भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास प्रारंभ 

         


 भारत बांगलादेश मैत्रीच्या नव्या अध्ययास २ मेला  प्रारंभ झाला आणि याला कारणीभूत ठरला तो बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हन्यू  ने जाहीर केलेला एक निर्णय . या निर्णयानुसार बांगलादेशची सुमारे ९० % आयात निर्यात होत असलेल्या चितगाव (बंगाली उच्चार चितोग्राम )  बंदराचा आणि बांगलादेश मधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असलेल्या मोंगला बंदराचा भारताने कयमस्वरूपी वापर करण्याची   परवानगी बांगलादेशकडून देण्यात आली आहे यामुळे ईशान्य भारतात भारताच्या अन्य भागातून काही सामान पाठवणे तसेच ईशान्य भारतातून भारताच्या अन्य प्रदेशात सामानांची पाठवणी करणे सोईस्कर झाले आहे 

         बांगलादेशचा वापर न केल्यास पश्चिम बंगाल मधून त्रिपुरा मिझोराम आदी  राज्यात काही सामान पाठवायचे असल्यास सुमारे दीड हजार किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते हा मार्ग भारतीय सुरक्षेतीचा विचार करता संवेदनशील असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉर मधून जातो याउलट बांगलादेशचा वापर केल्यास हे अंतर काही शे किलोमीटर इतके कमी होते त्यामुळे केंद्र सरकार ईशान्य भारताशी अन्य भारताचा संपर्क वाढवण्यासासाठी बांगलादेशचा वापर करत सामानाची आणि काही प्रमाणात प्रवाश्यांची ने आण करण्याच्या प्रयत्नात आहे त्या मालिकेतील महत्त्वाच्या दुवा म्हणून या घटनेकडे बघावे लागेल  रेल्वेमार्ग आणि रस्तेमार्गाने
दळणवळणाच्या दृष्टीने बांगलादेशचा वापर करण्यावर या आधीच कार्यवाही सुरु करण्यात आली आहे भारतातून  बांगलादेशात    कोलकत्ता ते ढाका , न्यू जलपाइगुडी  ते ढाका आणि कोलकत्ता ते  खुणला या तीन मार्गवर प्रवाशी रेल्वेगाड्या चालवल्या जातात याखेरीज सहा मार्गाने रेल्वेच्या माध्यमातून   मालवाहतूक होते  त्रिपुरा या राज्याची राजधानी अगरतळा मधून  बांगलादेशात रेल्वेमार्ग बांधण्याचे काम भारताच्या बाजूला पूर्ण झाले असून जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरून बांगलादेशात अडकलेले कामकाज आता सुरु होऊन वेग पकडत आहे  त्यामध्ये आता जलमार्गाची भर पडली  आहे 
         या जलमार्गावर मालाची नेआण करण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्येच बोलणी पूर्ण झाली होती मात्र बांगलादेशाकडून या मार्गावर मालवाहतूक सुरु करण्याच्या आधी पूर्ण झाली पाहिजे अशी कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण न झाल्याने तसेच कोव्हीड १९च्या  साथरोगामुळे दळणवळण विस्कळीत झाल्यामुळे ते त्यावेळी सुरु होऊ शकले नाही जे आता होत आहे  या मार्गावरून मालाची वाहतूक करताना भारतीय व्यापाऱयांना कस्टम ड्युटी म्हणून प्रति टन ३० टक्का आणि  प्रशाकीय खर्च  तसेच प्रवाशी शुल्क म्हणून प्रत्येकी १०० टक्का   प्रति टन असे एकूण २३० टक्का प्रति टन  द्यावे लागणार आहे  एका भारतीय
रुपयात सव्वा  टक्का मिळतो.  टक्का हे बांगलादेशचे चलन आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे ज्या मालाची आयात किंवा निर्यात करण्यास बांगलादेशात मनाई आहे त्या मालाची वाहतूक करता येणार नाही असे बंधन यामध्ये घालण्यात आले आहे  या नव्या मार्गामुळे मेघालयातील दवाकी त्रिपुरा राज्यातील बीबीर बाझारआणि अगरताळा आणि  , सुतारकंडी या आसाम राज्यतील गावासह ईशान्य भारतातील ८ महत्वाच्या  शहरात माळ पोहोचवणे आणि तेथून अन्य भारतात माळ आणणे सोईस्कर झाले आहे ज्यामुळे विकासाच्या बाबतीत काहिस्या मागे पडलेल्या ईशान्य भारतात विकास करणे सोईस्कर होणार आहे जे स्वागताहार्यच आहे त्यामुळे बांगलादेशचा  हा निर्णय भारतासासाठी महत्त्वाचा आहे 
#बांगलादेश
#Bangaladesh
#भारताचे_परराष्ट्र_धोरण
#Indias_forgin_policy 
#भारताचे_शेजार_आणि_भारत
#Indias_neghibour_and_India

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?