भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

         


  आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे 

        नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसे या प्रकारचे राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत       

 नेपाळमध्ये आंदोलन सुरु आहेत मग त्याची चर्चा भारतात करायचे कर्ण कारण  अशा प्रश्न आपल्या मानत येऊ शकतो तर मित्रानो भारत आणि नेपाळ सीमा खुली आहे दोन्ही देशातील नागरिक व्हिसाशिवाय एकमेकांच्या देशात विनासायास जाऊ शकतात आपल्या लष्करात नेपाळी लोकांची एक पळतां आहे भारतीय प्रशासन व्यवस्थेतील काही पदांवर नेपाळी नागरिक नोकरी करू शकतात  नेपामध्ये तयार झालेली जलविद्युत भारताच्या मार्फत

बांगलादेशला  देण्याबाबतची योजना पूर्ण करण्याचे प्रत्यन सध्या अंतिम स्थितीत आलेले आहेत भूतानचा विरोध न जुमानता बांगलादेश भूतान भारत नेपाळ या चार देशातील दळणवळण विना अडथळा  सुरु करण्याचे भारताचे  प्रयत्न सध्या सुरु आहेत या सर्व गोष्टींवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या घडामोडी आपल्यासाठी आवश्यक आहे 

   नेपाळमध्ये १९५५ पासून घटनादत्त राजेशाहीच्या मुखवटा असलेली राजवट होती ती अधिक लोकशाहीवादी व्हावी यासाठी सन  १९९० ते १९९५ या दरम्यान मोठे आंदोलन झाले त्याची अखेर १९९५ साली नेपाळमध्ये लोकशाही अधिक खोलवर रुजण्यास मदत झाली मात्र नेपाळमध्ये लोकांशी रुजत असतानाच ३ जून २००१ साली नेपाळ राजगजारण्यातील मोठे हत्याकांड घडले त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय अशांतता निर्माण झालीआणि नेपाळमध्ये चीन समर्थक साम्यवादी राजवट आली सध्या नेपाळमध्ये साम्यवादी राजवट आहे मात्र त्यातील कोणत्याच पक्षावर  नेपाळी जनतेचा विश्वास नसल्याने नेपाळ मध्ये अधूनमधून राजेशाही समर्थक राजवट अस्वाद म्हणून आंदोलने होत असतात त्याच प्रकारे आंदोलन सध्या सुरु आहे नेपाळमधील राजवटीचा सध्याचा कल हा चीनचा बाजूने झुकणारा असल्याने वर्तमान राजवट बदलल्यास भारताचा फायदाच हॉबणार आहे 

आता वळूया म्यांमारकडे तर ईशान भारतातील अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम या चार राज्याची सीमा लागलेल्या म्यानमार मध्ये सध्या लष्करशाहीची राजवट आहे मात्र त्या ठिकाणी लोकशाही असावी अशी मागणी वारंवार उटंटलात असतात लोकशाहची मागणी करणारे अनेकदा सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरता हिंसक देखील होतात स्थानिक जनतेच्या सोयीसाठी भारत आणि म्यानमार मधील १६ किलोमीटरची सीमा खुली आहे त्यामध्ये स्थानिक नागरिक कोणत्याही कागदपत्राशिवाय एकमेकांच्या हद्दीत जा ये करत असतात या नागरिकांच्या मार्फत या सीमावर्ती प्रदेशात शास्त्र एकमेकांच्या हद्दीत आणली जातात काही महिण्यापासूनधुमसत असणाऱ्या मणिपूरमध्ये देखील हि शास्त्रे वापरली गेली असल्याचा संशय सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे

तर मित्रानो मिझोराम या आपल्या राज्याला लागून असलेल्या म्यानमारमधील चीन या राज्यातील लोकशाही समर्थकांनी २६ नोव्हेंबरला भारत म्यानमार सीमेवर वेलकम तो चीनलँड असा फलक  लावला आहे तसेच या संघर्षात ज्या म्यानमारमधील नागरिकांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला असेल त्यांनी कोणतीही चिंता न करता चीनलंडमध्ये यावे हा प्रदेश म्यानमारच्या जुलमी लष्करी राजवटीपासून मुक्त आहे अशी घोषणा केली आहे याच्या आधीच इतिहास बघता म्यानमारमधील लष्करी राजवट या संघर्ष मोठ्या प्रमाणात हत्या करून मोडीत काढण्याची शक्यता आहे ज्यामुळे ते नागरिक त्याच्या प्रतिकार तितक्याच तीव्रतेने करण्याची शक्यता मोठी आहे ज्यामुळे आधीच अशांतता असलेल्या ईशान्य भारताचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही जे भारताला धोकादायक आहे त्यामुळे म्यानमारमध्ये शांतात असण्यातच भारताचे हित आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?