दक्षिण कोरियाचा घटनेतून आपण काय बोध घेणार ?

         

 गेल्या बुधवारी अर्थात २० सप्टेंबर रोजी दक्षिण कोरिया या देशाच्या संसदेने एक शिक्षण विषयक कायदा केला . जो  कायदा आपल्या भारताला देखील खूप काही शिकवून जाणारा आहे  शिक्षणाचा सर्वगाडा ज्या शिक्षकांवर असतो त्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या संबंधावर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा कायदा आहे .एका २३ वर्षीय शिक्षकाने पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्रासून जाऊन आत्महत्या केल्याची काळी किनार या कायद्यास आहे. या कायद्यान्वये शिक्षकांना पालकांनी तक्रार केल्यावर लगेचच कामावरून कमी करण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे तसेच त्यांना कायदेशीर मदत पुरवणे , तसेच त्यासाठी योग्य  प्रमाणात आर्थिक मोबदला देणे या जवाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर  सोपवण्यात आल्या आहेत  तसेच शिकवताना अडथळा आणणाऱ्या विद्यार्थ्यास माफक प्रमाणात शिक्षा करणे आधी अधिकार मिळणार आहेत .या प्रकारच्या कायदा करण्यात यावा या साठी दक्षिण कोरियातील शिक्षकांनी देशभर आंदोलन केले होते    (दक्षिण कोरिया हा टीचभर क्षेत्रफळाचा देश आहे )  ज्याच्या परिणामस्वरूप हा कायदा करण्यात आला देशातील शिक्षकवृदाकडून याचे स्वागत करण्यात आले आहे 
           या पार्श्वभूमीवर हा कायदा आपल्यासाठी देखील महत्वाचा आहे मस्तीखोर मुलांना शिक्षा कोणत्या प्रकारे कराव्यात ? शिक्षक आणि पालक सहसंबंध कोणत्या प्रकारे असावेत ? शिक्षकांना कोणते अधिकार असावेत ? त्यांच्या स्वतःच्या कुटूंबियांची होरपळ होऊ नये यासाठी काय करता येऊ शकते  या प्रकारच्या अनेक बाबीविषयी आपल्यासाठी  हा कायदा महत्वाचा ठरेल यात शंका नाही 
.        मी स्वतः शिक्षक नसलो तरी माझे अनेक जवळचे मित्र शिक्षकी पेशात आहेत . त्यांच्या बोलवण्यात सातत्याने मुलांमधील वाढती हिंसा आणि त्यामुळे शिकावण्यात येणाऱ्या अडचणी यावर बोलले जाते . कोव्हीड १९ लॉकडाऊन नंतरच्या सध्याच्या काळात मुलांचा वाढलेला स्किन टाइम हा सुद्धा त्यांच्या बोलण्यातून सातत्याने येणारा मुद्दा आहे या स्किन टाइममध्ये मुले अभ्यासाचे सोडून अन्यच बाबी सातत्याने बघत आहेत घरी केलेल्या 
लाडामुळे हि मुले चटकन ऐकत नाहीत थोडीसी जरी शिक्षा केली तरी पालक शाळेत येऊन जोराने भांडतात जर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत काही कमतरता  आली तर तो देश पूर्णपणे शिक्षकांवर टाकण्यात येतो ती देखील माणसेच आहेत  यंत्रे नाहीत असे समजण्यात येत नाही   असे सांगण्यात येते त्या पार्शवभूमीवर हा कायदा आपल्याला देखील बरेच काही शिकवून जाणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .
        या पालकांच्या त्रासामुळे अजून तरी एखाद्या क्षिक्षकाने आत्महत्या केल्याची बातमी आलेली नसली तरी आपल्याकडे सर्व उत्तम सुरु आहे असे समजणे चुकीचे ठरेल . याबाबत शिक्षकांचे सर्वक्षण केल्यास समोर येणारे चित्र दक्षिण कोरियासारखेच असेल हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाहिये शिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीसाठी लागणाऱ्या वेळेचा समावेश नोकरीच्या कामाच्या वेळेत करावा का ? याबाबाबत आपल्याकडे मोठ्या प्रमाणांत मतभिन्नता आहे त्यामुळे आपल्याकडे शिक्षक नक्की किती वेळ काम करतात याचा ठोस आकडा नाही  तणावरहित सातत्याने मूल्यमापन या पद्धतीमुळे मुळे  या मूल्यमापनासाठी चाचणी तयार करणे त्या तपासणे यात मिळालेल्या मार्कांचे श्रेणीत रूपांतर करणे आदी शैक्षणिक समजली जाणारी कामेच मोठ्या प्रमाणात करावी लागतात या खेरीज  पूर्णतः अशैक्षणिक असणारी कामे तर सोडूनच देऊया . या पार्श्वभूमीवर हा कायदा आपल्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा ठरतो 
अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५
९४२३५१५४००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?