भारत इस्राईल संबंध एक आढावा

   


  सध्या सर्व जगाचे लक्ष इस्राईल वर लादण्यात आलेल्या युद्धाकडे आहे . त्यामुळे इस्राईल आणि भारत यातील संबंध आणि इस्राईल या देशाची एकूण माहिती फक्त स्पर्धा परिक्षेच्याचउमेदवारांना साठीच नवे तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा  जाणून घेणे अत्यावश्यक आहे चला तर मग जाणून घेउया आपल्याकडील दोन ते अडीच जिल्ह्याच्या एव्हढ्यासा या देशाविषयी

      इस्राईलपहिल्या महायुद्धात  ऑटोमन साम्राज लयास गेल्यानंतर युनाटेड किंगडम   (इंग्लड )ने युरोपातील  ज्यु समाजबांधवाना दिलेल्या आश्वासनानुसार सप्टेंबर १९४८ ला अस्तित्वात आलेले ज्यू  धर्म हा प्रमुख धर्म असलेले धर्माधिष्टीत राष्ट्र . .ज्या देशासाठी आमच्या पासपोर्ट वैध नाही अशा स्पष्ट उल्लेख स्वतःच्या पासपोर्टवर  आता आता पर्यंत अनेक देश करत होते  तो देश म्हणजे इस्राईल . अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाला आव्हान देत कृषी क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा देश म्हणजे इस्राईल . सुरक्षा विषयक उपकरणे आणि गुप्तचर संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जगात आपले स्थान निर्माण करणारा देश

म्हणजे इस्राईल . ज्या देशांच्या खेळाडूंना मारण्यासाठी ऑलम्पिलमध्ये खेळाडूंवर हल्ला करण्यात आला तो देश म्हणजे इस्राईल . जगाच्या लष्करी इतिहासात अत्यंत  वेगवान आणि अचूकतेने शास्त्रांच्या मारा करत जिकंलेल्या युद्धाचा इतिहास असणारा देश म्हणजे इस्राईल .या  इस्राईलला एक स्वतंत्र देश म्हणून भारताने सन १९५० सालीच मान्यता दिली मात्र औपचारिकपणे राजनैतिक संबंध स्थापन केले नाही   भारत स्वातंत्र्य झाला . त्यावेळी भारताला औद्यगिकतेला पुढे नेण्यासाठी नैसर्गिक इंधनाची मोठी गरज होती . ज्यासाठी आपण मोठ्या प्रमाणत आखाती देशांवर अवलूंबून होतो . आखाती देशांचा प्रमुख शत्रू म्हणजे इस्राईल .त्यामुळे इस्राईलबरोबर मैत्री स्थापित करून आपण आखाती देशांबाबरोबर शत्रुत्व घेऊ शकत नव्हतो . तसेच भारताची भूमिका शांततेची धार्मिकतेविरुद्धची होती ज्याच्या विरोधात  इस्रायलची उघड उघड भूमिका होती.त्यामुळे आपण इस्रायलला जरी मान्यता दिलेली असली तरी राजनैतिक संबंध स्थापित केले नाहीत भारताने इस्राईलबरोबर राजनैतिक संबंध २९ जानेवारी १९९२ ला स्थापित केले आज २०२३ साली त्यास ३१ वर्षे पूर्ण झालेली आहेत १९५३ साली इस्रायलची एक वकिलात ( कॉनस्लेट) मुंबई  येथे स्थापित करण्यात आली होती . जी १९९२ साली पूर्णतः राजनीतिक संबंध स्थापित झाल्यावर तिचे रूपांतरण  हायर जनरल कॉनस्लेट मध्ये करण्यात यऊन कोलकाता या शहारत अजून एक वकिलात उघडण्यात आली तर नवी दिल्लीत दूतावास उघडण्यात आला .आजमितीस इसाइलमध्ये सुमारे ८० ते ९० हजार भारतीय वंशांचे ज्यू धर्मीय नागरिक राहतात या ज्यू धर्मीयांमध्ये मराठी भाषिक ज्यू मोठ्या संख्येने आहेत या मराठी भाषिक ज्यू लोकांना बेणे इस्रायली अशी ओळख आहे या बेन्यू इस्रायली खालोखाल ईशान्य भारतातून ज्या धर्मीय मोठ्या संख्येने इस्रायलला स्थायिक झाले आहेत .   भारतने या आधी इस्राईलकडून शेतीविषयक सुरक्षा विषयक तंत्रज्ञान आयात केले आहे आणि अजूनही संरक्षण विषयक तंत्रज्ञान आयात करत आहे .

