मानसिक आरोग्य मुलभूत अधिकार


 मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्य अत्यंत महत्त्वाच्या  घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे  १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन.  १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो सन २०२३ची संकल्पना आहे Mental health is a universal human right”   उत्तम मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा वैश्विक मूलभूत अधिकार असे आपणास मराठीत म्हणता येईल

       आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी जशी शारीरिक तंदरुस्तीची गरज असते त्याचप्रमाणेउत्तम मानसिक आरोग्याची देखील असते त्यामुळे जगातील प्रत्येकाला चांगल्या मानसिक आरोग्य मिळावे या साठी आवश्यक त्या बाबी मिळायलाच हव्यात किंबहुना तो त्यांचा वैश्विक मूलभूत अधिकार आहे असे

या बाबत म्हणता येईल . आपल्या भारतातच नव्हे जगभरात अनेक ठिकाणी मानसिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या मूलभूत हक्कांची सरार्स पायमल्ली होते .त्याला कुठे कळतंय ? या सबबीखाली त्यांना पशुतुल्य अमानुष वागवणूक दिली जाते त्यांना अनेक अधिकारापासून वंचित ठेवले वाजते  जागतिक आरोग्य संघटनेला याच विषमतेवर बोलायचे असल्याने त्यांनी हा विषय निवडला आहे पुढील वर्षभर संयुक्त राष्ट्रसंघाचे स्वयंसेवक हि संकल्पना घेऊन जगभरात या विषयी मार्गदर्शन करतील तुमचा मानसिक आरोग्याचा मूलभूत अधिकार तसेच इतरांच्या अधिकारांचे संरक्षण कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिन 2023 साजरा करण्यात येत आहे

     मानसिक स्थिती चांगल्या नसलेल्या व्यक्ती त्यांच्या मनोवस्थेमुळे अनेक कामे करायला असमर्थ होतात .र्त्यांना अनेक कामासाठी दुसऱ्यावर पूर्णतः अवलुबुन राहावे लागते ज्याचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो आणि त्यांचे शोषण केले वाजते आज जगभरात सुमारे १२. ३३ %  म्हणजेच दर ८ व्यक्तीमध्ये १ व्यक्ती विविध प्रकारच्या मानसिक व्याधीने ग्रस्त आहेत हा एकदा खूप मोठा असल्याने मानसिक दुर्बलतेमुळे शोषण होणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे जे उत्तम जगाच्या कल्पनेच्या विरोधी आहे त्यामुळे हि जागतिक समस्या आहे त्यांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आता वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील

      आपल्या भारतात मानसिक अनारोग्याविषयी आताआतापर्यंत फारसे बोलले जात नव्हते . मात्र क्रिकेटपटू विराट कोहली सिने अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी हो आम्ही आमच्या आयुष्यात नैराश्याचा सामना केला आहे  असे उघडपणे सांगितल्याने या विषयी आता समाजमन बोलते होत आहे जी अत्यंत चांगली गोष्ट आहे . मानसिक अनारोग्याने ग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे पालक यांचे स्वयंसहायता गट

स्थापन होत आहेत जिथे समदुःखी आपले दुःख शेअर करतात आपल्या सारखेच दुखी व्यक्ती बघून माणसाला जरासे हलके वाटते अश्या गटांचे प्रमाण वाढायला हवे  जसे शरीराला रोग होतात तसे मनाला देखील रोग होतात त्यात  लज्जा वाटण्यासारखे काही नाही हा दृष्टिकोन समाजात रुजतो आहे  आपल्या मराठीत देखील देवराई सारखे चित्रपट यांबाबत प्रबोधनाचे मोठे कार्य करत आहेत अश्या चित्रपटांचे प्रमाण वाढायला हवे ज्यामुळे या विषयावर अधिक मोकळेपणा येईल ज्याची सुरवात या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झाल्यास ते सोन्याहून पिवळे ठरेल यात शंकाच नाही
अजिंक्य तरटे 
 ९५५२५९९४९५
९४२३५१५४००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?