अंतराळ आणि उद्योजकता

     

       आपण अंधाऱ्या रात्री आकाशात नजर टाकल्यास आपल्यास अथांग अश्या स्वरूपात पसरलेल्या स्वरूपात तारे दिसतात ज्याला आपणाकडे अवकाश असे म्हणतात मानवाला फार अशं युगापासून या अंतराळाचे आकर्षण आहे या अंतराळातील विविध ताऱ्यांना आपल्या काल्पनिक रेषेने जोडत त्याचे विविध नक्षत्रात रूपांतरण केले आपण केलेला अभ्यास दुसऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी त्या संदर्भात विविध कथा रचल्या त्यांचे पृथीवरून सातत्याने निरीक्षण केले त्याचा विविध नोंदी ठेवल्या अर्थात हे सारे पृथ्वीवरून सुरु होते पृथीच्या हवामानाचा परिणाम या निरीक्षणांवर होत असे मात्र  मनुष्यप्राणी गुहेत राहत असल्यापासून सुरु असणारा मानवाचा अंतरालाविषयी जाणून घेण्याचा विचार स्वस्थ बसत नव्हता सतराव्या शतकाच्या सुरवातीला दुर्बिणीचा शोध लागल्यावर या निरीक्षणात काहीशी सुसूत्रतत आली मानवी डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा मानवास समजू लागल्या जसे शनीचे कडे शनिपाश्चात असणारे सौरमालिकेतील ग्रह अनेक तारकासमूह यांचे आतापर्यंत झालेले दर्शन मानवाला होऊ लागले

         १९५७ ऑक्टोबर रोजी युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने जगातील पहिला उपग्रह अवकाश्यात सोडल्यावर तर तंत्रज्ञानाची प्रगतीमुळे खगोलशास्त्र खुपच प्रगत झाले मात्र याच कालावधीत माणसाच्या

दुसऱ्यापेक्षा आम्ही वरचढ आहोत हे दाखवण्याच्या प्रवृत्तीने खगोलशास्त्रात शिरकाव दिला जेव्हा जगातील पहिला उपग्रह अवकाश्यात सोडला गेला तो काळ शीतयुद्धाच्या होता दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया यांच्या दरम्यान पृथीवर विविध प्रदेश आपल्या नियंत्रणात घेण्याची स्पर्धा अंतराळात देखील पोहोचली दुसऱ्यापेक्षा आम्ही तंत्रज्ञानात खगोलशास्त्रात अधिक प्रगत आहोत हे दाखववण्याची दोन्ही महासत्तात स्पर्धा लागली त्यामुळे त्यावेळेपर्यंत शांत असणारे अंतराळ अशांत होऊ लागले . अमेरिकन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी तर भविष्यात शत्रू राष्ट्राचे उपग्रह स्वतःच्या देशातून रॉकेट उडवून उध्वस्त करत शत्रू राष्ट्राला पांगळे करण्याचे तंत्र विकसित होईल असे वक्तव्य करत अवकाशातील प्रगतीची एक काळी बाजूच जगासमोर आणली हॉलिवूवडमध्ये स्पेस वॉर या नावाने यावर एक चित्रपट देखील येऊन गेला या प्रकारच्या युद्धामुळे समस्त मानवजातीला धोका उद्भवू शकतो एका राष्ट्राच्या नाशासासाठी कार्य करत असताना जर काही चुकीने अंतराळातील उपग्रह अयोग्य ठिकाणी पडल्यास मोठा विनाश होऊ शकतो याची जाणीव काही लोकांना झाली

      त्यांनी हे टाळण्यसासाठी   प्रयत्न सुरु केले  या सर्व गोष्टीमुळे पृथीवरील देशांची स्पर्धा पृथीवरच असावी तिचे अवकाशातील स्पर्धेत रूपांतरण होऊ नये  हा विचार मूळ धरू लागला यातूनच १९६७ ऑक्टोबर १० रोजी संयुक्त राष्टसंघाच्या आमसभेने सर्वांसाठी अंतराळ खुले असेल मात्र प्रत्येक देशाला त्याचा वापर शांततेसाठी मानवाच्या कल्याणासाठीच करावा लागेल युद्ध किंवा युद्धसदृश्य गोष्टीसाठी अंतरला वापरता येणार नाही असा ठराव मंजूर केला पुढे १९८० साली मानवाच्या चंद्रावर पाऊल पडण्याच्या आनंद साजरा कारण्यासासाठी अमेरिकेत जागतिक अंतराळ सप्ताह या संघटनेची ची स्थापना करण्यात आली या संघटनेकडून सुरवातीला जगातील १५ देशात हा

सप्ताह साजरा करण्यात आला पुढे १९९९ डिसेंबर रोजी संयुक्त राष्टसंघाकडून जागतिक स्तरावर ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर हा सप्ताह अंतराळ सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निश्तित करण्यात आले मानवाने १९५७

ऑक्टोबर रोजी पहिला उपग्रह अवकाश्यात सोडला आणि १९६७ ऑक्टोबर रोजी शांततेसाठी अंतराळ हि संकल्पना जगणे मान्य केली म्हणून ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरहा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो

    दरवर्षी हा सप्ताह विविध संकल्पना घेऊन राबवण्यात येतोमागील   २०२२ सालची संकल्पना होती शाश्वतता आणि अंतराळ विकास . या २०२३ सालीची संकल्पना आहे, अंतराळ आणि उद्यमशीलता .गेल्या काही वर्षांत जगातील धनाढ्य व्यक्तींकडुन अंतराळाचा नवे पर्यटनस्थळ म्हणून केला जाणारा उपयोग विचारत घेत अंतराळ फक्त संशोधनासाठीच वापरत आणण्याऐवजी अंतराळाच्या उपयोग करत नव्या रोजगाराच्या संधी निर्माण
करणेबाबत तसेच अंतराळाचा वापर पर्यटनस्थळ म्हणून करणाऱ्या धनाढ्य व्यक्तीकडून अंतराळ संशोधनासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद होऊ शकते याची चाचपणी करणे ही २०२३च्या अंतराळ सप्ताहाच्या संकल्पनेमागची कल्पना आहे  या संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी सं या आठवाड्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे 
अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५
९४२३५१५४००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?