले नाहीना असे वाटावे असे दृश्य दिसेल.यावेळी शनी कुंभ राशीत अत्यंत ठळक दिसत असल्याने लगेच ओळखु येईल

     शनीवर आतापर्यत तूलनेने कमी  अंतराळ मोहिमा झालेल्या आहेत. कँसिनी ही मोहिम यामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या मोहिमेमध्ये टायटन या उपग्रहाची आणि शनीच्या कड्यांची खुप रंजक माहिती मानवास मिळाली.व्हायजर आणि पायोनिअर मोहिमांनी सुद्धा शनीची अनेक छायाचित्रे टिपली. फ्लायबस ही सुद्ध शनीविषयक एक मोहिम प्रसिद्ध आहे.

सुर्याभोवती पृथ्वीचा विचार करता साडे 29 वर्षात एक प्रदक्षीणा करणारा शनी साध्या डोळ्याने दिसणारा सुर्यापासून सर्वात लांबचा ग्रह आहे. सुर्यापासून आपण जसजसे लांब जावू तसतसे ग्रहांचा सुर्याभोवती फिरण्याचा वेग कमी होतो.(जसे की पृथ्वी सेकंदाला 29किमी तर मंगळ 24 किमीने सुर्याभोवती फिरतो.) मात्र प्रदक्षणीचा मार्ग वाढतो .परीणामी त्यांचे एक वर्ष वाढते. याचमुळे शनी साडे29 वर्षात सुर्याभोवती एक चक्कर पुर्ण करतो.

ज्योतिषशास्त्राचा विचार करता शनीला न्यायदेवता मानण्यात आले आहे. शनी त्याचा साडेसातीमुळे प्रसिद्ध आहे. शनीला काळ्या वस्तूचे तसेच लोखंडाच्या वस्तूचे दान केल्यास पुण्य मिळते असे सांगितले जाते .मकर आणि कुंभ राशी या शनीच्या अधिपत्याखाली येतात. शनी देवाची पुजा शनिवारी आणि आमवस्येलाकरतात..शनिशिंगणापूर सारखी काही शनीची स्थाने देशात आहे असो

       शनीला उपग्रह खुप असल्याने ग्रहणांची शनीवर मजा आहे. शनीवर रोज ग्रहण होते का ? असे वाटावे इतक्यामोठ्या प्रमाणात शनीवर ग्रहणे होतात. सर्व ग्रहामध्ये शनीची घनता सर्वात कमी आहे. त्यामुळे तो जर पाण्यात टाकला तर तरंगेल असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.मी अनेकदा दुर्बिणीतून शनी ग्रह बघीतला आहे. शनीग्रह किंवा कोणताही खगोलीय अविष्कार बघणे यात अशुभ असे काही नाही उलट खुपच मजा आहे..तूम्ही पण बघा मग बघताय ना शनी ग्रह ?


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?