सिंहावलोकन २०२३ भारताचा जागतिक परिषदातील सहभाग

          


सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षच सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारताचा जागतिक परिषदातील सहभाग  या क्षेत्रातील घडामोडी बघूया

या क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्य उत्तर जरी जी २० असे असले तरी भारताने या खेरीज अनेक जागतिक परिषदमध्ये आपला सहभाग नोंदवला अर्थात जी २० चे महत्व मोठे असले तरी अन्य जागतिक परिषदा या दुर्लक्षून टाकण्यासारखा होत नाहीत

व्यापार करणे सोईचे व्हावे प्रदेश जागतिक बाजरपेठेत एक प्रबळ गट म्हणून उदयास यावा या हेतूने या प्रदेशातील देशांकडून  स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे गल्फ कंट्री कोऑपरेशन होय हि संघटना तिच्या अद्याक्षरांवरून जी सी सी म्हणून ओळखली जाते सौदी अरेबिया कुवेत ओमान कतार बहारीन आणि युनाटेड अरब अमिरात हे सहा देश याचे संस्थापक सदस्य आहेत २० मार्च रोजी सौदी अरेबिया देशाची राजधानी असलेल्या रियाध या शहरात झालेली पहिली भारत आणि गल्फ कॅट्री कोऑपरेशन या संघटनेदरम्यान झालेली पहिली सिनियर ऑफिसर मिटिंग होय

या बैठकीत  भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व CPV&OIA चे सचिव डॉऔसफ सईदकरत होते तर GCC शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे  GCC सहाय्यक महासचिव डॉअब्दुल अझीझ बिन हमाद अल-ओवैशाक,करत   होतेया बैठकीत GCC च्या सर्व 6 सदस्य देशांचा सहभाग होतासदर बैठक  आपले परराष्ट्र मं

त्री डॉ एस जयशंकर यांनी सप्टेंबर 2022 मध्ये रियाध भेटीदरम्यान भारत-GCC सल्लामसलत यंत्रणेवर स्वाक्षरी केलेल्या MOU च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत  भारत-GCC देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीतील प्रगतीबद्दल दोन्ही बाजूंनी आनंद व्यक्त केलाभारत-GCC मुक्त व्यापार कराराला (FTA) लवकर अंतिम रूप देण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवलीया बैठकीत भारताकडून  GCC देशांदरम्यान अक्षय ऊर्जाअन्न सुरक्षाआरोग्य, IT क्षेत्र आणि दहशतवादविरोधी अधिक सहकार्यासाठी आमंत्रित केले

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR);या  15 सदस्यीय कॅरिबियन देशांच्या संघटनेच्या परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठकीसाठी  गयाना देशात गेले (CARICOM))  संघटनेत सहभागी असणाऱ्या देशांशी परराष्ट्र मंत्री स्तरावरचे संबंध अधिक उत्तम कारण्यासासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा होता

भारत या वर्षी जी २० च्या बरोबर शांघाय को ऑपरेशन या गटाचा देखील सदस्य होता त्याचे अधिवेशन २८ एप्रिल रोजी नवी दिल्लीत झाले जगातील सर्वात मोठे प्रादेशिक संघटन म्हणून शांघाय को ऑपरेशन ओळखले जाते हे एक मुख्यतः व्यापारी संबंध अधिक वाढावे यासाठी कार्य करणारे संघटन आहे 

भारताच्या पररराष्ट्र संबंधाच्या विचार करता या दोन वर्षांपूर्वी सन २०२१ मध्ये चर्चेत आलेला ब्रिक्स या गटाचा विस्तार करून त्यात पाकिस्तानचा देखील समावेश करण्याच्या मुद्दा या वर्षी देखील ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात चर्चेत आला पाकिस्तानचे रशियातील राजदूत मोहमदद खालीद जमाली यांनी एका रशियन माध्यमास दिलेल्या मुलाखती दरम्यान या मुद्याचा उल्लेख केल्याने आणि त्यास पाकिस्तानी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या (आपल्या अरविंदम बागची यांच्या समकक्ष ) श्रीमती मोमताज झारो बलूच  यांनी दुजारो दिला 

भारतात झालेल्या जी २० परिषदेच्या मुख्य बैठकीत मुख्य भूमीत ५१ आणि  बेटाच्या स्वरूपात असलेल्या तीन देशांच्या समावेश करून  एकूण  ५४ देशांचा समूह असलेल्या आफ्रिका खंडातील देशांचा समूह असलेल्या आफ्रिकी महासंघास २७ देशांचा समूह असलेल्या युरोपीय युनियनसारखे सदस्यत्व देण्यात आले हे सदस्यत्व पूर्ण वेळचे आहे या पुढच्या जी २० च्या अधिवेशनतर्फे त्या त्या वेळचे महासंघाचे अध्यक्ष आफ्रिकी महासंघाचे प्रतिनिधित्व करतील 

 या खेरीज नेहमीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्टसंघाची आणि डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातदुबई येथे कॉपची वार्षिक परिषद झाली न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधित्व पराष्ट्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी केले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी म्हणून मोदींच्या गैरहजेरीत हजेरी लावली कॉप अधिवेशनात कोळशाच्या वापर झपाट्याने कमी करत शून्यावर आणण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला त्यास भारताने विरोध दर्शवला 

एकंदरीत या वर्षी जी २० सह झालेल्या अनेक परिषदांमध्ये भारताचा डंका जोरात वाजला  

भारताचे सार्क देश वगळून अन्य देशांशी समाधी कसे  राहिले हे समजण्यासाठी पुढील लिन्क्वेअर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html

भारताच्या क्रीडाविश्वात सरत्या वर्षात काय झाले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

भारताचे शेजारी देशांबरोबर संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकर क्लिक करा 


https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html

सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात काय बदल झाले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_20.html

सरत्या वर्षात भारतावर कोणत्या नैसर्गिक आपत्ती आल्या ते समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_66.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?