बिगुल ४७ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे*

,भारतात लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षी आहे  ज्याविषयीचा काही गोष्टींना आता सुरवात झाली आहे . मित्रांनो २०२४ साल हे खूपच महत्वाचे ठरणार आहे कारण आपल्या भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या अमेरिकेत सुद्धा त्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहे प्रत्यक्ष मतदानाला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोस्तांनो ,  अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुमारे दिड ते पावणे दोन वर्ष आधीच सुरु होते . या न्यायाने ही प्रक्रिया सुरु झाली आहे .  अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आता आपण या ची माहिती घेउया
हि निवडणूक कधी होते
   ही निवडणूक कधी होणार हे ठरलेले आहे . प्रत्येक ४ वर्षांनी येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जो पहिला सोमवार येईल त्यांनंतरच्या  पहिल्या मंगळवारी ही प्रक्रिया होईल .समजा १ नोव्हेंबरला मंगळवार असेल तर तो महिन्यातील पहिला मंगळवार  असला तरी तो महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर आलेला मंगळवार नसल्याने त्या मंगळवारी हि निवडणूक होणार नाही ती होईल ७ तारखेचा सोमवार झाल्यावर पुढील दिवशी अर्थात ८ नोव्हेंबरला .  या उलट जर १ नोव्हेंबरला जर सोमवार असला  तर २ नोव्हेंबरला हि निवडणूक होऊ शकते
 याला कोण मतदान करू शकते ?
     आपल्यापैकी अनेकांना वाटत असते की,  सर्वसाधारण अमेरिकी नागरिक या मध्ये मतदान करू शकतो , तर आपण चुकलात .  अमेरिकी नागरिक प्रत्यक्ष आपल्या अध्यक्षाला निवडत नाहीत . ते निवडतात . Elector  ला आणि हे Elector  अध्यक्षाला निवडतात . यां Electore यांची एकत्रीत  संख्या असते ५३८  . हे ५३८ लोक अमेरिकेची ज्यांना राज्य म्हणून मान्यता आहे .त्या ठिकाणाहून  निवडले जातात .अमेरिकेच्या मालकीचे  जगभर काही बेटे आहेत . तो प्रदेश युनाटेड स्टेस्टस अमेरिकेच्या समजला जात असला तेथील नागरिक युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे नागरिक समजले जाते असले तरी तेथून हे ELECTOR वडले जात नाही . याला एका अपवाद आहे . तो म्हणजे कोलंबिया डिस्ट्रिक चा.  हा अमेरिकन प्रदेश जरी जरी राज्य म्हणून नसला तरी तेथून ३ ELECTOR निवडले जातात .एखाद्या राज्यातून किती इलेक्टरवड निवडले जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलूंबून असते .
      या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते 
हि निवडीची प्रक्रिया ४ टप्यात होते . त्यातील पहिले दोन टप्पे हे पक्षीय पातळीवरचे असतात . तिसरा आणि चौथा टप्पा हा संपूर्ण देश पातळीवरील असतो   तर ज्याची वयाची ३५ वर्षे पूर्ण आहेत आणि जो किमान १४ वर्षे युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिकेत राहिला आहे , अशी युनाटेड स्टेट्स मध्ये जन्मलेली कोणतीही व्यक्ती युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते . दर ४ वर्षांनी होणाऱ्या या रणसंग्रामाची सुरवात त्या आधी सुमारे दीड वर्षे आधी सुरु होते .पुढची निवडणूक  नोव्हेंबर २०२४ रोजी  असल्याने त्याचे रणशिंग फुंकले गेले आहे .
 अमेरिकेत डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक असे दोन प्रमुख पक्ष आहेत . या शिवाय ग्रीन पार्टी , टी पार्टी,  सोशालिस्ट पार्टी आदी पक्ष  सुद्धा आहेत . मात्र त्यांचा जनाधार फक्त १ ते ३ टक्के असल्याने त्यांचा फारशा विचार होत नाही . मुख्य लढत रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक या पक्षातच होते .
  या निवडणुकीची सुरवात पक्षातर्फे उमेदवारी मिळण्यापासून होते . पक्षाच्या उमेदवार ठरवण्यासाठी उत्सुक उमेदवारांना  आपली दावेदारी  सिद्ध करण्याची  प्रक्रिया सध्या सुरु आहे . अध्यक्षपदाच्या शर्यतीचा हा पहिला टप्पा अमेरिकेत दोन  प्रकारे होतो . अमेरिकेच्या काही राज्यात पक्षातर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते . या चर्चा सत्रात उत्सुक उमेदवार त्यांची मते मांडतात . त्यानंतर उपस्थित लोक त्यांना ज्या उमेदवाराची मते पटतात त्या गटात समाविष्ट होता . हे झाल्यानंतर प्रत्येक गटातील व्यक्तींची संख्या मोजली जाते . ज्या उमेदवारांच्या गटात सर्वाधिक लोक असतात तो उमेदवर ती फेरी जिंकतो . या प्रकारला  कॉक्कस  म्हणतात .
