अतिशय रंजक भाषेत विश्वाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक A brief history of Time

आपल्या रामायण आणि महाभारत अस्या पौराणिक मालिकांमध्ये अनेकदा "मे समय हुं!" असे म्हटले गेल्याचे आपण बघितले असेलच. तर समय किंवा ज्याला आपल्या मराठीत वेळ म्हणतात, ही संकल्पना आपल्याला
मुळातून समजावून घेयची असेल तर, आपण वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे, जेष्ठ खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी मुळातील इंग्रजी भाषेत लिहिलेले, मात्र ज्याच्या मराठी भाषेत देखील अनुवाद झाला आहे, असे  "A brief history of Time". या पुस्तकाचा मराठीत  अनुवाद झाला असला तरी मुळातील पुस्तक वाचण्याचा आनंद काही औरच. तो आनंद मिळवण्यासाठी मी नुकतेच मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचले.

     अत्यंत सोप्या इंग्रजी  भाषेत हे पुस्तक लिहिले आहे.तसेच या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे.तीची मांडणी देखील रंजकतेने करण्यात आली आहे. त्यामुळे ज्याला खगोलभौतिकी या विषयाचे फारसे ज्ञान नाही,असी व्यक्ती देखील हे पुस्तक वाचून खगोलभौतिकी या विषयात बऱ्यापैकी पारंगत होवू शकते.शिवाय आधीच सांगितलेल्या प्रमाणे यांची भाषा देखील सोपी आहे.त्यामुळे ज्यांना

खगोलभौतिकी शास्त्रचा अभ्यास करायचा आहे , मात्र सध्या त्यांची या विषयाची पाटी पुर्णतः कोरी आहे, अस्याव्यक्तींनी खगोलभौतिकी या विषयाचा अभ्यासाचा श्रीगणेशा या पुस्तकाद्वारे करणे सर्वोत्तम राहिल. मुलभूत ते मध्यम प्रगत स्वरूपाचे ज्ञान ते यातून मिळवू शकतील.

    खगोलभौतिकी शास्त्रचा  विचार करता वेळ म्हणजे काय ?वेळ कधी अस्तित्वात आला ?तो अस्तित्वात येण्याचा आधी काय होते? आपण ज्या विश्वात राहतोय,ते विश्व कधी अस्तित्वात आले? या विश्वाचा विस्तार किती मोठा आहे? विश्वाच्या विस्ताराचा बाहेर काय आहे? मुळात हे विश्व कसे अस्तिवात आले? विश्वाच्या अस्तित्वाचा आधी काय होते?विश्वाचा कधी मृत्यू होवू शकतो का? असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाच्या वाचन केल्यास सहजतेने मिळतात.

    मुलीची शालेय फी भरण्यासाठी पैसे नसल्याने ते मिळावेत, या हेतूने लिहलेले हे पुस्तक आपणास खगोलभौतिकी या विषयाची मोठ्या प्रमाणात माहिती देते. पुस्तकाचे लेखक स्टिफन हॉकिंग हे  त्यांनी  विश्व जन्म या संकल्पनेवर केलेल्या संशोधनासह ज्या शारिरीक विकलांगतेवर मात करत त्यांनी खगोलशास्त्रात

संशोधन केले, त्यामुळे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या पुस्तकात कोठेही मोठेपणाचा हेका पुढे केल्याचे दिसत नाही.भौतिकशास्त्र जाणण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्याला तस्याच उत्सुक शिक्षकाने दिलेले ज्ञान म्हणजे सदर पुस्तक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे पुस्तक ज्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे असी व्यक्ती देखील समजू शकते असे आहे,तर मग वाचणार ना हे पुस्तक?

 

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?