अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा श्रीलंका दौरा का महत्वाचा

     


   श्रीलंका, आपल्या भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असणारा ,देशज्या देशाने नुकतेच भारतीयांना आपल्या देशात व्हिसाशिवाय प्रवेश असल्याचे जाहीर केले तो देश म्हणजे श्रीलंका (मात्र श्रीलंकेच्या नागरिकांना हा मजकूर लिहण्यापर्यंत भारतात येण्याचे असल्यास व्हिसा आवश्यक आहे ) भारताबरोबर बिमस्टेक {ज्या देशांना बंगालचा उपसागराचा किनारा लागलेला आहे त्या देशाची आर्थिक संघटना म्हणजे बिमस्टेक होय ज्यामध्ये भारताच्या विशेष आग्रहामुळे नेपाळ आणि भूतान या भूवेष्टित देशांना [ ज्या देशांना कोणत्याही बाजूने समुद्रकिनारा नाही ज्या देशांच्या  सभोवताली फक्त जमीन आहे अश्या देशांना भूवेष्ठित (इंग्रजीत LAND LOCK ) म्हणतात ] देखील समाविष्ट करून घेण्यात आले आहे }सार्कहिंद महासागर रिम एसोसिएशन (आईओआरए) आदी विविध संघटनबरोबरचा साथीदार म्हणजे श्रीलंका होय , तर या श्रीलंका या देशाचा  आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोव्हेंबर ते नोव्हेंबर रोजी अधिकृत दौरा केला

         मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी  श्रीलंकेचा दौरा केल्यानंतर होणारा  हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा  दौरा अनेक दृष्टीने महत्वाचा आहे या दौऱ्यात ब्रिटिश राजवटीत सध्याच्या तामिळनाडू राज्यातील तामिळ भाषिक नागरिक श्रीलंकेच्या उत्तरेकडच्या भागात स्थायिक झाल्याच्या घटनेस २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने श्रीलंकेत होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला भारताकडून प्रतिनिधी म्हणून अर्थमंत्री यांनी हजेरी लावत आहेत .आपल्या भारतासारखाच श्रीलंका

ब्रिटिशांची वसाहत होता  श्रीलंका या वसाहतीत असणाऱ्या चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या जवळच्या दुसऱ्या वसाहतीतून अर्थात भारतातून मोठ्या प्रमाणात कामगार नेले ज्यामध्ये तामिळ भाषिक नागरिक मोठ्या प्रमाणात होते या घटनेला २०२३ साली २०० वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्याने श्रीलंका या देशात तेथील सरकारकडून NAAM 200 या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत आहे त्यालाच आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित राहणार आहेत .

  ब्रिटिश राजवटीत स्थानिक सिहली नागरिकांपेक्षा या तामिळी नागरिकांना अधिक विकास करण्याच्या संधी देण्यात आल्या पुढे श्रीलंका स्वतंत्र्य झाल्यावर हि दारी भरून काढण्यासाठी तामिळी नागरिकांवर अनेक बंधने लादण्यात आली तर सिहली नागरिकांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या त्यातून या देशात अंतर्गत यादवी युद्ध झाले जे काही वर्षांपूर्वीच शांत झाले या यादवी युद्धामुळे आपले आपले एक पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी अकाली गमावले लिट्टे ही दहशतवादी संघटना याच यादवी युद्धाचा परिणाम होय .

 या अधिवेशनखेरीज अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्रिंकोमाली और जाफना या दोन ठिकाणी सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांचे उदघाटन करणार आहेत . तसेच भारताच्या  ग्रीन एनर्जी या संकल्पनेच्या अंतर्गत श्रीलंकेच्या विविध धार्मिक स्थळांच्या  विकास सौर ऊर्जेच्या मार्फत करण्यासाठी भारत यावेळी श्रीलंकेला मदत करेल पूर्वी ठरल्याप्रमाणे या साठी राखून ठेवण्यात आलेल्या १०७. पूर्णांक ८७ शतांश

कोटी भारतीय  रुपयांपैकी ८२ पूर्णांक ४० शतांश कोटी भारतीय रुपये यावेळी श्रीलंकेला देण्यात येतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी . कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII), इंडो-लंका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि सिलोन चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'एनहांसिंग कनेक्टिव्हिटी: पार्टनरिंग फॉर प्रोस्पॅरिटी' या विषयावर भारत श्रीलंका बिझनेस समिटमध्ये मुख्य भाषणही केले

 

      सध्या चीन आपल्या भारताच्या शेजारी असणाऱ्या देशामध्ये आपला मोठा प्रभाव निर्माण करत आहे  . काही दिवसापूर्वीच भारताचा आणि श्रीलंकेचा जवळचा समुद्री शेजारी मालदीवमध्ये भारतविरोधी, चीन समर्थक  व्यक्ती अध्यक्षपदी आलेला आहे जागतिक व्यापाराच्या मोठा हिस्सा हा हिंदी महासागरातून जातो या व्यापाराच्या मोक्याच्या ठिकाणी श्रीलंका वसलेला आहे त्या पार्श्वभूमीवर श्रीलंका भारताच्या बाजूने असण्यास मोठे महत्व आहे श्रीलंकेने हबनपोट्टा बंदराच्या मार्फत चीनच्या पाशवी आर्थिक ताकदीचा जवळून अनुभव घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमार्फत जगात भारताच्या बाबतीत सकारात्मक प्रतिमा करण्यास हातभार लागू शकतो . भारताची मदत हि चांगल्या आणि प्रामाणिक हेतूनेच केलेली नसते चीन सारखी आपल्या पंज्यात घेण्यासासाठीची मगरीचे अश्रू सारखी नसते हे दाखवून देण्याची चांगली संधी यामुळे भारताला निर्माण झाली आहे

अजिंक्य तरटे

९५५२५९९४९५

९४२३५१५४००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?