परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.

   सध्या आपल्या भारतात सर्वत्र नारी शक्ती विधेयकाबाबात चर्चा सुरु आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी  एका स्तंभात अर्थात विधीमंडळात त्यामुळे महिला वर्गाचा सहभाग त्यामुळे नक्कीच वाढेल. आज असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये महिलावर्ग पुरुषांना खांद्याला खांदा लावून सक्षमतेने काम करत नसेल. अगदी एखाद्या माणसाचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार विधीचा देखील अपवाद याला नाहीये‌. उत्तर प्रदेश सारख्या अजूनही जाती भेद उच्च निच्चता मोठ्या प्रमाणात पाळले जाणाऱ्या राज्यातील इलाहाबाद या शहरात देखील आपणास हे कार्य करणारी एक महिला कार्यरत आहे. हे मला समजले ते मी पुर्वी  वाचलेले असुन देखील सध्या पुन्हा एकदा  वाचत असलेल्या एका पुस्तकामुळे . "गार्गी जिवंत आहे", हे त्यांचे नाव. .राजहंस प्रकाशनातर्फेप्रकाशित या पुस्तकामुळे मला ही माहिती समजली.
    हे पुस्तक प्रसिद्ध होवून बराच काळ लोटला आहे, त्या अर्थी हे पुस्तक जून्या या वर्गवारीत मोडते.माझे देखील हे पुस्तक पहिल्यांदा वाचले त्यास कैक वर्षे लोटले, मात्र स्वतः कडे असून देखील या बाबत लिहले नव्हते, जे आता लिहित आहे. देर से आये मगर दूरूस आये, हे हिंदी भाषेतील तत्व आचरण्यात आले, असे समजूया.
   तसे बघायला गेले तर जेमतेम सव्वाशे पानांचे हे पुस्तक ,आपल्या अनेक समजुतींना मोडीत काढते. पुस्तकाच्या विषय मांडणीत लेखिकेने फारसी पाने खर्ची पाडलेली नाही. विषयाच्या प्रास्ताविकात फारसे न लिहता लेखिका थेट विषयाला स्पर्श करते, लेखिकेने विषयाचे प्रास्तविक फारसे मोठे केले नसले तरी, विषय  सहजतेने समजेल अस्या पद्धतीने मांडणी केली आहे.जेमतेम सहा सात पानात आपणास विषय पुर्णतः समजतो.सहा ते सात पानानंतर लेखिका थेट आपल्यास गुलाबोचे चरीत्र सांगायला सुरुवात करते. गुलाबो ही सुमारे 85 वर्षीय महिला या पुस्तकाची नायिका संपूर्ण पुस्तक तिच्या भोवतालीच फिरते.जी गेल्या पंचाहत्तर इलाहाबादच्या मनकर्णिका घाटावर प्रेतांना दाहसंस्कार करण्याचे काम करत आहे. वयाच्या सातव्या वर्षी लग्न झालेल्या गुलाबोला वयाच्या दहाव्या वर्षी अपत्यप्राप्ती होते आणि वयाच्या अकराव्या वर्षी तिच्या पतीचे निधन होते. पतिनिधनानंतर ती  वडीलांच्या  प्रेतांवर दाह संस्कार करण्याचा व्यवसायात येते,तीची कहाणी म्हणजे सदर पुस्तक होय.एका अर्थाने हे गुलाबोचे चरीत्रच      आपल्या महाराष्ट्रात स्मशानजोगी नावाचा एक समाजघटक गावापासून  दुर असणाऱ्या स्मशानात राहतो. आणि स्मशानात क्रियाक्रम करायला येणाऱ्या लोकांच्या मदतीने आपला चरितार्थ चालवतो,या समाजाची लग्ने देखील स्मशनात होतात.गावातील लोकांच्या अंतिम प्रवास सुकर करणे हे या समाजघटकाचे काम.हे काम बहुतांशी वेळा पुरुषवर्गच करतो.महिला अन्य ठिकाणी मोलमजूरी करते. आपल्या महाराष्ट्राला समाजसुधारणेची मोठी परंपराअसल्याने,आता हा समाज मुख्यधारेत सहभागी होत आहे. मात्र आता आतापर्यंत समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे? हे त्यास उघडपणे विचारले जाणाऱ्या, उत्तर प्रदेशात असे कार्य करणारी महिला म्हणजे गुलाबो .आणि त्यामुळेच महत्त्वाची ठरते,तिचे हे चरीत्र. 
 आपण अनेकदा महिला सबलीकरणाचा गोष्टी बोलतो.त्याबाबतच भाष्य करणारे हे पुस्तक आपण त्यामुळे वाचायला हवे आपण? 
अजिंक्य तरटे 
9552599495
9423515400


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?