सिंहावलोकन २०२३भारताच्या शेजारील देशातील घडामोडी

सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात  भारताचे शेजारी या क्षेत्रातील घडामोडी बघूया  

भुतानचा अपवाद वगळता भारताच्या सर्वच शेजारी देशात यंदा मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. श्रीलंकेत वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यातच तेथील सरकारने वीजदर मोठ्या प्रमाणात वाढवले.मागच्या वर्षांपासून सामोरे जात असलेल्या
आर्थिक अडचणींवर सुटका करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आय एम एफ) आर्थिक साह्य घेण्यासाठी त्यामुळे मदत मिळू शकेल,असा  अंदाज या दरवाढीमागे होता. या खेरीज श्रीलंकेत ब्रिटीश राजवटीत चहाच्या मळ्यात  काम करायला तामिळी नागरीक येण्यास 200वर्ष पुर्ण झाल्याबद्दल एक समारंभ देखील या वर्षी झाला. मुळ सिंहली नागरीक आणि तामिळी नागरीक यांच्यातील संघर्षात पोळलेल्या श्रीलंकेत हा समारंभ होते हे एक नवलच म्हणायला हवे.

 बांगलादेशाबाबत  बोलायचे झाल्यास सत्ताधिकारी अवामी लिग या पक्षाविरोधात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी ने (बीएनपी) अन्य विरोधी पक्षाच्या मदतीने आंदोलनाने बांगलादेश या वर्षी चर्चेत राहिला बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बिएनपीने सत्ताधिकारी वर्गाविरोधात आंदोलन करताना इस्लामी मुलतत्ववादी पक्षांशी देखील हातमिळवणी केल्याने यावर्षी अल्पसंख्याक समुदायावर हल्ल्याच्या घटनांमध्ये या वर्षी काहीशी वाढ दिसली. अवामी लीगने त्यांची सत्ता असताना सन 2004मध्ये बांगलादेशाच्या संविधानात समाविष्ट केलेला मात्र त्यांच्याच सत्ताकाळात पुढे 2015साली संविधानातून काढून टाकलेल्या ,बांगलादेशात

संसदेच्या निवडणूकीचा काळात सत्ताधारी पक्षाने राजीनामा देवून सर्वपक्षीय सरकार स्थापन करावे या तरतूदीचे पालन सध्या अवामी लीगने केल्यामुळे विरोधक बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी ने (बीएनपी) जानेवारी 2024मध्ये होणाऱ्या,निवडणूका या निःपक्षपाती होण्याची शक्यता नसल्याचे सांगत या निवडणुकीतून माघार घेण्याची भाषा. केल्याने बांगलादेश या वर्षी विशेष चर्चेत आला पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत पराभुत झाल्यावर भारताची हार बांगलादेशात मोठ्या प्रमाणात साजरी केल्याने बांगलादेश यावर्षी विशेष चर्चेत आला.

म्यानमारच्या संदर्भात हे वर्ष अत्यंत वादळी होते.म्यानमारमधील लष्करी राजवट आणि लोकशाहीवादी नागरीक यांच्यातील संघर्षात ल़ोकशाहीवादी नागरीकांनी म्यानमारमधील चीन या प्रांतांत मर्यादित प्रदेशात का होईना स्वतः चे शासन सुरु केल्यामुळे म्यानमार या वर्षी विशेष चर्चेत आले.म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या स्नूकी यांना यावर्षी विविध खटल्यांमध्ये दोषी ठरवून दिर्घ मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या. रोहिंग्या मुस्लिम बांधवांच्या प्रश्नांवरून देखील म्यानमार या वर्षी चर्चेत राहिला

 चीनचा विचार करायचा झाल्यास चीनची दादागिरी याही वर्षी सुरु राहिली तैवानच्या सागरी क्षेत्रात आपल्या विमानांना सोडण्याचे चीनचे धोरण याही वर्षी सुरूच राहिले.इटलीने या वर्षाच्या अखेरीस चीनचा महत्ताकांक्षी प्रकल्प असलेल्या मी आर आय प्रकल्पातून माघार घेतली.चीनचे अध्यक्ष श्री जिनपिंग यांनी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्सचा अधिवेशनाला हजेरी लावली मात्र भारतात झालेल्या जी 20,घ्या अधिवेशनाला गैरहजेरी दाखवली.

