सिंहावलोकन २०२३ जागतिक घडामोडी

 


सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने  कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात  जागतिक घडामोडी  बघूया

जागतिक घडामोडींचा विचार सरत्या वर्षात घडलेल्या घडामोडीचा आपण नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडी असे विभाजन करू शकतो. सरत्या २०२३ या वर्षात या दोन्ही गटात अनेक घडामोडी घडल्या आपण या बघताना प्रथम नैसर्गिक आपत्ती बघूया

तर मित्रानो २०२३ या वर्षाची सुरवातच अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय देशांना बदलत्या हवामानाच्या संकटाचा सामना करून झाली २०२२ या वर्षाच्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेले हवामानाचे लहरी वागणे हे फेब्रुवारीच्या अखेर पर्यंत सुरूच राहिले तेथील प्रशासनाने देखील या बदलत्या हवामानापुढे हात टेकले   युरोप आणि आशिया यांच्या  सीमेवर वसलेल्या तुर्कीये (जुने नाव तुर्कस्तान ) या देशाची पहाट  फेब्रुवारी रोजी महाविध्वंसकारी भूकंपाच्या उद्रेकाने उजाडली या भूकंपात सुमारे हजार लोक मृत्युमुखी पडले उत्तर आफ्रिकेत देखील या वर्षी  मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला आफ्रिका खंडातील . लिबिया या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आणि दोन धरणे फुटल्याने शब्दशः  हाहाकार उडाला. देशातील दोन मोठी शहरे अक्षरशः भुईसपाट झाली येथे खरेच शहरे होती का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा अशी तेथील भौगोलिक स्थिती झाली . तर मोरोक्को या देशात शक्तिशाली म्हणता येईल असा पूर्णांक शतांश तीव्रतेचा मोठा भूकंप झाला  ज्यामध्ये हजारो  जणांना आपले प्राण गमवावे लागले

राजकीय घडामोडींचा विचार करता वर्षाच्या सुरवातीला जर्मनी आणि  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशिया युक्रेन युद्धात आम्ही युक्रेनला रणगाडे पुरवू असे वादग्रस्त विधान करून रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढणारे विधान केले तर फेब्रुवारीत ब्रेक्सिटच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या युनाटेड किंगडमच्या नार्दन आयर्लंड या भागाचे आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड या देशाशी असणारे आर्थिक राजकीय संबंध कसे असावेत या प्रश्नांची

उकल कारण्यासासाठी युनाटेड किंगडम आणि युरोपीय युनियन यांच्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करार झाला ऑक्टोबर महिन्यात हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईल या देशावर हल्ला करून पश्चिम आशिया या भागात नव्या युद्धाला तोंड फोडले वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यात अमेरिकेच्या ४७ व्या अधयाक्षपदाची रणधुमाळी मोठ्या वेगाने सुरु झाली हा मजकूर लिहण्यापर्यंत सध्या मलेरिकेत निवडणुकीचा पहिला टप्पा असलेला प्रायमरी कॉक्कस  च्या फेरी सुरु आहेत नव्या वर्षाच्या सुरवातीला दुसरा टप्पा अर्थात  नॅशनल कॅव्हसन होईल  याच वर्षी चीनने सौदी अरेबिया आणि येमेन या पश्चिमी आशियातील देशातील वादात मध्यस्ती करत जगातील महासत्ता होण्याच्या प्रक्रियेस मोठ्या दिमाखात सुरवात केली

एकंदरीत सरते २०२३ हे वर्ष  जागतिक घडामोंचा विचार करता अत्यंत वादळी ठरले असेच म्हणावे लागेल

भारतीयांना सरत्या वर्षात कोणत्या चिंतेने ग्रासले भारतीयांचे शरमेची आनंदाचे अभिमानाचे कोणते क्षण होते हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_53.htm l

 

सरत्या वर्षात भारताने कोणकोणत्या जागतिक परिषदेमध्ये कसा सहभाग नोंदवला हे समजण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_22.html

 सरत्या वर्षात भारतात कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आल्या हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_66.html

 

सरत्या वर्षात सार्वजनिक वाहतूक या क्षेत्रात काय घडामोडी घडल्या हे समजण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_20.html

 

 सरत्या वर्षात भारताचे शेजारी देशांशी संबंध कसे राहिले हे समजण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html

 

 सरत्या वर्षात भारताच्या क्रीडाविश्वात काय घडामोडी झाल्या हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

 

सरत्या सार्क देश वगळून अन्य जगात भारताचे संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?