भारत ऑस्ट्रेलिया मैत्री चिरायू होवो

               

 
क्रिकेटमध्ये  ५० ओव्हरच्या पुरुष विश्वचषकात ऑस्टेलियाने भारताला धूळ चारली, मात्र हे होऊन काहीच तास होत नाहीत तोच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतात  एकदा चर्चेत आले .काही तासांच्या अवधीत दुसऱ्यांदा चर्चेत आलेल्या या घटनेत मात्र खेळाडू नव्हे तर राजनैतिक व्यक्ती कारणीभूत होत्या . निमित्य होते भारताने आयोजित केलेली भारत ऑस्ट्रेलिया 2 +2 मिटींग्स . ज्यात भारतातर्फे भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले तर ऑस्ट्रियातर्फे त्यांचे सरंक्षणमंत्री जे ऑस्टरलियाचे उपपंतप्रधान देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी प्रतिनिधित्व केले २० आणि २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ही  बैठक पार पडली हि या प्रकारची  ऑस्ट्रेलियाबाबरोबरची दुसरी मिटींग्स होती या आधीची मिटींग्स २०२१ साली झाली होती
          कोणत्याही दोन देशांतील राजनैतिक संबधाचा विचार करता  2 +2 मिटींग्स या अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात भारताकडून फक्त देशांबरोबर या प्रकारच्या बैठका आयोजित करण्यात येतात . अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि रशिया हे ते चार देश होय यातील अमेरिकेबरोबर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आलेली होती तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ऑस्टेलियाबरोबर या प्रकारची बैठक
आयोजित करण्यात आलेली आहे भारत ज्या देशांबरोबर या प्रकारच्या बैठका आयोजित करतो त्यातील रशिया वगळता इतर तिन्ही देश क्याड या गटाचे सदस्य देश आहे .चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेच्या नेर्तृत्वात तयार करण्यात गट म्हणजे क्याड आहे याला पूर्वेकडचा नाटो असेही म्हणतात हे आपण लक्षात घेयला हवे
भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील मैत्रीचा मोठा इतिहास आहे   याच वर्षी मार्च महिन्यात ऑस्टेलियाचे पंतप्रधान  अँथनी अल्बानीज चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले होते भारत आणि ऑट्रिया यांच्यात नुकतीच  TALISMAN SABRE हि युद्धसराव मोहीम पार पडली ज्यामध्ये नौदल , हवाई डाळ आणि भूदल या तिन्हीच्या समावेश होता सह्याद्री हि दूरदर्शनची वाहिनी आणि ऑस्ट्रेलिया टेव्हीव्हीजन हि सरकारी वाहिनी यांच्यात करार झाले आहेत. भारतीय वंशाचे अनेक नागरिक ऑस्ट्रेलियात राहतात . तसेच दोन्ही देश कॉमनवेल्थ चे देखील सदस्य आहे २०२२ या साली २१ मार्च रोजी ऑस्टेलियायाचे तत्कलीन पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत ऑस्टेलिया भारतात विविध गोष्टींसाठी एकत्रितरित्या १५०० करोड भारतीय रुपये  इतक्या रक्कमेची गुंतवणूक ऑस्ट्रेलिया करणार असल्याचे जाहीर केले या भारतीय चलनातील १५०० करोडच्या मदतीमध्ये सौर पॅनलइलेट्रीक कार , मोबाईल या सारख्या उपकरणाच्या निमिर्तीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या लिथियम सारख्या धातूच्या बाबत भारत सक्षम होण्यासाठी करावयाच्या संशोधनासाठी तसेच प्रदूषणविरहित ऊर्जा निर्मितीसाठी भारताची प्रगती होण्यासाठी १९३ करोड रुपयाची तरतूद समाविष्ट आहे याचवेळी   १३६ कोटी रुपये दोन्ही देशांनी एकत्रितरित्या राबवायच्या अवकाश संशोधनासाठी तर १५२ कोटी रुपये भारत ऑस्ट्रेलिया सहकार्य केंद्रासाठी राखीव ठेवण्यात येत आहे या सहकार्य केंद्रामार्फत परस्पर सांस्कृतिक आदानप्रदान , व्यापारी संबंध वाढवणे , तसेच शिष्यवृत्ती देणे ही कार्ये करण्यात येतील ९७ कोटी रुपये व्यापरात सहकार्य कोशल्य विकास आणि संशोधनासाठी राखून ठेवण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले २०२२ याच वर्षी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान  जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे  रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले होते
ज्या  देशांची मातृभाषा इंग्रजी आहे अश्या युकेशी संबंधित देशांचा आय फाईव्ह नावाचा गट आहे ज्यामध्ये कॅनडा अमेरिका इंग्लंड न्यूझीलंड बरोबर ऑस्ट्रेलिया हा सदस्य गट आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची कॅनडामध्ये हत्या झाली त्यावेळी या गटातील सदस्य देश कॅनडाच्या बाजूने उभे राहिले
होते तसेचविविध करणे देत ऑस्ट्रेलियाने या वर्षांची क्याड मिटींग्स पुढे ढकलली आहे नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधांन अँथनी अल्बानीज यांनी चीनचा दौरा केला होता . त्यामुळे ऑस्ट्रेलिया खरच क्याड मध्ये राहते का ? अशा प्रश्न जागतिक स्तरावर विचारला गेला होता पुढील वर्षी क्याड गटाची बैठक आपल्या भारतात होणार आहे या पार्श्वभूमीवर हि बैठक होत आहे
या बैठकीत दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर तसेच सरंक्षण विषयक मुद्यावर चर्चा करण्यात आली या चर्चेचा मुख्य केंद्र इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य कसे वाढवता येईल हा होता [नकाश्यात बघितले असता भारताच्या पूर्वेकडील  उपसागरापासून पॅसिफिक महासागरापर्यंत असणाऱ्या भूभागाला ( नकाश्यात उजव्या हाताला ) एकत्रितपणे इंडो पॅसिफिक म्हणतात ] या क्षेत्रातील महत्वाची संघटना असणाऱ्या अशियन या संघटनेतील देशांशी सहकार्य करण्यावर यामध्ये चर्चा करण्यात आली
भारत जागतिक महासत्ता म्हणून दमदारपणे वाटचाल करत आहे हेच यातून सिद्ध होत आहे
 

 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?