नेपाळच्या बाबत बोलायचे झाल्यास सरत्या वर्षातील शेवटचे चार महिने नेपाळसाठी अत्यंत संघर्षाचे ठरले.नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे.नेपाळचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा. तसेच नेपाळची वर्तमान गणराज्य (रिपब्लिक) व्यवस्था बदलून नेपाळमध्ये पुन्हा घटनादत्त राजेशाही असावी या मागणीसाठी मोठे

आंदोलन झाले तसे नेपाळला या विषयावरची आंदोलने नवी नाहीत.या विषयावर अनेकदा नेपाळमध्ये आंदोलने झाली आहेत.मात्र वर्षाच्या  अखेरच्या चार महिन्यांत झालेले आंदोलन मागच्या आंदोलनापेक्षा खुपचं तीव्र होते.नेपाळमध्ये अराजकता सारखी स्थिती यामुळे निर्माण झाली.

अफगाणिस्तानचा विचार करता विद्यमान तालिबान 2.0 राजवटीत सरत्या वर्षात अफगाणिस्तानची स्थिती पुर्वी पेक्षा मोठ्या प्रमाणात बिघडली. भुकंप तसेच जागतिक स्तरावर विविध देशांनी तोडलेले राजनैतिक संबंध यामुळे अफगाणिस्तानची स्थिती मोठ्या प्रमाणात बिघडली. एखाद्या देशातील नागरिकांना दुसऱ्या देशात किती मान दिला जातो हे पासपोर्ट इंडेक्स वरुन समजते.हा इंडेक्स जितका कमी तितका त्या देशातील नागरिकांना  जगात मान जास्त असा संबंध आहे.(पहिल्या  क्रमाकावरील देशाला सगळ्यात जास्त  मार्क तर दुसऱ्या क्रमांकावरील देशाला कमी मार्क या प्रमाणे) 210देशांच्या यादीत या वर्षी अफगाणिस्तानचा पासपोर्ट इंडेक्स सगळ्यात कमी म्हणजेच 210वा होता.

पाकिस्तानचा विचार करता तेथील राजकरणने सरत्या वर्षात निच्चतम पातळी गाठली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या "पाकिस्तान तेहरीके इंसाफ" या पक्षाविरोधात आणि या पक्षाचे प्रमुख नेते असलेले संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्या विरोधात या वर्षी अत्यंत निच्चतम पातळीवरचे राजकारण खेळले गेले. संपूर्ण वर्ष पाकिस्तानी जनता निवडणूका कधी होणार ?याकडे डोळे लावून बसली होती.सत्ताधिकारी पक्षाकडून निवडणूक आयोग राष्ट्रपती यांचा वापर करत या निवडणूका सातत्याने पुढे ढकलण्यात येत होत्या. अखेर पुढील वर्षी 8फेब्रुवारी रोजी या निवडणूका होणार आहेत.मात्र पाकिस्तानमधील राजकारण बघता या निवडणूका जेव्हा होतील तेव्हाच खरे .सरत्य वर्षांचा विचार करता पाकिस्तानचे राजकारण निवडणूका आणि इम्रान खान यांच्या भोवतीच खेळले गेले.पाकिस्तानात यावर्षी राजकारणाच्या साडेसातीत अर्थव्यवस्था मात्र पार धूळीस मिळाली.महागाईने मागील सर्व उच्चांक मोडले. परदेशी गंगाजळी पुर्णतः आटली.मात्र युनायटेड अरब अमिरातस् (यु )चीन सारख्या मित्र देशांनी मदत केल्यामुळे श्रीलंकेसारखी स्थिती झाली नाही,हे विशेष पासपोर्ट इंडेक्समध्ये पाकिस्तानचा नंबर शेवटून चवथा आहे.

मालदीवचा विचार करता सुन्नी मुस्लिम असणे नागरिकत्वासाठी आवश्यक असणाऱ्या या देशात यावर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूका झाला. या निवडणूका मालदीवचा सार्वभौमत्वावर भारताची पकड या मुद्यावर लढवल्या गेला सरतेशेवटी भारतविरोधी चीन समर्थक मुहम्मद मुइज्जुरा ष्ट्रपती म्हणून निवडले गेले.

 

एकंदरीत सरते वर्ष भारताच्या शेजारील देशांसाठी वादळी ठरले हेच खरे

 

 

 

 सरत्या वर्षात जगभरात काय घडामोडी घडल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_23.html

सरत्या वर्षात भारतीयांना अनुभवायास आलेल्या नैराश्याचे चिंतनाचे अभिमानाचे आनंदाच्या क्षणविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_53.html

सरत्या वर्षात भारताचा जागतिक परिषदेत कसा सहभाग होता हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_22.html

मावळत्या वर्षात भारतात काय काय नैसर्गिक आपत्ती आल्या हे जाणून घेण्यासाठी [पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_66.html

मावळत्या वर्षात भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_20.html

मावळत्या वर्षात वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशांचे राजनैतिक संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html 

सरत्या वर्षात भारताच्या क्रीडाविश्वात काय काय घडामोडी झाल्या हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

सरत्या वर्षात भारताचे सार्क देश वगळून जगातील अन्य देशांशी राजनॆतिक संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?