भारत श्रीलंका मैत्री नव्या वळणावर !

        


 भारत सध्या आपल्या सभोतावली असणाऱ्या शेजारील देशांशी असणारे राजनॆतिक संबंध अधिक धृढ करण्यावर भर देत आहे , हे आपणास विषयीच्या माध्यमामध्ये येणाऱ्या बातम्या बघितल्यास सहजतेने समजते शेजारील देशांशी असणारे नाते  अधिक मधुर करण्याच्या हेतूने त्यांच्याशी दळणवळणाच्या अधिकाधिक सोइ करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे . आजमितीस भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता ते खुणला, कोलकाता ते ढाका आणि न्यु जलपाईगुडी ते ढाका या तीन रेल्वेमार्गावर प्रवासी गाड्या चालवल्या जातात. अगरताळामार्फत बांगला देशातील रेल्वेमार्गाशी भारतीय रेल्वे जोडण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. याखेरीज कोलकाता ते ढाका दरम्यान खासगी आणि सरकारी बससेवाही दोन्ही कडून सुरू आहेत. नेपाळ लाही भारतीय रेल्वेशी जोडण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे.अजमितीस गोरखपूर आणि नवी दिल्ली येथून नेपाळची राजधानी काठमांडू  येथे बससेवा सुरु आहे. आंग्रे आशिया त्यातही म्यानमारशी रस्ते मार्गाने वेगवान संपर्क साधण्याचे कामही सध्या सुरु आहे. याच मालिकेत आता श्रीलंकेचाही समावेश झाला आहे.शनिवार 14ऑक्टोबरला तामिळनाडू च्या नागापट्टणम ते श्रीलंकेच्या जाफना प्रांतातील कनकेसंथुराय या दरम्यान फेरी सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे 

        सन १९८२ ला श्रीलंकेच्या अंतर्गत यादवीमुळे बंद करण्यात आलेली आणि हि   पुन्हा सुरु करावी या बाबाबत दोन्ही मेब्रेडम ऑफ अन्डर स्टँडिंग (MOU)  होऊन सुद्धा तब्बल १२ वर्षांनी प्रत्यक्ष सुरु होणाऱ्या या सेवेमुळे दोन्ही देशातील नागरिकांचा संपर्क वाढण्यास मदत होऊन अंतिमतः दोन्ही देशातील राजनैतिक संबंध मधुर होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे . तामिळनाडू च्या नागापट्टणम ते श्रीलंकेच्या जाफना प्रांतातील कनकेसंथुराय या दोन शहरातील ६० नॉटिकल मेल (सुमारे ११० किलोमीटर ) हे अंतर या फेरीसेवेतील बोट हवामानाच्या अनुकूल आणि प्रतिकूलतेनुसार तीन ते चार तासात पार करणार आहे . या साठी ७६०० भारतीयरुपये लागणार आहेत ज्यामुळे हि फेरीसेवा फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे असा आरोप याबाबत करण्यात येत आहे.  भारत आणि बांगलादेश यामध्ये चालवण्यात येणाऱ्या कोलकाता ते ढाका या रेल्वेच्या फास्ट क्लास एसीचे भाडे फक्त. ७६० भारतीय रुपये आहे.  कोलकाता ते ढाका हे अंतर रेल्वेमार्गाने ३५० किमी आहे रेल्वेमार्गापेक्षा जलमार्ग नेहमीच खूप स्वस्त असतात त्याचा विचार करता नागापट्टणम ते कनकेसंथुराय दरम्यान चालवण्यात येणाऱ्या फेरी भाडे अवास्तव आहे अशी टीका या निमित्याने करण्यात येत आहे एकावेळी १४ क्रू मेंबरसह १५० प्रवाश्याना घेऊन हि फेरीसेवा निघेल पाल्कच्या सामुद्रधुनीतून हि फेरी प्रवास करेल 
ही सेवा श्रीलंकेबरोबर करण्यात येणाऱ्या  आर्थिक भागीदारी व्हिजनचा एक भाग आहे,श्रीलंकेबरोबर भारताची 
सागरी, हवाई आणि ऊर्जा कनेक्टिव्हिटी वाढवण्याविषयीचा  रोडमॅप,  जुलैमध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या भारत भेटीदरम्यान अंतिम झाला होता.त्यानुसार ही सेवा सुरु करण्यात आली आहे जर हि फेरी यशस्वी ठरल्यास रामेश्वर ते श्रीलंकेतील तलाईमन्नार या दरम्यान सुद्धा फेरी  सेवा सुरु करण्याचे प्रयोजन आहे 
    भारत आणि श्रीलंका यांच्यात पूर्वापार दळणवळण सुरु आहे . त्याच्यात हि फेरीसेवा नक्कीच चारचाँद लावेल यात शंका नसावी . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?