मानवाच्या मूलभूत गरजेवर सविस्तर माहिती देणारे पुस्तक "संवाद "

     

 
हिंदू मान्यतेनुसार या पृथ्वीवर मानवाखेरीज विविध प्रकारचे ८४ लाख  वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जीवन जगत आहेत या ८४ लाख प्राण्यमध्ये मानवाचे ते वेगळे वैशिष्ट म्हणजे अन्य प्राण्यांपेक्षा अत्यंत विकसित झालेले स्वरयंत्र . या स्वरयंत्राच्या मदतीने मानवप्राणी विविध भाषा बोलू शकतो दुसऱ्या व्यक्तीशी अन्य प्राणी दुसऱ्या प्राणाशी ज्या प्रमाणे संवाद साधतात त्या पेक्षा प्रगव असा  संवाद साधू शकतो भाषेपासून सुरु झालेली संवादाची हि प्रक्रिया आता फेसबुक सारख्या  समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आहे या  प्रक्रियेच्या आतापर्यंतच्या टप्यात मनुष्याच्या संवाद साधण्याच्या प्रकियेत मोठ्या प्रमाणात बदल झाले जसे अश्यामुगीन मनुष्याने काढलेली चित्रे  कबुतरे निरोप्या ,  पोस्ट  टेलिग्राफ , टेलिफोन वर्तमानपत्रे ,मोबाईल ,इंटरनेट आदी मात्र या वाटचालीला मोठा कालखंड  जाऊ द्यावा  लागला हे बदलपरिकथेप्रमाणे चुटकीसरशी झालेले नाहीत तसेच हे बदल एखाद्या एका व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसमूहाने केले नाहीत या विकासासाठी अनेक व्यक्तीचे योगदान आहे मनुष्याच्या संवादाच्या विकासाच्या या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वच व्यक्तींची नोंदही आपल्याकडे नाही अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तीचे परिश्रम या साठी लागलेले आहे मानवाच्या या वाटचालीचा इतिहास मोठा रंजक आहे हा रंजक इतिहास आपल्या मराठीत आणला आहे मराठीत विविध ज्ञान शाखांची माहिती पुस्तकांद्वारे करून देणारे ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या संव्वाद या सुमारे पावणे सहाशे पानाच्या पुस्तकातून आपल्याला हे इतिहास मुळासकट समजतो नाशिकमधील महत्वाची सांस्कृतिक संस्था सावर्जनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने मी हे पुस्तक नुकतेच वाचले 
    सुमारे पावणेसहाशे पानांच्या या पुस्तकात १५ प्रकरणातून लेखकाने मानवी समूहात भाषेचा उगम कशा झाला ? पूर्वी संदेशवहनाच्या कोणत्या पद्धती वापरल्या जात असत ? पोस्ट या संकल्पनेचा उदय कशा झाल्या पोस्ट या संकल्पनेत वेळोवेळी कसे बदल झाले ? तार यंत्रणेचा विकास कश्या प्रकारे झाला त्या साठी अमेरिका आणि युरोपातील व्यक्तींनी काय हालअपेष्टा सोसल्या . तार यंत्रणेचा शोध लागल्यावर त्याचा विस्तार करण्यासाठी मानवाने काय काय गोष्टी केल्या ? टेलिफोन आणि मोबाईलचा शोध कसा लागला ? सध्या संदेश जनसामान्यात पोहोचण्यात म्हह्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्तमानपत्राचा विकास कश्या प्रकारे होत गेला ? वर्तनमानपत्राच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकार आणि वृत्तसंस्थेचा विकास कसा कसा होत गेला इंटरनेटचे कार्य मुळातून कसे चालते ? त्याचा शोध कोणत्या कारणाने लागला  ? फेसबुक सारख्या समाज माध्यमांचे कार्य कसे चालते आदी विषयांची अत्यंत सविस्तर माहिती देण्यात आली आहे सुमारे पावणे सहाशे पानाच्या या पुस्तकात दोन कॉलमचा वापर करत अन्य नेहमीच्या पुस्तकांपेक्षा काहीसा कमी फॉन्ट वापरत माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे आपण समजू शकतो या पुस्तकात किती माहिती देण्यात आली आहे पुत नसून अच्युत गोडबोले यांच्या अन्य पुस्तकासारखेच याही पुस्तकाची भाषा सहज सोपी आहे त्यामुळे पुस्तक रंजक झाले आहे अच्युत गोडबोले यांची पुस्तके वाचणाऱ्यास मोठया प्रमाणात ज्ञसमृद्ध करतात संवाद हे पुस्तक देखील यास अपवाद नाहीये 

   कोणत्याही मनुष्याची मूलभूत म्हणता येईल अशी गरज  संवादाची आहे त्यामुळे अनेकदा अट्टल गुन्हेगारांना  तुरुंगात अन्य कैद्यांपेक्षा वेगळे ठेवतात ज्यामूळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊन असे कैदी पुढे तुरुंग प्रशासनास सहकार्य करतात काही मानववंश शास्त्रज्ञांच्या मते एखाद्या मुनष्यास जर जास्त काळ एकांतात ठेवले तर संबंधित व्यक्ती मनोरुग्य होनाची दाट शक्यता आहे  तत्यामुळे या संवादाची कुळकथा सांगणारे पुस्तक किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे असे मला वाटते मग वाचणार ना हे पुस्तक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?