भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ?

     

 भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होणारी भारत अमेरिका यांच्यात झालेली चर्चा.  या चर्चेत भारतातर्फे सरंक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस एस. जयशंकर यांनी तर अमेरिकेतर्फे त्यांचे डिफेन्स सेक्रटरी लॉयड ऑस्टिन आणि फॉरेन सेक्रटरी  अँटोनी ब्लिंकन, यांनी प्रतिनिधित्व करतील . अमेरिकेत अध्यक्षाला मदत करण्यासाठी सेक्रटरी असतात जे आपल्या केंद्रीय मंत्र्याच्या समकक्ष असतात त्या अर्थाने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आणि सरंक्षण मंत्र्यांनी यावेळी हजेरी लावली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोणत्याही दोन देशांच्या राजनैतिक संबंधांच्या विचार करता या प्रकारच्या बैठकीस २ + २ बैठक (टू प्लस टू मिटींग्स ) म्हणतात आपला भारत या प्रकारच्या  टू प्लस टू मिटींग्स जगात जपान अमेरिका या प्रकारच्या  ठराविक देशांबरोबर  घेतो १० नोव्हेंबरला होणारी हि अमेरिकेबरोबरची  पाचवी  टू प्लस टू मिटींग्स आहे  
           यावेळी जग अत्यंत अवघड अश्या कालखांतडून जात आहे रशिया विरुद्ध युक्रेन आणि इस्राईलविरुद्ध हमास ही  दहशतवादी संघटना असे दोन युद्ध सध्या सुरु आहेत . इस्रायलला अमेरिका नेहमीच मोठ्या प्रमाणत मदत करत आला आहे तर दुसऱ्या महायुद्धानंतर बदललेल्या जागतिक संदर्भाचा विचार करता रशिया (पूर्वीचा युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशिया ) हा अमेरिकेचा पारंपरिक शत्रू आहे . तसेच हवामान बदलाच्या संकटाला दोन्ही देश मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहेत . हवामान बदलाविषयी दोन्ही देशांची एकमेकांस विरोधी भूमिका आहे भारताची अमेरिका आणि रशियाबरोबर मैत्री आहे किंबहुना रशिया बरोबर मैत्री अधिक दृढ आहे इस्राईलविरुद्ध हमास या युद्धात भारताने इस्रायलला समर्थन दिले आहे त्याचवेळी स्वतंत्र्य पॅलेस्टानला देखील आपला पाठिंबा दिला आहे पूर्वेकडील नाटो असे म्हंटले जाणाऱ्या क्याड या गटातील ऑस्ट्रेलिया या देशाच्या पंतप्रधानाने नुकताच चीनचा दौरा केला आहे तसेच विविध करणे देत या वर्षी क्याड बैठक ऑस्ट्रेलियात होणे शक्य नसल्याचे सूतोवाच दिले आहे त्या पार्श्वभूमीवर हि बैठक होत आहे हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे 
    भारत अमेरिकेबरोबर क्याड ,आणि आय. टू. यु. टू,.  जय  या सारख्या व्यासपीठाबरोबर आहे क्याड या गटात भारताबरोबर अमेरिकेसह जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश आहेत तर  आय टू यु टू या  या गटात भारताबरोबरइस्राईल युनाटेड अरब अमिरात आणि अमेरिका हे देश आहेत भारत आणि इस्राईल  यांचे आद्याक्षर आय असल्याने तर युनाटेड अरब अमिरात आणि अमेरिका यांचे आद्याक्षर यु असल्याने या गटाला चारही देशांचे
आद्याक्षर एकत्र करत आय टू यु टू या म्हणतात तर जय या गटात भारताबरोबर जपान आणि अमेरिका हे देश आहे या तिन्ही देशांचे आद्याक्षरे एकत्र करत ( JAI ) जय म्हणतात  या गटात वेळोवेळी झालेल्या चर्चा आणि संमत बाबींच्या प्राश्वभूमीवर आपण ही बैठक अभ्यासणे आवश्यक आहे 
      याविषयी आपल्या परराष्ट्र खात्यामार्फत  ८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार या बैठकीत दोन्ही देशातील नागरिकांचा अधिकाधिक संपर्क साधण्याचे प्रयत्न करणे , सरंक्षण विषयक उपकरणे आणि विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण  या विषयी बोलणी या मध्ये होतील तर अमेरिकेतर्फे या महिन्याच्या सुरवातीला  स्टेट डिपार्टमेंट याबाबत घोषणा केली त्यावेळी अमेरिकेच्या  आशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या दक्षिण आशिया उपक्रमाचे संचालक फरवा आमेर म्हणाले की, आगामी संवाद दोन्ही देशांना त्यांच्या जागतिक भागीदारीबद्दलच्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेची आणि मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाची पुष्टी करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
 भारताच्या पूर्वेकडील (नकाश्यात उजव्या हाताला ) बंगालच्या उपसागरपासून आग्नेय आशियाला वळसा घालून सिगापूरमार्गे पॅसिफिक महासागरात पोहोचल्यास आपणास जो मोठा प्रदेश दिसतो त्या सर्व प[प्रदेशास एकत्रितपणे इंडो पॅसिफिक म्हणतात शीत युद्धाची समाप्ती होऊन २५ वर्ष झालेल्या आजच्या काळात जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू हा प्रदेश आहे या देशातील एक महत्वाचा देश म्हणून आपला भारत ओळखला जातो त्यामुळे या प्रदेशाविषयीचा या चर्चा अत्यंत महत्वाच्या आहेत 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?