फक्त 17कमी !

फक्त 17 कमी!  शीर्षक वाचून चमकलात ना? कस्यासाठी 17कमी?, असा प्रश्न तूमच्या मनात निर्माण झाला असेल तर सांगतो , फक्त 17कमी ही बाब, भारताच्या बुद्धीबळ गँडमास्टरच्या संदर्भात आहे. भारताचे हा मजकुर लिहीत असताना 83ग्रँडमास्टर झाले आहेत. अजून १७ ग्रँडमास्टर झाल्यावर भारतात ग्रँडमास्टरांच्या संख्येचे शतक होईल. आपल्याकडे 100 या संख्येचे विशेष महत्त्व आहे. वयाची 100वर्ष पुर्ण करोत, किंवा एखाद्या खेळाडूने 100वा सामना खेळो त्याकडे विशेष बाब म्हणून बघण्यात येते आणि 83 या संख्येत 17 मिळवले की 100 ही संख्या तयार होते.म्हणून म्हटले अजून 17 बाकी आदित्य सामंत हे भारताचे 83वे ग्रँडमास्टर ठरले आहेत.

  त्यांनी 28व्या अबू धाबी मास्टर्समध्ये पहिला GM नॉर्म आणि 3ऱ्या एल लोब्रेगॅट इव्हेंटमध्ये दुसरा नॉर्म मिळवला.बील मास्टर टूर्नामेंट ओपनमध्ये शानदार कामगिरीसह, ते भारताचा 83वा जीएम बनले 8 फेऱ्यांनंतर आदित्य यांचे सहा गुण झाले आहेत आणि ते सध्या बिएल मास्टर्सच्या पुढील फेरी खेळत आहेत. मात्र त्यामुळे

परिणामावर काही फरक पडत नाही कारण त्यांनी ग्रँडमास्टर नॉर्मसाठी अगोदरच आवश्यक आवश्यकता पूर्ण केल्या आहेत.

गँडमास्टर हा बुद्धीबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणाऱ्या, फेडरेशन इंटरनँशल डि इचेस अर्थात फिडे या संक्षीप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या संघटनेमार्फत खेळाडूंच्या खेळातील कामगिरीचे गौरवीकरण करण्यासाठी देण्यात येणारा किताब असतो. जो फिडेकडून देण्यात येणारे गुणांकन 2600 झाल्यावर खेळाडूंकडून अन्य तीन निकष पुर्ण केल्यावर देण्यात येतो.जो खेळाडूला आयुष्यभरासाठी असतो. 

भारतीय बुद्धीबळ क्षेत्रात जी गौरवास्पद कामगिरी झाली आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला तो बुद्धीबळ खेळाशी संबंधित असो किंवा नसो प्रत्येकाला आनंदच झाला असणार, यात शंका नाही. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?