   दुसरा प्रकार  काही राज्यात होतो , तो  म्हणजे प्रायमरी  होय . हा प्रकार दोन प्रकारे होते . पहिल्या प्रकारात  फक्त  पक्षाचे सदस्य गुप्त मतदान करतात तर दुसऱ्या प्रकारात पक्षाचे सदस्य आणि सामान्य जनता गुप्त मतदान करातात प्रायमरी होणाऱ्या राज्यात कोणती पद्धत वापरायची याचा निर्णय राज्य पातळीवर होतो .  ही  प्रक्रिया प्रामुख्यने मंगळवारीच होते .  पहिली फेरी जर एकाच दिवशी १० ते १५ राज्यात झाली तर त्यास सुपर च्यूसडे  म्हणतात . अश्या पद्धतीने पहिली फेरी झाल्यावर दुसऱ्या फेरीचा प्रारंभ होतो .काही दिवसांपासून चर्चेत असणारे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक विवेक रामास्वामी हे याच प्राथमिक फेरीतील अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उत्सुक व्यक्ती आहेत.
ज्यामध्ये प्राथमिक पहिल्या पातळीवर विजयी झालेले एका स्टेडियम मध्ये एकत्र येतात . आणि सुमारे  दीड ते दोन हजार पक्षाचे सदस्य  पक्षाचा अधीकृत उमेदवार ठरवतात . त्याला नॅशनल कॅव्हसन  म्हणतात .  अश्या प्रकारे पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरल्यावर या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु होतो .पहिल्या दोन टप्यात  पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार ठरल्यानंतर ही  लढाई एका वेगळ्या उंचीवर पोहाचतें .  पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना आपल्या भारतासारख्याच देशभर सभा घेऊन देश पिंजून काढतात . याच्या कळससाध्य केला जातो , तो म्हणजे उमेदवारांमध्ये होणारी आणि टीव्हीवर दाखवण्यात येणारी चर्चा होय . साधारतः या चर्चा एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये होतात . कारण मार्चपर्यंत  कॉक्कस आणि प्रायमरी तसेच  नॅशनल कॅव्हसन  या चर्चा युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसह संपूर्ण जगात मोठ्या उत्सुकतेने बघितल्या जातात . या चर्चांमध्ये उमेदवारांच्या मतांचा अक्षरशः किस पडला जातो . या चर्चातून अमेरिकेतील जनतेचे जनमत तयार होते . ज्याचे प्रकटीकरण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या मंगळवारी मतदानातून होते
 अखेरचा टप्पा अर्थात निवडणुकीचा
तिसऱ्या टप्प्यात जनमत तयार झाल्यावर अमेरिकन जनता मतदानाच्या दिवशी अमेरिकन नागरिक आपल्या मतदार संघातील  इलेक्टोर ला मत देतात . हे इलेक्टोर  अमेरिकेतील पक्षांचे प्रतिनिधीतीत्व करत असतात ज्या पक्षाचे सर्वात जास्त इलेक्टोर निवडून येतात त्या पक्षाचा उमेदवार पुढील राष्ट्राध्यक्ष बनतो .
अमेरिकन निवडणुकीतील काही गमती जमती
    या इलेक्टरांची एक गंमत आहे . यांचे संख्याबळ हे राज्याच्या लोकसंख्येवर अवलूंबन असते . ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्याचे इलेक्टोर जास्त आणि ज्या राज्याची लोकसंख्या कमी त्याची  इलेक्टरची संख्या पण कमी संख्या  . इतपर्यंत यात खटकण्यासारखे काही नाही गंमत घडते ती मतदानाची मोजणी करताना .
    समजा एखाद्या राज्यात ३५ इलेक्टोर आहेत . त्यापैकी १८ इलेक्टर  डेमोक्रेटिक पक्षाचे आणि १७ रिपब्लिक पक्षाचे निवडून आले तरी या राज्यात डेमोक्रेटिक पक्षाचे जास्त संख्येने इलेक्टोर आले असल्याने सर्वांचा सर्व ३५ इलेक्टोर हे डेमोक्रेटिक पक्षाचे निवडून आले असे समजले जाईल २०१६ च्या निवडणुकीत याचा प्रणालीमुळे लोकांचे जनमत हिलरी क्लिंटन असून देखील मोजक्या राज्यात बहुमत असल्याने डोनाल्ड ट्रम्प निवडून आले . त्या लोकांच्या मताला पॉप्युलर वोटिंग असे म्हणतात .
    युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे प्रत्यक्षातले मतदान  होण्यास अजून एक वर्षांचा कालावधी आहे . या दरम्यान अनेक घडामोडी घडतील हे मात्र नक्की 


अजिंक्य तरटे 

९५५२५९९४९५ 

९४२३५१५४००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?