सिंहावलोकन २०२३ भारत आणि भारताचे शेजारी

   


  सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारत आणि भारताचे शेजारी या क्षेत्रातील घडामोडी बघूया         

२०२३ या सरत्या वर्षात नेपाळ  आणि भूतान या दोन देशाचे राष्ट्रप्रमुख भारतात आले  नेपाळच्या पंतप्रधान यांनी ३१ मे ते ३ जून या काळात भारताचा दौरा केला तर भूतानच्या राज्याने ३ ते १० नोव्हेंबर या दरम्यान भारताचा दौरा केला . या वर्षात श्रीलंका या देशांने भारतीयांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्यास सुरवात केली. गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेली तामिळनाडू राज्यातील नागपट्टणम ते श्रीलंका देशातील जाफना या शहरांदरम्यान फेरी सेवा देखील या वर्षी सुरु करण्यात आली श्रीलंकेमध्ये ब्रिटिश राजवटीत तामिळ भाषिक व्यक्तींना चहाच्या मळ्यात काम करण्यास सुरवात होऊन या वर्षी २०० वर्ष पूर्ण झाली त्या निमितायने श्रीलंकेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेऑक्टोबर महिन्यात बिमस्टेकच्या अधिवेशनासाठी आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी श्रीलेकचा दौरा केला  होते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली ईशान्य भारताशी अन्य भारताचा संपर्क वाढावा यासाठी बांगलादेशाची मदत घेण्याबाबत या वर्षी मोठ्या प्रमाणात करार कारणात येण्यासह या बांगलादेश आणि भारतात दळवलनाच्या सोइ सवलती यावर्षी वाढवण्यात आल्या बांगलादेशातील सर्वसामान्य जनतेत भारत द्वेष

मोठ्या प्रमाणात असल्याचे यावर्षी दिसून आले बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचाराच्या घटनेत यावर्षी मोठी वाढ दिसून आली तसेच बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी बांगलादेशातील नागरिकांसाठी भारताची सीमा पूर्णपणे खुली करावी . बांगलादेशी नागरिकांना व्हिसा शिवाय भारतात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी केली केले भारत चीन सीमेवर तणावपूर्ण शांतता राहिली भारतात झालेल्या जी २० च्या अधिवेशनाला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अनुपस्थिती राहणेच पसंतकेले मालदीव  या देशात चीन समर्थक मुहम्मद मुइज्जु हे देशाचे राष्ट्रपती झाले सत्तेवर आल्यावर त्यांनी पहिलाच निणर्य खरेतर मालदीवमधील नागरिकासासाठी तैनात असलेले भारतीय नौसेनेच्या हेलिकॅप्टरला मनाई करून आपला चीन विरोध दर्शवला भारताचे अन्य दोन सहकारी पाकिस्तान आणि म्यानमार बाबत भारताच्या फारश्या घडामोडी झाल्या नाहीत

आता या घडामोडी विस्ताराने बघूया बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हन्यू ने २ मे रोजी एक निर्णय जाहीर केला या निर्णयानुसार बांगलादेशची सुमारे ९० % आयात निर्यात होत असलेल्या चितगाव (बंगाली उच्चार चितोग्राम )  बंदराचा आणि बांगलादेश मधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असलेल्या मोंगला बंदराचा भारताने कयमस्वरूपी वापर करण्याची   परवानगी बांगलादेशकडून देण्यात आली .

नेपाळचे पंतप्रधान  पुष्पकमल दहल 'प्रचंड' हे भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून  या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर   आले होते .  सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती .परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद, , अर्थमंत्री, डॉ. प्रकाश शरण महत, . ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री, शक्ती बहादूर बस्नेत,भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री,. प्रकाश ज्वाला, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री  रमेश रिजाल,  हे या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचा भाग

होते दोन्ही पंतप्रधानांनी पारंपारिक सौहार्द आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली. त्यांच्या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेपाळमधील राजकीय, आर्थिक, व्यापार, ऊर्जा, सुरक्षा आणि विकासात्मक सहकार्याचा समावेश असलेल्या द्विपक्षीय कार्यक्रमाच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा आढावा घेतला.

  भारत सरकारने नेपाळ आणि भुटानच्या सरकारशी केलेल्या करारानुसार त्या देशातील नागरिक भारतात आणि भारतीय नागरिक त्यांच्या देशात व्हिसाशिवाय सहजतेने जावू शकतात. तिच सवलत भारताने आता बांग्लादेशाला देखील लागू करावी,अशी मागणी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली १ बांगलादेशच्या पंतप्रधान नोव्हेंबर रोजीआपले पंतप्रधान नरेंद मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत बांगलादेश यांच्या दरम्यानचे तीन विकासप्रकल्पाचे व्हिडोओ कॉन्फरसिंग द्वारे उद्धघाटन केले . ज्यामध्ये बांगलादेशमधील अखूरा ते त्रिपुराची राजधानी अगरताळा या दरम्यान सुरु झालेली रेल्वेसेवा ., बांगलादेशची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा अजग सणारा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प, आणि बांगलादेशातील दुसरे महत्वाचे बंदर असलेल्या  मोंगला येथून खुणलापर्यंतब्रँडगेज रेल्वेमार्ग या प्रकल्पाचा समावेश आहे

 १४ ऑक्टोबर रोजी तामिळनाडू च्या नागापट्टणम ते श्रीलंकेच्या जाफना प्रांतातील कनकेसंथुराय या दोन शहरातील ६० नॉटिकल मेल (सुमारे ११० किलोमीटर ) लांबीची फेरी  सेवा सुरु करण्यात आली श्रीलंकेच्या अंतर्गत यादवीमुळे १९८२ ला ही सेवा बंद करण्यात आली होती . वर्षाच्या अखेरीस पाकिस्तान ब्रिक्सचा सदस्य देश होईल का याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली

एकंदरीत भारत आणि भारताचे शेजारी या संदर्भात सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या हे नाकारून चालणार नाही 

माझ्या सरत्या वर्षातील भारत आणि क्रीडाविश्व या संदर्भातील लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html


माझ्या सरत्या वर्षातील भारत आणि जग (सार्क देश वगळून ) या संदर्भातील लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?