टाटायन ...प्रवास एका सामाजभान असलेल्या उद्योग घराण्याचा

       

  टाटा, आपल्या रोजच्या जगण्यातील अनेक उत्पादनाचे निर्माते . निव्वळ उत्पादनाचे निर्माते म्हणूनच टाटांची ओळख पुरेसी नाही. उत्तम उत्पादनाची विश्वासाह्यर्ता असणारा आणि त्याचवेळी सामाजिक भान असणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.स्वातंत्र्यपुर्व काळापासून अवाह्यत सुरु असणारा 150हुन अधिक वर्षाचा गौरवशाली इतिहास असणारा उद्योगसमुह म्हणजे टाटा उद्योगसमुह .आपल्या भारतात लोह पोलाद उद्योग, जलविद्युत प्रकल्प, विमान वाहतूक सेवा अस्या अनेक उद्योगाची पायाभरणी करणारा उद्योग समुह म्हणून टाटा उद्योगसमुह ओळखला जातो.या टाटासमुहाची सविस्तर माहिती हवी असल्यास आपणास ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहलेले "टाटायन", या पुस्तकाशिवाय  अन्य उत्तम तो पर्याय तो कोणता?  गिरीश कुबेर यांची भारतीय राजकारणाविषयीची मते अनेकांना आवडत नसली तरी ते क्षणभर बाजूला सारून  हे पुस्तक वाचल्यास टाटा समुहाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.मी सुद्धा हे पुस्तक नुकतेच वाचले.
                सुमारे साडेचारशे पानाच्या या पुस्तकात २३ प्रकारांतून लेखकानं टाटा उदयॊगसमूहाचा वटवृक्ष कश्या पद्धतीने फोफावला हे सांगितले आहे पुस्तकाची  पहिल्या प्रकरणात  मराठी मनुष्याची पैसे मिळवण्याच्या बाबतच्या अनास्थेवर लेखकाने तीव्र नापसंती नोंदवत तो हे पुस्तक लिहायला का प्रवृत्त झाला ? हे सांगितले आहे थोडक्यात यास पण जरी संपत्तीनिमितीतील सात्त्विकता असे नाव असले तरी ती ती एका अर्थाने प्रस्तावनाचं आहे 
पुस्तकाच्या  दुसऱ्या प्रकरणापासून पुस्तकाला खऱ्या अर्थाने सुरवात होते दुसऱ्या प्रकरणात टाटा उद्योगसमूहाचे
संस्थापक नुसरेवान टाटा यांच्या जन्मापासून त्यांच्यात वेगळा मार्ग निवडण्याची इच्छा कशी निर्माण झाली याविषयी सांगितले आहे पुढच्या काही प्रकरणात टाटा यांच्या अफू आणि कापसाच्या निर्यातीतून लोह पोलाद उदयॊगात कसा प्रवेश झाला ?  याविषयी माहिती मिळते पुस्तकाचे सामान तीन भाग केले असता पहिल्या भागाच्या अखेरीस आणि दुसऱ्या भागाच्या सुरवातीस टाटा यांनी उभारलेल्या टाटा मोमेरिबयलंस कॅन्सर हॉस्पिटलास सारख्या स्वयंसेवी संस्थांची निर्मिती कशी आणि कोणत्या स्थितीत झाली याविषयी लेखकाने आपणास माहिती दिली आहे पुस्तकाच्या अखेरच्या तिसऱ्या भागातील बराच मोठा भाग रतन टाटा यांच्याविषयी चर्चा करतो ज्यामध्ये त्यांनी टाटा उद्योगात कोणकोणत्या जवाबदाऱ्या स्वीकारल्या ज्या जवाबदाऱ्या स्वीकारल्या त्या कश्या प्रकारे पार पाडल्या .? उद्योगसमूहातील आपल्या विरोधकांच्या कारवायांचा कश्या प्रकारे बिमोड केला ? टाटा उदयोगातील कंपन्यांमध्ये टाटा परिवाराचे महत्व कसे वाढवले नॅनो या कर बाजरपेठेत दाखल कारण्यासासाठी काय कष्ट केले ? टाटाउद्योगसमूहाला आंतराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळण्यासाठी काय उपाययोजना केल्या आदी विषयी माहिती मिळते पुस्तकाच्या दुसऱ्या भागात टाटा यांनी जलविदुत क्षेत्र सौंदर्य प्रशसने निर्मिती तसेच टेल्को आदी कंपन्यांची निर्मिती कशी केली जे आर डी टाटांनी टाटा एरलाईन्सची सुरवात कशी केली याविषयी माहिती मिळते टाटा हॊटेल व्यवसायात कसे उतरले याची देखील माहिती या मध्ये मिळते अखेरच्या तिसऱ्या भागातील शेवटच्या प्रकरणात टाटा उद्योहसमूहात असणाऱ्या विविध कंपन्याची थोडक्यात ओळख लेखाने करून दिली आहे तर त्यांच्या आधीच्या शेवटून दुसऱ्या प्रकरणात टाटा उदयोगसमूह भविष्यात कोणत्या वाटेवरून जाऊ शकतो यावर भाष्य केले आहे 
      आपल्या भारतात भविष्य निर्वाह निधीची सुरवात टाटांनी केली  कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱयांच्या कल्याणसासाठीकंपनीने काहीतरी केले पाहिजे हे जाणीव सर्वप्रथम टाटा यांना होती अश्या अनेक  बाबी या पुस्तकामुळे मला समजल्या हार्ड बाउंड असेलेले हे पुस्तक मुखपृष्ठामुळे अत्यंत रंजक झाले आहे आहे पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर निळ्या रंगातीलटाटाच्या बोधचिन्हांखेरीज अन्य काही नसल्याने पुस्तक पाहता क्षणीच हातात
घेतल्याखेरीज राहवत नाही आपल्या भारतीयांसाठी टाटा म्हणजे सचोटीच्या विश्वासाच्या पायावरची उद्यमशीलता ज्याच्या प्रत्यय पुस्तक वाचताना सातत्याने येतो पुस्तकाची भाषा सहजसोपी आहे त्यामुळे हे पुस्तक निव्वळ टाटा घराण्याची माहिती कोणत्या टाटाने काय केल काय केले नाही कोणत्या ताटाशी सरकार कसे वागले याची निवव्वळ कंटाळवाणी माहिती वाटत नाही ज्यामुळे वाचताना नवीन काहीतरी माहिती मिळायचे भावना हमखास होते मग वाचणार हे पुस्तक 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?