पेटते पश्चिम बंगाल

 


भारताच्या अध्यात्माची पाश्चात्य जगातला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद , भारतात रसायनशास्त्रावर आधारित उद्योगाची पायाभरणी करणारे प्रफुल्लचंद्र रे , भारताला साहित्य क्षेत्रातील नोबेल देणारे रवींद्रनाथ टागोर . अर्थशास्त्रज्ञांचे नोबेल देणारे अमात्य सेन ,  ज्येष्ठ क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस,  .आणि  बिपिनचंद्र पाल बाँलीवूडची जगाला उत्तम ओळख करुन देणारे सत्यजित रे . भारतात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे राजा राममोहन रॉय .एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या या सर्व व्यक्तींमधे एक सामान दुवा आहे . या  सर्व व्यक्ती बंगाली आहेत  बंगाल गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे अत्यंत सुपीक झालेला प्रदेश त्यामध्ये तागासारख्या नगदी पिकांमुळे शेतीही समृद्ध म्हणावी अशी .त्या मध्ये सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या सारख्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींमुळे  त्यात तर सोन्याहून पिवळे होण्यासारखी स्थिती.  भारतात सर्वाधिक पुस्तके बंगाली भाषेत वाचली जात असल्याचा इतिहास आहे.

मात्र आजमितीस बंगालची स्थिती अत्यंत वाईट आहे . भारतातील सर्वात जास्त रस्त्यावरील भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत . बंगालमध्ये अत्यंत गरिबी आहे जीडीपी आणि कर्ज यांचे प्रमाण भयावह स्थितीत पोहोचले आहे औद्योगिकीकरण नसल्यातच जमा आहे राज्यातील लोकांना उदरनिर्वाहासाठी अन्य राज्यात आश्रय घ्यावा लागत आहे .  राजकीय स्थितीमुळे शेती मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली आहे .लोकांच्या हातात काम नसल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे . लोकांना हातात काम नसल्याने राजकीय नेत्यांचे मोठ्या प्रमाणात फोलावले आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी राजकारणी व्यक्ती मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला हाताशी धरत आहेत. आपले जीवनमान या तरी व्यक्तीमुळे उंचावेल त्या व्यक्तीमुळे तरी उंचावेल ,या आशेवर सर्वसामान्य जनता एका राजकारणी व्यक्तीकडुन दुसऱ्या राजकारणी व्यक्तींकडे जात आहे. भरीस भर म्हणून आपल्या राजकीय

विरोधकांचे खुन करण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एकंदरीत स्व विकासाच्या अमाप संधी असून देखील अत्यंत अडचणीत असणारे राज्य म्हणजे बंगाल असे म्हणता येवू शकते. एका अहवालानुसार जर बंगाल या स्थितीतून बाहेर पडल्यास भारताच्या प्रगतीत मोठे योगदान देवू शकणारे राज्य म्हणजे बंगाल होय

   येत्या 8 जूलैला बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका असल्याने, राजकीय हत्यांना प्रचंड वेग आला आहे. विद्यमान सत्ताधिकारी तृणमूल क्राँगेसकडून आपल्या लोकांना जाणीवपूर्वक संपवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसे बघायला गेलो तर बंगालमध्ये राजकीय हत्यांचा मोठा इतिहास आहे.जमिनदारांकडून अत्याचार होत असल्याने त्याच्या विरोधात  नक्षलबारी या बंगालमधील एका खेड्यात चारु मुजुमदार यांनी सुरु केलेली आणि पुढे साम्यवादी विचारसरणीच्या आहारी गेलेली चळवळ म्हणजे नक्षलवाद (नक्षलबारी गावात सुरु झाली म्हणून यास नक्षलवाद म्हणतात) 1966ला सुरु चळवळीच्या स्वरुपात सुरु झालेल्या या नक्षलवादाला आलेले विधायक स्वरुप म्हणजे 1978पासून निवडणूकीच्या मार्गाने आलेली कम्युनिस्ट पक्षाची सत्ता. जगात क्रांती न करता निवडणूकीच्या मार्गाने कम्युनिस्ट सत्तेत आल्याचे दोनच उदाहरणे आहेत,एक म्हणजे केरळ आणि दुसरे म्हणजे पश्चिम बंगाल. 1978ला.सत्तेत आल्यानंतर काही काळ बंगालने प्रगती केली.मात्र कम्युनिस्ट पक्षाच्या नेर्तत्वाखालील कामगरांच्या संघटनेमार्फत सातत्याने संप होत असल्याने उद्योजकांनी कंटाळून बंगाल सोडले, परीणामी बेकारी वाढण्यास सुरवात झाली ही परीस्थिती ओळखुन सावध करणारे शोषितांचा विरोधात असे समजून कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांचा आवाज दाबण्यात आला. परीणामी विरोधकांना संधी मिळताच त्यांनी कम्युनिस्टांचा आवाज दाबला आणि यातून आवाज दाबण्याची परंपरा सुरु झाली. जो सत्तेत आला त्याने विरोधकात असणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विरोधकांचा आवाज दाबण्यास सुरवात केली आणि सुरु झाले राजकीय हत्येचे सत्र.आज सत्तेत तृणमूल क्राँगेस सत्तेत असल्याने त्याच्यावर राजकीय हत्यांचा आरोप होतोयं इतकंच .मात्र पुर्वी तृणमूल क्राँगेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. 

हे थांबले तर फक्त बंगालच्याच नव्हे तर भारताच्या देखील आनंदाचे असेल,हे नक्की.कारण लेखाच्या सुरवातीला जी प्रातनिधीक नावे घेतली,त्यावेळची गुणवत्ता अजून बंगालमध्ये आहे, ती फुलण्यासाठी आवश्यक आहे, शांतता. जी मात्र बंगालच्या नशिबी नाही. 8जूलैच्या निवडणूकीपर्यत या राजकीय हत्यांचा संख्येत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय.तो खोटा ठरण्यातच आपले हित आहे, हे नक्की 

#पश्चिम_बंगाल #राजकीय_हत्या #तृणमूल_क्राँगेस #ममता_बँनर्जी

#west_Bengal #pilitical_murder, 

#TMC

#Mamta_Banrji 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?