     अमेरिकेचे मागचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या  टप्यात इस्रायलला अधिकाधिक आखाती देशांनी मान्यता देऊन. राजनॆतिक संबंध प्रस्थापित व्हावेतम्हणून इस्राईलचे या देशांशी करार केलेइब्राहिम एकोर्ड म्हणून हे करार प्रसिद्ध आहेतआखाती प्रदेशात जन्माला  आलेलूया इस्लाम , ज्यू , आणि ख्रिश्चन या धर्मांना इब्राहिम रिलिजन असे संबोधतात यावरूनच कराराला नाव देण्यात आले आहे या धर्मांच्या धर्मग्रंथात एकमेकांना पूरक ठरतील अश्या अनेक बाबी आहेत म्हणून या धर्मांना त्याच्यातील सामायिक दुवा असणाऱ्या इब्राहिम या देवाच्या दूतावरून इब्राहिम रिलिजन असे म्हणतात . या इब्राहिम एकॉर्डमुळे भारताचा मित्र असणारा युनिटेड अरब अमिरेट्स (यु   )देशील इस्राईलच्या मित्र झाला आहे  यामुळे भारत इस्राईल या देशातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे

आज २०२३ साली पाकिस्तान आणि काही उत्तर आफ्रिका भागातील काही  देशांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही देशांच्या पासपोर्टवर असा उल्लेख नाही आजमितीस इस्लामी देशांचा प्रमुखअशी ओळख असणारा सौदी अरेबिया , कतार युएई आदी अनेक देश इस्राईलबरोबर राजनीतिक संबंध प्रस्थपित करता विविध बाबींबत करार करत आहेत . त्यातच मागील वर्षी अर्थात २०२२साली जुलै महिन्यात ,१४ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद मोदी

यांनी इस्राईलमध्ये सुरु असणाऱ्या आय  यु टू  या  गृपच्या अधिवेशनामध्ये  ऑनलाईन माध्यंमांद्वारे साधलेला संवाद साधला . इंडिया ,इस्राईल , यूएस ( अमेरिका ) आणि युएई (दुबई शारजा ,अबुधावी ही प्रसिद्ध शहरे असणारा देशया चार  सहभागी देशांच्या अद्याक्षरांवरून या गटाला आय टू  यु टू  हे  नाव देण्यात आले आहे  यातील  टू  हा शब्द हा अंक दर्शवतो . (इंगजीत दोनला टू म्हणतात ) तर आय हे अक्षर इंडिया आणि इस्राईल या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते या दोन्ही देशांचे इंग्रजी स्पेलिंग आय या अक्षरापासून सुरु होते म्हणून आय तर यु हे अक्षर यूएस आणि युएई या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते . अश्या प्रकारची संघटना स्थापन करावी . अशी संकल्पना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या  ऑक्टोबर २०२१च्या इस्राईलच्या दौऱ्याच्या वेळी मांडली या भूमिकेला इस्त्रीलकडून मिळालेला सकारत्मक प्रतिसाद या दोन्ही देशातील संबंध किती उत्तम आहहेत हेच समजावून येतात

सध्याच्या युद्धजन्य स्थितीमध्ये भारताने इस्रायलला उघड समर्थन का दिले या आधी का दिले नाही हे आपणास वरील विवेचनातून समजले असेलच जय हिंद

अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५ 

९४२३५१५४००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?