३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

  


पुढील ३० नोव्हबर ते १२ डिसेंबर हे दिवस समस्त जगासाठी अत्यंत महत्वाचे आहे . कारण या  दिवसात युनाटेड अरब अमिरात या देशातील महत्ताचे आर्थिक केंद्र असलेल्या दुबई या शहरात कॉप २८ चे अधिवेशन असणार आहे ज्यामध्ये अत्यंत ठोस असे होण्याची शक्यता जग व्यक्त करत आहेपश्चिमी आशिया आणि उत्तरी आफ्रिका अर्थात अरबी प्रदेशात होणारे हे सलग  दुसरे अधिवेशन तर एकूण २८ अधिवेशनाचा विचार करता वे अधिवेशन या आधीचे अधिवेशन इजिप्तच्या शर्म अल-शेख, या शहरात  झाले त्यामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाले होते  जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने  शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ ला केलेल्या आवाहनाला  सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार्या 39 देशांनीही पाठिंबा दिला आहे अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे  या संघटनेसह .युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडम यांनी देखील  भारताच्या आवाहनाला पाठिंबा दिला ज्यामुळे भारताच्या गो ग्रीन या मोहिमेला मोठे यश मिळाले

 हवामान बदलाविषयी जगात जे कार्यक्रम चालतात त्यामध्ये कॉप अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे जवळपास पहिल्या क्रमांकाचे महत्त्वाचे आहे, जगाला हवामानबदल हे जागतिक संकट असल्याची जाणीव होऊन या बाबत काहीतरी करायला हवे ही जाणीव सर्वप्रथम १९७२ साली झाली त्यावर्षी स्टॉकहोम या शहरात पहिली अर्थ समिट झाली . त्यानंतर पुढील २० वर्ष हवामानबदलाविषयी फारश्या घडामोडी घडल्या नाहीत पुढे १९९२ साली जगाला मानवी हस्तक्षेपामुळे पृथीच्या हवामानाची हानी होत असून ती सुधारणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने रिओ दि जानोरो या शहरात युनाटेड नेशन फ्रेमवर्क फॉर

क्लायमेट चेंज या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली १९९२ साली झालेले  हे अधिवेशन रिओ समिट म्हणून प्रसिद्ध आहे या रिओ समिट मध्ये हवामान बदलाविषयी ठोस कृती कार्यक्रम १९९२ मे रोजी ठरवण्यात येऊन १९९२ जून मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांनि त्यास मान्यता देण्यसासाठी देशांची सही करण्यासाठी खुला करण्यात आला ज्यावर सर्व सदस्य देशांची सही होण्यसासाठी १९९४ मार्च २१ हा दिवस उजाडला या ठोस कार्यक्रमावर ज्या देशांनी सही केल्या त्यांचा एक गट स्थापन करण्यात आला त्यास कॉन्फरन्स ऑफ पार्टिज या नावाने ओळखतात . कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या इंग्रजी शब्दाचे पहिले अक्षर घेऊन COP  हा शब्द तयार करण्यात आला आहे ज्याचा उच्चार कॉप करतात १९९४ साली सर्व देशांनी मान्यता दिल्यावर १९९५ पासून २०२० वर्षाचा अपवाद वगळता दर वर्षी जगभरातील सर्व देश हवामान बदलाविषयी काय करता येईल हे ठरवण्यासाठी एका शहरात एकत्र येतात त्यास कॉप अधिवेशन म्हणतात १९९५ साली पहिल्यांदा हे अधिवेशन झाले त्यास कॉप नावाने ओळखतात त्यानंतर कॉप ,कॉप या नावाने हे अधिवेशन सुरु आहे जे दर वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येते या वर्षी असणारे अधिवेशन २८ वे आहे जे युनाटेड अरब अमिरात या देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेल्या दुबई या शहरात ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या दरम्यान होणार आहे

       हे अधिवेशन जगासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे अधिवेशन सुरु होण्याचा आधीपासून अनेक कारणांनी गाजत आहे  या वर्षीच्या सुरवातीला जानेवारी महिन्यात  युनाटेड अरब अमिरात या देशाच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीचे कार्य्रकरी प्रमुख या COP२८ चे प्रमुख  असतील असे युएई ने जाहीर केल्यावर एका वादाला तोंड फुटले सध्या जागतिक हवामान बदलाच्याच्या मुळाशी नैसर्गिक जीवाष्म  इंधनाचा

