कृतीतून आशा निर्माण करुया !

जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या  
होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा  समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्फे,(The International Association for Suicide Prevention  {IASP} , जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक  मानसिक 
आरोग्य संघ { World Federation for Mental Health (WFMH) } यांच्या मदतीने साजरा करण्यात येतो  जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेची   , (The International Association for Suicide Prevention  {IASP} ची स्थापना  १० सप्टेंबर १९९९ रोजी झाल्याने जागतिक आत्महत्या विरोधी दिन हा १० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो

 हा दिन दरवर्षी एका संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो. २०२३ची संकल्पना आहे " CREATING HOPE THROUGH ACTION  " मागील वर्षी आणि २०३१ साली देखील हीच संकल्पना होती २००३ पासून च्या संकल्पनेचा विचार करता २००३ साली  "Suicide Can Be Prevented! , २००४–साली  "Saving Lives, Restoring Hope २००५साली  "Prevention of Suicide is Everybody's Business"२००६साली  "With Understanding New Hope" २००७साली    "Suicide prevention across the Life Span २००८ साली  "Think Globally, Plan Nationally, Act Locally २००९ साली  "Suicide Prevention in Different Cultures" २०१०साली  "Families,

Community Systems and Suicide २०११साली  "Preventing Suicide in Multicultural Societies" २०१२ साली "Suicide Prevention across the Globe: Strengthening Protective Factors and Instilling Hope२०१३साली  "Stigma: A Major Barrier to Suicide Prevention"२०१४साली "Light a candle near a Window २०१५साली  "Preventing Suicide: Reaching Out and Saving Lives" २०१६ साली  "Connect, Communicate, Care"२०१७साली "Take a Minute, Change a Life" २०१८साली  "Working Together to Prevent Suicide २०१९साली "Working Together to Prevent Suicide २०२०साली "Working Together to Prevent Suicide आणि २०२१  साली - "Creating Hope Through Actio या संकल्पांद्वारे हा दिन साजरा करण्यात आला या सर्व संकल्पना बघितल्यास आपणास आत्महत्या या विषयांवरील या संघटनेचे भरीव कार्य लक्षात येते

   आपल्याकडे आत्महत्या करणाऱ्या  व्यक्तीकडे एक पळपुटा म्हणून बघितले जाते जे माझ्यामते अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला अकबर आणि बिरबल आणि हौदातील माकडणीची गोष्ट आपणास महिती असेलच सुरवातीला आपल्या पिल्लाला कवटाळणारी माकडीण शेवटी आपला जीव वाचवण्यासाठी पिल्लाला आपल्या पायापाशी ठेवून त्यावर उभे राहून आपला जीव वाचवते कोणालाही आपला जीव प्रिय असतो  तुम्ही कोणत्याही उंच इमारतीवर जा आणि खाली बघा आपले डोके गरगरायला  लागेर्ल डोळे विस्फारतील आपण चटकन मागे फिरू अश्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या जीव घेण्यास देखील मागेपुढे बघत नाही या मनोवस्थेचा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना दुबळा समजणाऱ्या व्यक्तींनी विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते आत्महत्या करणे हे दुबळ्या मानसिकतेचे लक्षण समजण्यात येते जे चुकीचे आहे तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा तेथील पुलावरून खाली उडी मारण्याचा विचार करा हवंतर डोळे मिटा तुम्ही तेथून कुठेही न थांबता सरळ घरी याला घर रेल्वेस्टेशनपासून कितीही लांब असले तरी तुम्ही कुठेही थांबणार नाही अश्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या जीव घेण्यास काशी काय धजावते हे आत्महत्येला दुबळा पळपुटा म्हणणाऱ्या लोकांनी विचार करावा माझ्यामते जगातील सर्वात धैर्यवान लोक ही तीच मात्र त्यांनी ती ऊर्जा नकारात्मक कार्यात गुंतवली आणि स्वतःच्या विनाश करून घेतला असे मी समजतो जर ती ऊर्जा सकारत्मक कार्यात वापरली गेली तर जगातील कोणतीही गोष्ट ते सहजतेने करू शकतात असे मला वाटते

एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्यावर सोशल मीडियात जर आत्महत्येचे विचार आले तर माझ्याशी बोला पण आत्महत्या करू नका असे मेसेज येण्यास सुरवात होते मात्र जी व्यक्ती आत्महत्या करणार असते ती व्यक्ती फारच कमी वेळा तसे जाहीररीत्या बोलून दाखवते अनेकदा अश्या व्यक्ती फारश्या बोलेनाश्या होतात . विविध गर्दीचे ठिकाणे टाळायला लागतात अश्यावेळी आत्महत्येची मनोवस्था असणारी व्यक्ती एखाद्याशी स्वतःहून संपर्क साधेल अशी अपेक्षाच करणे चुकीचे ठरेल आपणच जर आपणस अशी व्यक्ती आढळली तर तो संपर्क साधेल अशी अपेक्षा न करता स्वतःहून त्याकडे जात त्याची व्यथा शांततेत समजावून घेत त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे तर आणि तरच या आत्महत्या नावाच्या सामाजिक कलांकाला आपण आपल्यापासून दूर सारू 

अजिंक्य तरटे 

9552599495

9423515400

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?