भारताचे बांगलादेशाबरोबरचे संबंध अधिक दृढ

       


    आपला भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याला कारणीभूत ठरले आहे दिनांक १ नोव्हेंबर रोजी भारताच्या मदतीने बांगलादेशात  सुरु झालेले दोन विकासप्रकल्प तसेच ईशान्य भारताशी उर्वरित भारताचा संबध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या बांगलादेशमधील अखूरा ते त्रिपुराची राजधानी अगरताळा या दरम्यान सुरु झालेली रेल्वेसेवा .  व्हिडीओ कन्फसरिंग द्वारे भारतीय प्रमाणवेनुसार सकाळी साडेदहा वाजता तर बांगलादेश प्रमाण वेळेनुसार सकाळी दहा वाजता हे उदघाटन पार पडले . भारताच्या शेजारी प्रथम या तत्वानुसार हि विकासकामे करण्यात येत होती या विकासकामांमुळे चीनच्या भारताच्या शेजारील देशांना आपल्या विळख्यात अडकवून भारताला आपल्या पंज्यात घेण्याच्या कृतीला काही प्रमाणात आळा बसेल 

       तर मित्रानो बांगलादेशची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प बांगलादेशातील खुणला डिव्हिजन मधील रामपाल या शहरात होणार आहे या प्रकल्पातून १३२० मेगावॉट
वीज निर्माण होईल . हा   प्रकल्प बांगलादेश-इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी लिमिटेड द्वारे राबविण्यात आला आहे जी भारतातील NTPC लिमिटेड आणि बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यातील 50:50 संयुक्त भागीदारीतून उभारलेली कंपनी आहे
       या खेरीज बांगलादेशातील दुसरे महत्वाचे बंदर असलेल्या (पहिले चितगाव {बंगाली उच्चार चितोग्राम }जे ईशान्य भारतासाठी वापरण्याची पूर्ण परवानगी बांगलादेशने भारताला दिली आहे ) मोंगला येथून खुणलापर्यंतब्रँडगेज रेल्वेमार्ग भारताच्या मदतीने बांधण्यात आला ज्याचे उदघाटन या कार्यक्रमात करण्यात आले  या ६५ किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी ३ अब्ज ८८ लाख ९२ हजार अमेरिकी डॉलरची मदत भारताकडून बांगलादेशला करण्यात आली आहे ही मदत भारताकडून सवलतीच्या व्याजदराचा अवलंब करत देण्यात आली आहे . 
         या खेरीज बांगलादेशात जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरून रखडलेल्या त्रिपुराची  राजधानीअगरताळा.अगरताळा ते बांगलादेशमधील अखूरा हा रेल्वेमार्ग अखेर पूर्ण झाला आहे . या मुळे कोलकात्याहून सुमारे डिड हजाराचा फेरा मारत ईशान्य भारताशी संपर्क ठेवण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे या आधीच भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या करारानुसार पश्चिम बंगला मधून बांगलादेशचा माध्यमातून भारत ईशान्य भारताशी संपर्क साधू शकणार आहे त्यामुळे सुमारे डिड हजार चा रेल्वेमार्ग आता काही शेकडो
किलोमीटरचाच राहिला आहे या आधी त्रिपुरा राज्य सरकारच्या मालकीच्या व्होलो सेवेतून अगरताळा ते कोलकाता बस सेवा बांगलादेशातून सुरूच होती आता त्यात रेल्वेची अधिकची भर पडली आहे त्यामुळे ईशान्य भारताच्या उर्वरित भारताशी संपर्क वाढणार आहे 
         भारत आणि बांगलादेश यांच्यात यामुळे मुळातील मैत्रयीचे संबंध अधिक दृढ होणार आहे ज्याचा फायदा भारताला होणार आहे भारत कॅनडा राजनैतिक संबंधाच्या प्रशांवर बांगलादेश सरकारच्या वरिष्ठ मंत्र्याने भारताच्या दाव्याला पुष्टी देणारे विधान केले होते तसेच भारत बांगलादेश यांच्यातली सीमा खुली करण्याच्या प्रस्ताव बांगलादेश च्या परराष्ट्र मंत्राची अब्दुल मोमेन यांनी केले होते त्या पार्श्वभूमीवर आपण या घडामोडी बघायला हव्यात 
अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५ 
९४२३५१५४००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?