भारत कंबोडिया संबंध मैत्रीच्या नव्या वळणावर

             


   आपल्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा प्रभाव जगभरात आहे भारताच्या सभोवतालचे देशच नव्हें तर त्या पासून दूर  असणाऱ्या देशांवर देखील फार  पूवीपासून भारताचा प्रभाव आहे  . कंबोडिया हा अशाच एक देश आशिया  खंडाच्या आग्नेय दिशेला असलेल्या  इंडो चायना  भागातील भारताचा प्रभाव असणारा देश . युके (इंग्लड )सारखी घटनादत्त राजेशाही असणाऱ्या या देशाचे राष्ट्रप्रमुख अर्थात  विद्यमान  कंबोडियाचे राजे  नोरोडोम सिहामोनी यांनी 29 मे  ते  31 मे या  कालावधीत भारताचा दौरा केला  भारत आणि कंबोडिया यांच्यातील राजनैतिक संबंधांस  70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा दौरा आयोजित करण्यात आला होता  1952 मध्ये त्यांच्या  तत्कालीन राजाने  भारताला भेट दिल्यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते त्यास यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत1952 च्या त्या भेटीनंतर विद्यमान राजे नोरोडोम सिहामोनी  यांचे वडील  वडील नोरोडोम सिहानोक यांनी सन १९६३ साली . भेट दिली होती    नोरोडोम सिहामोनी यांचे  राष्ट्रपती भवनात भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी स्वागत केले आणि त्यांना सेरेमोनिअल गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नंतर  दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना  नोरोडोम सिहामोनी  यांनी आदरांजली वाहिली.

                 या भेटीदरम्यान महामहिम नोरोदोम सिहामोनी यांनी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान  उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी कंबोडियाचे राजांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. कंबोडियाचे  राजा नोरोडोम सिहामोनी यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रपतींनी सांगितले की, भारत आणि कंबोडियामध्ये समृद्ध संबंध आहेत आणि भारत आपल्या सामायिक इतिहासाला महत्त्व देतो. राष्ट्रपतींनी नमूद केले

की दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीत आणखी वाढ होण्याची मोठी क्षमता आहे पर्यटन आणि लोक-लोक संपर्क वाढवण्याच्या गरजेवर आपल्या राष्ट्रपतींनी भर दिला. या वर्षी जानेवारीमध्ये व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिटच्या उद्घाटन सत्रात कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांच्या सहभागाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. गेल्या वर्षी अशियन या प्रादेशिक संघटनेच्या  अध्यक्षपदी असताना यशस्वीपणे आयोजन केल्याबाबद्दल तिने कंबोडियाचे अभिनंदन केले. 

                  पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी सुद्धा  राजा सिहामोनी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सखोल सभ्यता संबंध, मजबूत सांस्कृतिक आणि लोक-जनतेतील संबंध अधोरेखित केले. क्षमता वाढवणे, मानव संसाधनांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रकल्पांसाठी सहाय्य प्रदान करणे यासह विविध क्षेत्रात कंबोडियासोबत द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याच्या भारताच्या संकल्पाचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. कंबोडियाचे राजे  नोरोडोम सिहामोनी यांनी भारतातर्फे कंबोडियाच्या  विकास कारण्याबाबत उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनाबाबबत पंतप्रधानांचे आभार मानले आणि G-20 च्या भारताच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे कौतुक आणि शुभेच्छा व्यक्त केल्या

       कंबोडिया हा देश वर्तमान स्थितीत बोद्धधर्मीय असला तरी जगातील क्षेत्रफळाच्या विचार करता हिंदू धर्मियांचे जगातील सर्वात मोठे मंदिर हे कंबोडिया आणि लाओस या देशांच्या सीमेवर आहे सदर मंदिर नक्की कोणाच्या हद्दीत आहे त्यावर मालकी कोणाची? या साठी सदर देश सातत्याने भांडत असतात मध्य युगीन इतिहासात दक्षिण भारतातील अनेक राजवंशाच्या काळात या प्रदेशाशी भारताचा प्रामुख्याने दक्षिण भारताचा व्यापार चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात सुरु झालेल्या लुक ईस्ट पॉलिसीचा विचार करता

हा दंश अत्यंत महत्त्वाचा आहे भारताच्या परसदाराची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असोसशियन साऊथ ईस्ट एशियन कंट्री अर्थात अशियन या संघर्टनेच्या एक महत्वाच्या घटक म्हणून कंबोडिया ओळखला जातो भारतीय नागरिक मोठ्या ससंख्येने या भूभागास भेट देत असतात त्या   पार्श्वभूमीवर ह्या दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे 

#भारताचे परराष्ट्र धोरण #नरेंद्र मोदी #कंबोडिया
#India_forgin_policy
#Narendra_Modi
#Cambodia

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?