नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी, एसटीचा चाहता मात्र आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत, महाराष्ट्रातील नागपूर  या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे. माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे. या गृपवर सध्या  आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे
 उपनगर असलेल्या दापोडीत  असणाऱ्या  वर्कशॉपमध्ये  BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत. एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे.
   या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर+सिटर ही बससेवा होती. (लाल आणि पांढरा पट्टा असणाऱ्या बसेस) पुर्णतः स्लीपर असी सेवा नव्हती.जी कमतरता आता पुर्ण झाली आहे. तसे बघायला गेलो तर राजस्थान सारख्या इतर काही राज्यांच्या एसटीत या प्रकारची बससेवा या आधीच आलेली आहे. दुपारी दिडच्या सुमारास नाशिकच्या महामार्ग बसस्थानकावर राजस्थान एसटीची शिर्डी ते उदयपूर ही बस येते.ती याच प्रकारची बस असते मात्र एकेकाळी देशाला चांगल्या बससेवेचे उदाहरण दाखवणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटीने यामध्ये शेवटी का होईना उडी घेतली, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
    माझ्या मते आपल्या एसटी महामंडळाने लांबच्या मार्गावर या बसेस चालव्यात.लांबचा मार्ग निवडताना ज्या मार्गावर अन्य प्रवासी सेवा ज्या मार्गावर आहेत, असे मार्ग निवडू नयेत कारण त्यावर आधीच सेवा सुरु असल्याने महामंडळाला स्वतः ची जागा तयार करणे अवघड असेल. नाशिकहुन रात्री आठ वाजता सुटणारी नाशिक अहमदाबाद ही बस नाशिकहून अहमदाबादला जाताना  दिंडोरी सापुतारा, वाजदा, चिखली या जवळच्या मार्गाने न जाता पेठ धरमपूर, वापी ,चिखली या काहीस्या लांबच्या मार्गे जाते.  मार्ग काहीसा लांबचा असला तरी या मार्गावर इतर खासगी ट्ँँव्हल्स कंपन्या नसल्याने हा मार्ग प्रचंड नफ्यात आहे. आपल्या एसटीकडून पुर्णतः स्लिपर  बससेवा सुरु करताना असे नवे मार्ग निवडणे आवश्यक आहे 
 आपल्या एसटी महामंडाकडून अनेक नवीन सेवा सुरवातीला नाशिक ते पुणे, मुंबई ते  नाशिक ,पुणे ते कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर ते पुणे, कोल्हापूर ते सांगली अस्या कमी लांबीच्या मात्र प्रचंड कमाई देणाऱ्या मार्गावर देण्यात येतात..मात्र हे मार्ग अंतराच्या बाबत खुपच कमी आहेत. त्यामुळे या मार्गावर ही सेवा सुरू केल्यास तो आत्मघातकीपणाच ठरेल. उदाहरण म्हणुन नाशिक ते  पुणे या मार्गाचे उदाहरण देवूया .रस्ता सुधारल्याने आता हा प्रवास जेमतेम 4तासात होतो.आता या मार्गावर ही सेवा समजा रात्री अकरा वाजता सूरु केल्यास ती गाडी पहाटे तीन वाजता मुक्कामी पोहचेल. आता रात्री तीन वाजता प़ोहचत असल्याने प्रवास संपल्यवर झोपेचा त्रास होणे स्वाभाविक .जर ही बस मध्यरात्री दोन वाजता सोडुन पहाटे सहाच्या सुमारास मुक्कामी पोहचवल्यास मध्यरात्री दोन पर्यत जागणे झाल्याने याही प्रकारे झोपेचे नुकसानच होणार.  मी नाशिक पुणे या रस्त्याचे उदाहरण तूम्ही अन्य ठिकाणी देखील वापरु शकतात..नाशिक ते लातूर(सध्याची वेळ सकाळी पाच आणि सायंकाळी सहा) ,नाशिक ते कोल्हापूर,(सध्याची वेळ रात्री आठ) नाशिक ते अहमदाबाद मार्गे  पेठ धरमपूर वापी(सध्याची वेळ रात्री आठ) धाराशिव ते बंगळूर, सुरत ते धाराशिव(धुळे छत्रपती संभाजीनगर  मार्गे आणि नाशिक अ.नगर मार्गे) हैद्राबाद ते  धाराशिव, या सारख्या दहा ते बारा तास प्रवास असणाऱ्या मार्गावर ही सेवा विशेष फायद्याची ठरेल.
