पाकिस्तान होईल का ब्रिक्स चा सदस्य ?


चीन, भारताच्या जागतिक महासत्ता  होण्याच्या वाटेतील मोठा अडथळा  असणारा देश.  स्वतःला जागतिक महासत्ता होण्याचे असल्याने भारताला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा भारताचा शेजारी देश म्हणजे चीन.सीमेबाबत वाद असला तरी चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत, त्याप्रमाणे चीन स्वतःच्या  महासत्ता होण्याचा वाटेतील अडथळा अर्थात आपल्या भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच मालिकेत चीनने एक नविन कार्ड नुकतेच खेळले आहे.ते म्हणजे जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणाऱ्या ,काही महिन्यांपूर्वी ज्या देशाचा पंतप्रधान जगात अक्षरशः कटोरा घेवून भगवान के नाम पर, अल्ला के नाम कुछ देदेरे बाबा भगवान अल्ला तूम्हारा भला करेगा असे म्हणत जगात फिरत होता.त्या पाकिस्तानला ज्या गटाचा एकत्रीत जिडीपी जगात जी 20, जी 7 या दोन गटानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे,त्या ब्रिक्स या गटाचे सदस्यत्व देण्याबाबतची आग्रही भुमिका मांडण्याचे .त्यासाठी तो रशियावर अप्रत्यक्ष दबाव देखील आणत आहे.एकेकाळी रशिया चीन राजनैतिक संबंधात रशिया हा मोठ्या भावासारखा अधिकारवाणीने बोलू शकणारा देश होता.मात्र रशिया युक्रेन युद्धानंतर
बदललेल्या जागतिक राजकारणात रशिया हा लहान भावासारखा मोठ्या भावाचे ऐकणारा देश झाला असून चीन हा मोठा भाऊ झाला आहे.आणि चीन या बदललेल्या जागतिक राजकारणाचा वापर करत भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.  पाकिस्तानचे रशियातील नव्यानेच रुजू झालेले राजदूत मुहमद्द खालीद जमाली यांनी ताश या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केलेले वक्तव्य ज्यास पाकिस्तानी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या श्रीमती मोमताज झारा बलूच यांनी दिलेला होकार यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी रशियाकडे आम्ही ब्रिक्स चे सदस्यत्व मिळवण्यासाठी विनंती केल्याचे सांगितले . ज्यास रशियाने अंशतः पाठिंबा दिला आहे. जानेवारी 2024मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व सदस्य देशांनी अर्थात ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका यांनी मान्यता दिल्यानंतर पाकिस्तान ब्रिक्सचा भाग होईल. यातील कोणत्याही देशांनी पाकिस्तानच्या सदस्यास नकार दिल्यास पाकिस्तान ब्रिक्सचा भाग होवू शकणार नाही.याला भारत हा विरोध करणार हे उघड आहे.मात्र चीनच्या या छूप्या प्रस्तावने भारत आणि चीनमधील वर्चस्वाची ठिणगी मात्र उडेल हे नक्की .
    ब्रिटीश अर्थशास्त्र जिम्स ओ नील यांनी 2001साली ब्राझील रशिया इंडिया चायना भविष्यकाळात जगाचे आर्थिक इंजिन असतील.त्यांनी एकत्र येवून स्वविकास केला पाहिजे,असे मत मांडले.या मतानुसार या चारही देशांनी एकत्र येत 2066,साली एक गट स्थापन केला‌. त्याला मी वर उल्लेख केलेल्या देशांच्या क्रमानुसार पहिले आद्याक्षर घेत ब्रिक असे नाव दिले.पुढे 2010साली या गटात साऊथ आफ्रिका हा देश समाविष्ट झाला त्यामुळे गटाचे नाव ब्रिक्स असे करण्यात आले.या गटाची दर वर्षी बैठक होते.बैठकीचे अध्यक्षपद संघटनेतील नावानूसार पहिल्यांदा ब्राझील मग रशिया इंडिया चीन साऊथ आफ्रिका या नावाने फिरते‌. त्यानुसार मागील अधिवेशन साऊथ आफ्रिकेत झाल्याने ते यावेळी ब्राझीलमध्ये होणे अपेक्षित होते.मात्र काही कारणाने ब्राझीलने  अधिवेशन बोलवण्यासाठी असमर्थता
दाखवल्याने ते रशियाकडे गेले.आणि चीनने ही  एक वाईट खेळी केली.
      पाकिस्तानच्या मते त्यांना देखील विकसीत होण्याचा पुर्ण अधिकार  आहे.जो ब्रिक्स या गटाचा सदस्य झाल्यास पुर्ण ताकदीने वापरता येईल.लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली असल्याने त्यास अडथळा आणण्यासाठी चीनने कोणत्याच अंगाने गटाचा सदस्य होण्यासाठी पात्र नसलेल्या पाकिस्तानचे पिल्लू सोडले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणतात ते हेच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?