राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल

         

  सध्या आपल्या भारतात अनेक थोर पुरुषांचे भारताच्या प्रगतीतील वाटचालीतील योगदान काय ?याबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असणारे नेते देखील दुर्दैवाने सुटलेले नाहीत.या अश्या नेत्यांबाबत विद्यमान नेते आपल्या स्वार्थासाठी काहीही दावे करत असल्याने मुळातून  वस्तूस्थिती समजण्यासाठी  त्यांचे आत्मचरित्र,चरित्र स्वतः वाचून परिस्थिती समजावून घेणे अत्यावश्यक ठरते‌
       आपल्या दुर्देवाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि सुरवातीच्या उभारणीत मोठे योगदान असलेले सरदार वल्लभभाई पटेल देखील या चक्रातून सुटलेले नाहीत. सरदार पटेल यांच्या बाबत तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा आणि महात्मा गांधींच्या मनात काय मते होती? सरदार पटेल स्वतंत्र  भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर काश्मीर आणि अन्य समस्या कोणत्या स्थितीत असत्या ?याबाबत सातत्याने सांगण्यात येते. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या बाबत विद्यमान राजकीय नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विविध दावे प्रतिदावे यांच्यात त्यांचा
स्वार्थ लपला असल्याने ते वस्तूस्थिती दर्शक नाही, असे सहजतेने समजते.सरदार वल्लभभाई पटेल हे देशातील महत्त्वाचे नेते असल्याने त्यांच्याबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे ‌.याबाबत लेखाचा सुरवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचे चरित्र वाचणे अत्यावश्यक आहे. नेमकी हीच बाब हेरून मी त्यांचे चरित्र नुकतेच वाचले. 
    पुण्याचा विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि पंकज पाटील तसेच संदिप तापकीर लिखित या चरित्रात वेगवेगळ्या 30प्रकरणाद्वारे आणि 8परिशिष्टाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे चरित्र उलगडण्यात आले आहे.ज्यामध्ये त्यांचे राजकीय जीवनातील प्रवेशा अगोदरचे सार्वजनिक जीवन ,त्यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवेश ,त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांची विविध विषयांवरची मते भुमिका, विविध मान्यवरांची सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी मते, त्यांचा व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे, वर्तमानात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत  त्यांनी केलेले सुतोवाच , त्यांची दुर्मिळ  छायाचित्रे, त्यांचा जीवनपट संक्षिप्त स्वरुपात आदींबाबत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
        पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली संदर्भसुची लेखकाने पुस्तक निर्मितीसाठी किती कष्ट घेतले हे स्पष्ट करते‌.या संदर्भ सुचित सुमारे 80 ते 90संदर्भ ग्रथांची नावे देण्यात आलेली आहे  लेखकाने पुस्तकांखेरीज काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून लोकांच्या मुलाखती घेवून पुस्तक तयार केले आहे.ज्याची यादी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे सुमारे 376 पानांच्या या पुस्तकात सर्वच पाने माहितीने भरलेली आहे.पुस्तकाची भाषा देखील ओघवती आणि सहजसुलभ आहे.त्यामुळे चरित्र वाचताना कंटाळवाणे होत नाही, आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट ,त्यांनी उपसले कष्ट सहजतेने समजतात.
   सुमारे 376पानाच्या या पुस्तकात सुरवातीची मोजकी पाने वगळता अन्य सर्व पुस्तकात त्यांचे राजकीय जीवन सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आले आहे. 30 प्रकरणापैकी सुरवातीची सात प्रकरणे त्यांचा राजकीय प्रवेशाच्या आधीच्या सार्वजनिक जिवनाविषयी ,त्यांचा शालेय जीवनाविषयी तसेच त्यांचा वैयक्तिक आयुष्याविषयी आपणास माहिती देतात. पानांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास ,376पानांच्या या पुस्तकात सुरवातीची 40,ते 45 पाने लेखकाने
यासाठी खर्ची घातली आहेत. त्यानंतरची सर्व पाने लेखकाने त्यांच्या राजकीय जीवनाविषयी सांगितले आहे. त्यांचे घटना समितीतील कार्य ,देशाच्या घटना समितीविषयीची त्यांची मते, 1942पासुन देशातील बदललेल्या राजकीय सत्ता समिकरणाविषयीची त्यांची भुमिका, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील संबंध, दूसऱ्या महायुद्धातील काँग्रेसची भुमिका, मुस्लिम लीगची कटकारस्थाने, देशाची फाळणी, संस्थानिकांचे विलीनीकरण ,देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून कार्य करताना भेडसावणाऱ्या समस्या ,यातना भारतीय प्रशासन सेवेची निर्मिती ,दिल्ली दंगल आणि महात्मा गांधी यांची हत्या यावर लेखकाने सविस्तर भाष्य केले आहे.जवळपास निम्मे पुस्तक या घटनांबाबत आपणास माहिती देते‌
लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सध्याचा राजकारणाचा दलदलीत मुळ स्थिती समजण्यासाठी  सरदार पटेल यांचे हे चरित्र वाचायलाच हवे.मग वाचणार ना पुस्तक.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?