तसेच या गाड्याची वेळ कसी निश्चित करण्यात येते,हे देखील महत्त्वाचे आहे. दूपारच्या प्रवासास शक्यतो स्लिपर सिटची गरज लागत नाही. ती मुख्यतः रात्री लागते.मात्र या आधी मी अनेकदा आपल्या महाराष्ट्र एसटीच्या सिप्लर +सिटर बसेस या दुपारी चालवण्यात येवून रात्री त्यांच्या कमाइच्यावेळी डेपोमध्ये विविध कामासाठी थांबलेल्या बघीतल्या आहेत. पुर्णतः स्लिपरच्याबाबतीत आपण ही चूक टाळायला हवी. गाडी पुर्णतः स्लिपर असल्याने नेहमीच्या  सिटर बसपेक्षा निश्चितच तीचे भाडे जास्त असणार अस्यावेळी जास्तीचे भाडे देवून दूपारी या गाड्यांमधून प्रवासी प्रवास करतील, याबाबत  मलातरी खात्री नाहीये.
    तसे या प्रवासात प्रामुख्याने वरच्या बर्थच्या स्वच्छताकडे विशेष लक्ष देण्याची खुप गरछ आहे. खालच्या बर्थची स्वच्छता सहजतेने होईल.मात्र वरच्या बर्थची स्वच्छता करण्यात कुचराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही एसटीने याबबत काळजी घ्यायला हवी. 
हे मुद्दे झाले सहजतेने  करता येणाऱ्या मुद्यांबाबत आता एका अवघड मुद्यांवर मी आपले लक्ष वेधून लेखाच्या शेवट करणार आहे तर मित्रांनो, प्रामुख्याने रात्रीच चालवणे फायदेशीर असणाऱ्या एसटीच्या या प्रकरातील.बसला थांबे ठरवताना देखील काळजी घ्यावी लागेल.तूम्ही रात्री नाशिक ते बेळगाव या मार्गावर बससेवा सुरु केल्यास त्या बसेसला नांदूर शिंगोटे, वावी, चंदनापुरी, बोटा असे थांबे दिल्यास बस सातत्याने थांबत असल्याने थेट प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना झोपेबाबत त्रास सहन करावा लागू शकतो परीणामी ते  या बसेसमधून प्रवास टाळण्याची  शक्यता आहे. रात्र आहे, इथेच तर जायचे आहे. महिला लहान मुल मुली आहेत यासरखी कारणे देत प्रवासी कंडक्टरवर विनाकारण दबाव आणू शकतात. अस्यावेळी प्रवाशी नाकारणाऱ्या कंडक्टरवर कारवाई करू नये. मी माझ्या एसटी बसप्रवासात अनेकदा सार्वजनिक बससेवा म्हणजे स्वमालकीची बससेवा असल्यासारखे कुठेही बस थांबवण्यास सांगणारे बस प्रवासी बघीतले आहेत. या प्रकारे बस थांबवल्यामुळे अनेक व्यक्ती बसपासून लांब गेलेले आहेत. याबाबतचा माझा एक अनुभव असा आहे की मी एकदा अ नगरहुन नाशिकला येत होतो.बस द्वारका  या ठरलेल्या थांब्यावर थांबली असताना एका प्रवाश्याने बस त्यापुढे थांबा नसलेल्या वडाळ नाका सारडा सर्कल या ठिकाणी बस थांबवयाला सांगितली.त्याचे म्हणणे होते की, द्वारकावर नाही तर त्याचे घर सारडा सर्कलवर असल्याने बस तिथे थांबली पाहिजे. असे प्रकार बंद झाल्याशिवाय ही बससेवा नफ्यात येणे अशक्यच आहे.
मात्र ही नविन बससेवा फायद्यात येवो ही इश्वरचरणी प्रार्थना 
अजिंक्य तरटे 
9552599495
9423515408

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?