वापर कारणीभूत असल्याबाबत जगाचे एकमत झाले आहे त्यामुळे जग नैसर्गिक जीवाष्म इंधनाचा  वापर कमीत कमी करत पर्यायी इंधनाच्या संशोधनाकडे वळत आहे याबाबत भारतासारख्या देशांनी सौर उजेचा अधिकाधिक वापर करण्याबाबत अनेक देशांची मूठ बांधली आहे  जग जीवाष्म इंधनाच्य विरोधात एकवटले असताना ज्या राष्ट्रीय कंपनीचा मूळ आर्थिक स्तोत्राच मुळात जीवाष्म इंधने आहेत त्या कंपनीचा मुक्या कार्यकारी प्रमुख जागतिक हवामानबदलाविषयीच्य बेबींवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाचा प्रमुख कशा काय होऊ शकतो अशा प्रश्न या निमित्याने पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला युनाटेड अरब अमिरात च्या राष्ट्रीय तेलउत्पदक कंपनीच्या प्रमुखांनी या आधी झालेल्या १० COP अधिवेशनात युएन्टेड अरब अमिरात या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे त्यांना परिस्तितीची पूर्व जाणीव आहे त्याच्या अध्यक्षतेखाली मनमोकळ्या वातवरणात चर्चा होईल असे युएइ च्या सरकारकडून सांगण्यात आले कोल्ह्याच्या तावडीत बकऱ्यांची सुरक्षा देण्याचा हा प्रकार आहे/स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्तीच्या हाती पर्यावरणाच्या संरक्षणाची जवाबदारी कोणत्या अधिकारात देता येऊ शकते ? चोराच्या हाती खजिन्याचा किल्ल्या देण्याचा हा प्रकार आहे  या प्रकारच्या  प्रतिक्रिया या निमित्याने पर्यावरण रक्षण करणाऱ्या संस्था व्यक्ती यांच्याकडून उमटल्या

      COP28 अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे, त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे  पॅरिस कराराच्या अंतर्गत होणाऱ्या  प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ग्लोबल स्टॊकटेक या व्यवस्थेचे पूर्व निर्धारित योजनेनुसारचे हे शेवटचे वर्ष आहे आहे आतापर्यंत जागतिक महासत्ता आणि अन्य प्रगत देशाच्या हवामान बदलाविषयक कृतिकार्यक्रम बघता हे  स्पष्ट आहे की जग कराराची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या मार्गावर नाही, परंतु अशी  आशा आहे की कॉप २८ मध्ये हवामान कृतीला गती देण्यासाठी एक रोडमॅप सदस्य देशांकडून आखण्यात

येईल या खेरीज अन्यमुद्यामध्ये  मागच्या कॉप २७ मध्ये ठरल्याप्रमाणे  परिवारणास अनुकूल अअस्या प्रकारे विकास करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक विकासाबाबत संशोधन करणे आणि त्याचीअंमलबाजवणी करण्याच्या हेतूने निधीची कायदेशीर स्थायी तरतूद करण्याच्या हेतूने कार्यक्रम आखणे   पॅरिस करारात सांगितलेल्या  जागतिक उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी एक फ्रेमवर्क उभारणे .तसेच बदलते जागतिक हवामान लक्षात घेऊन ,  ऊर्जा संक्रमण आणि अन्न प्रणाली परिवर्तन या मुद्यावर चर्चा होईल अशी शक्यता आहे

       मागील २७ अधिवेशनामध्ये फक्त चर्चा झाली मात्र हवामान बदलाविषयक कृती कार्यक्रम आखण्याबाबत काहीही ठोस झाले नाही पश्चिमी युरोपीय देश आणि मुख्यतः अमेरिका सारखे विकसित देश आणि आपला भारत आणि चीन सारख्या विकनसशील देशांनी हवामान बदलास कारणीभूत असणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन रोखण्यासाठी किती वाटा उचलावा या प्रमुख मुद्यावरून अनेक बोलणी फिस्कटल्या भारत आणि चीनच्या मते आताची जागतिक हवामानाची स्थिती येण्यामध्ये प्रामुख्याने पश्चिमी युरोपीय देश आणि मुख्यतः अमेरिका जवाबदार आहे  त्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी निसर्गाची मोठी हानी ककेली ज्यामुळे हवामान बदलले आहे आम्ही अजून विकासाच्या वाटेवर आहोत आमचा विकास पूर्ण झालेला नाही आम्हालाही

विकास करण्याच्या पूर्ण अधिकार आहे जर दरडोई ग्रीन हाऊस गॅसचे प्रमाण बघितल्यास आमच्यापेक्षा  पश्चिमी युरोपीय देश आणि मुख्यतः अमेरिका खूप मोठे आहे आमची लोकसंख्या जास्त असल्यानेआमचा एकत्रित आकडा मोठा होतोय . तरी पश्चिमी युरोपीय देश आणि मुख्यतः अमेरिका आदी देशांनी हवामान बदलामध्ये मोठा वाट उचलावा या उलट पश्चिमी युरोपीय देश आणि मुख्यतः अमेरिकाच्या मते हे जागतिक संकट असल्याने दरडोई ग्रीन हाऊस गॅस बघता प्रत्येक देशाचा एकत्रित  विचार करून जवाबदरी निश्चित करावीभारत आणि चीन आमच्या इतकेच ग्रीन हाऊस गॅस वातवरणात सोडत असल्याने त्यांनी देखील आमच्या इतकीच जवाबदारी घ्यावी आता या पॆकी कोणता गट कॉप २८ मध्ये विजयी होतो ते लवकरच समजेल

 

अजिंक्य तरटे

९५५२५९९४९५

९४२३५१५४००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?