नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ?

       

  नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे नाशिकचे रहिवासी असलेल्या ग्रँडमास्टर यांनी इंग्लंडमधील आइल् ऑफ मॅन या शहरात खेळविण्यात आलेल्या ग्रँड स्विस या महत्त्वाच्या स्पर्धेत मिळवलेले अभिनंदनास्पद यश होय  पाचवेळच्या विश्वेकविजेता मॅग्नम कार्लसन आणि २०२२ चा विश्वविजेता डिंग लिरेन सह आणखी दोन खेळाडू वगळता जगातील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत उतरले होते अश्या मात्तबर खेळाडूंना नमवत विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे   यातील विजेता आणि उपविजेता हे हे जातात सर्वात उत्कृष्ट असणाऱ्या  अशा आठ खेळाडूंसाठीच राखीव  असलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात आणि कॅंडिडेट्स मधील विजेता २०२२ च्या विश्वविजेत्या बरोबर ( म्हणजे चीन च्या लिंग डिरेन बरोबर )आगामी विश्वविजेतेपदासठी दोन हात करील. त्यामुळे नाशिककर असणाऱ्या ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांची विश्वविजेता होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आणि  तो  देखील  हे विश्वीजेता होण्याच्या मार्ग ज्या स्पर्धेतून जातो अश्या फिडे ग्रँडस्विस या स्पर्धेत पहिला डाव फिडे गुणांकनात आपल्यापेक्षा कमी असलेल्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारत या पराभवाममुळे खचून न जात त्याच्या आपल्या पुढील खेळावर अनुचित परिणाम ना होता पुढील दहा फेऱ्यात ७ विजय आणि तीन डावात बरोबरी करत 
        विदित यांचा पहिला सामना झाला तो  नेदरलँड्सच्या अर्लीन लामिशी ( एलो रेटिंग २६२७) यांच्याशी विदित यांचे फिडे गुणांकन प्रतिस्पर्ध्यापेक्षा ९० वे जास्त (२७१५ ) असून देखील त्यांना अनपेक्षितरित्या पराभवाचा कडू घोट प्यावा लागला  विदित यांचे पुढील तीन सामने स्वतःच्याच देशाचा असलेल्या  ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता, जर्मनीचा दिमित्री कोलार्स आणि स्पेनचा बुजुर्ग खेळाडू ॲलेक्स शिरोव खिश्यात घालून या विजयाद्वारे आपला आत्मविश्वास प्रत मिळवत   गाडी रुळांवर आणली ! त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत पुढील टप्पे तसे आव्हानात्मक होते मात्र ते त्यांनी लीलया पेलले   सहाव्या फेरीत पाचवेळा विश्वविजेता असणाऱ्या कार्लसन विरूध्द इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरून  खेळून बदनाम झालेला अमेरिकन हान्स निमन, यांच्याशी त्यांची गाठ पडली तर आठव्या फेरीत विदित यांना आपल्यापेक्षा  ६५ एलो रेटिंगने  पुढे असलेला हिकारु नाकामुरा आणि नवव्या फेरीत रशियाचा आंद्रे एसिपेंकोच्या यांच्याशी खेळायला लागले  पण विदित यांनी हुशारीने सगळे हल्ले परतून लावले. 
         विदित हे स्पर्धेत सहाव्या फेरीपासून संयुक्तपणे आघाडीवर होते  जे त्यांनी दहाव्या फेरीपर्यत कायम ठेवले  आणि अखेरच्या अकराव्या फेरीत तुलनेने दुबळ्या पण धाडसी आणि आक्रमक अशा २६५६ फिडे रेटिंग असलेल्या  अलेक्झांडर प्रेडले यांना हरवले हा सामना झाल्यावर माध्यमांशी बोलताना विदित यांनी सांगितले की, , खूप दिवसात मी एखादी स्पर्धा जिंकत आहे, त्याचा आनंद आहेच पण पहिला डाव हरुन देखील मी विजेता झालो आणि तेही जगातील सर्व अव्वल खेळाडू स्पर्धेत असताना याचा आनंद अधिक आहे !
