भारत अमेरिका


   नुकतीच अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर यांनी भारताचा दौरा केला . हा दौरा जरी पूर्वनियोजित असला तरी, अमेरिका देशाच्या जमिनीवर, खलिस्तान समर्थक अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याच्या प्रयत्न एका भारत सरकारच्या एका उच्चपदस्थानाने करण्याच्या मुद्यावरून भारत अमेरिका राजनीतिक संबंध काहीसे  ताणले गेले आहेत या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे हे आपण  लक्षात घेयला हवे या दौऱ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर यांनी आपले उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (स्ट्रॅटेजिक अफेअर्स) विक्रम मिसरी यांच्याशी  चर्चा केली हि भेटय यावर्षी जानेवारीत आपले राष्ट्रीय सल्लगार अजित डोवाल यांचा अमेरिका दौरा आतासेच याच वर्षी जून महिन्यात अमेरिकेचे राष्टीय सल्लगार जेक सुलिव्हन यांनी केलेल्या भारत दौऱ्याचे फलित म्हणून बघितला जात आहे 

         या दौऱ्यात अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर आणि भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (स्ट्रॅटेजिक अफेअर्स) विक्रम मिसरी यांच्याशी यांच्याशी दोन्ही देशांच्या हितसंबंधाच्या विचार करता महत्वाच्या असणाऱ्या मुद्यांवर तसेचह काही प्रादेशिक आणि जागतिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मुद्यांवर चर्चा केली हितसंबंधाच्या विचार करता पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडेन यांच्या दरम्यान मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या चर्चेत आणि या वर्षी जानेवारीत दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार यांच्याशी झालेल्या चर्चेत अंतिम स्वरूप देण्यात आलेल्या भारत-यूएस इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग

टेक्नॉलॉजीज (iCET)चा मध्यवर्ती आढावा यावेळी घेण्यात आला iCET भारतातील NSCS आणि यूएस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल (NSC) यांच्या सह-नेतृत्वाखाली राबवण्यात्त येणारा प्रकल्प आहे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये परिणाम-केंद्रित सहकार्य अधिक उत्तमपणे करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे सेमीकंडक्टर, क्वांटम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Al) आणि हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC), संरक्षण नवकल्पना, अंतराळ आणि संबंधित सरकार, उद्योग, शैक्षणिक आणि इतर भागधारक यांच्यातील परस्परसंवादाद्वारे प्रगत दूरसंचार यासह विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही देशाती उप राष्ट्रीय सुरक्षा सालगरानी यावेळी समाधान व्यक्त केले

   भारत आणि अमेरिका यांच्यात विविध क्षेत्रात आणि विविध जागतिक व्यासपीठावर सहकार्य केले जातेपूर्वेकडील नाटो म्हणून ओळखला जाणारा क्याड हा गट तर इस्राईल युनाटेड  अरब  अमिरात यांच्याबरोबर असणारा आय टू यु टू, हा गट त्याचीच काही उदाहरणे म्हणता येईल अमेरिकेकच्या चीन विरोधातील आघाडीचा भारत मोठा आणि महत्त्वाचा साथीदार आहे कोणत्याही दोन देशांच्या राजनैतिक संबंधात + या प्रकारच्या बैठका अत्यंत महत्वाच्या असतात आज २०२३ साली भारत ज्या चार देशांबरोबर या प्रकारच्या बैठका आयोजित करतो त्यापैकी एक देश अमेरिका आहे  गेल्याच महिन्यात या प्रकारची दुसरी बैठक आयोजित करण्यात आलेली होती  अनेक भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकेत अनेक मोठ्या कंपन्यामध्ये उचपदस्थ आहेत पुढील वर्षांच्या शेवटी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक मोठा प्रभाव टाकण्याची

शक्यता बोलून दाखवली जात आहे विवेक रामास्वामी हे  डेमोक्रेटिक पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी उत्सुक असणारे उमेदवार अमेरिकेत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत फक्त भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिकच नव्हे तर मुळातील अमेरिकी नागरिक सुद्धा त्यांच्या प्रभावाखाली आलेले आहे खलिस्तान मुद्यावरून भारताशी सभेद मोठ्या प्रमाणात दुरावलेला कॅनडा आणि अमेरिका यांच्यात मोठ्या प्रमाणत मैत्री आहे दोन्ही देशात दुहेरी नागरिकत्व आहे अर्थात एखादा व्यक्ती एकाच वेळी दोन्ही देशांचे नागरिकत्व घेऊ शकतो दोन्ही देश ज्या देशातील बहुसंख्य नागरिकांची मातृभाषा इंग्रजी आहे अश्या देशांच्या गटाचे अर्थात  आय फाईव्हचे सदस्य देश आहेत   या पार्श्वभूमीवर आपण हा दौरा बघायला हवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?