           नुकतेच २९ वर्षीय झालेले विदित वयाच्या ९ व्या  वर्षांपासून स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळत  आहेत त्यांच्या आतापर्यटनच्या सुमारे २० वर्षांच्या कारकिर्दीतील हा परमोच्च बिंदू आहे . यापूर्वी त्यांनी आशियाई उपविजेतेपद,., १४ वर्षाखालील विश्व विजेतेपद आणि १६ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत उपविजेतेपद, तसेच भारतीय कर्णधार म्हणून २०२० साली झालेल्या चेस ओलिंपियाड मध्ये भारताला विजेतेपद मिळवुन दिले तर अलीकडे चीन मधील
हॅंगझाऊ येथील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवून दिले तरीही ग्रांड स्विस स्पर्धेतील वैयक्तिक विजेतेपदाची झळाळी काही वेगळीच आहे ! विदित यांच्या  सुदैवाने त्यांना सर्व  ११ फेऱ्यात त्याच्यापेक्षा जास्त रेटिंग असलेल्या फक्त एकाच – अमेरिकन हिकारु नाकामुरा- खेळाडूशी सामना करावा लागला पण त्यामुळे त्यांनी मिळविलेले यश आजिबात कमी महत्त्वाचे होत नाही.
इतक्या उच्च दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याचे दडपण काही वेगळेच असते त्यामुळे समोर कोण खेळाडू आहे आणि त्याचे रेटिंग कमी आहे की जास्त आहे हे आजिबात महत्त्वाचे नसते. रेटिंग कमी असलेले खेळाडू देखील उच्च दर्जाचा खेळ खेळतात. त्यांना कमी लेखून चालत नाही ! . या ऐतिहासिक विजयाने विदित यांचे  २७१५ हे ऑक्टोबर अखेरीस असलेले रेटींगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन  ते आता २७३७ झाले आहे आणि ते  जगात २८ क्रमांकावरुन १६ व्या क्रमांकावर आले आहेत  तर भारतात त्यांनी  तिसऱ्या क्रमांकावर ( पहिला अर्थातच विश्वनाथ आनंद आणि दुसरा प्रद्न्यानंदनन ) झेप घेतली आहे ! तसेच ते कॅंडीडेट्स साठी पात्र होणारे आनंद आणि पी हरिकृश्न नंतर तिसराच भारतीय खेळाडू  आहेत यावरून आपल्याला विदित यांच्या या विलक्षण आणि दुर्मिळ यशाचे महत्त्व लक्षात यावे !
     या स्पर्धत जगभरातील उत्कृष्ट असे ११४ खेळाडू खेळत होते त्यांना मागे टाकत विदित यांनी हे यश मिळवले आहे या यशामुळे त्यांच्या विश्वविजेत्याच्या आव्हानवीर निवडण्यासाठी होणारी कॅन्डीडेट स्पर्धा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जगभरातील सर्वोत्तकृष्ट असे ८ बुद्धिबळपटू हि स्पर्धा खेळतात आणि या स्पर्धेतील विजेता विद्यमान विश्वविजेत्यास नवीन विश्वविजेता होण्यासाठी आव्हान देतो ३ एप्रिल २०२४ ते २५ एप्रिल २०२४ या दरम्यान टोरांटो या कॅनडातील शहरात होणार आहे त्यात विदित जिंकल्यास ते वर्तमान बुद्धिबळ विश्वविजेता चिनचा नागरिक असलेल्या डिंग लिरेन यांच्याशी १४ डाव खेळातील या १४ डावात जर विदित यांनी ७. ५ गुण प्राप्त केल्यास ते भारताचे दुसरे विश्वविजेते ठरतील म्हणून म्हंटले नाशिककर  होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ?

या लेखासाठी नाशिकमधील ख्यातनाम क्रीडा मुक्त पत्रकार दीपक ओढेकर यांची मदत झाली आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?