सिंहावलोकन २०२३ :भारतात झालेले, आंदोलन आणि हिंसा


सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात, आंदोलन, हिंसा या क्षेत्रातील घडामोडी बघूया   
      सरत्या वर्षात झालेल्या आंदोलनाचा विचार करता, महाराष्ट्रात वर्षाच्या सुरवातीलाच झालेले एम पी एस सी द्वारे अधिकारी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून झालेल्या  आंदोलनाचा विचार करावाच लागेल. परीक्षेचे स्वरूप लेखी वर्णनात्मक करु नये. ते पुर्वीप्रमाणे ऑब्जेटिव्हच ठेवावे,20 असी त्यांची मागणी होती. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऑब्जेटिव्हच प्रकारची तयारी करत आहोत त्यामुळे हा बदल इतक्या लवकरच आम्हाला स्विकारता येणार नाही,असे आंदोलकांची भुमिका होती‌. अखेर यावर सरकारकडून नमते घेत  हा बदल 2025पासून होणाऱ्या परीक्षेपासून करायचे सरकारने जाहीर केले मुळात हे बदल एम पी एस सी कडुन सहा महिने आधीच जाहीर करण्यात आले होते.मात्र त्यावेळी राजकीय बातम्या मोठ्या प्रमाणात असल्याने वृत्तवाहिन्यांकडून याबाबत पुरेस्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही.परीणामी हे बदल उमेदवारांपर्यत न पोहोचल्याने हे आंदोलन झाले.
        8 जूलै रोजी पश्चिम बंगालमध्ये पंचायत स्तरावरील निवडणूका झाल्या.या निवडणूका जाहीर झाल्यापासून पुढे महिनाभर पश्चिम बंगालमध्ये राजकीय विरोधकांच्या हत्येचे सत्र सुरु झाले.या हत्यासत्रात भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यातही भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आला‌. काही प्रमाणात तृणमूल 
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा देखील हत्या झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मते विरोधकच आपल्या विरोधात प्रचार करतात यावा,म्हणून या हत्या घडवून आणत आहेत. महिनाभर चाललेल्या या निवडणूक प्रचारात सुमारे पाच हजार राजकीय कार्यकर्त्यांचा हत्या करण्यात आल्या.
    या वर्षातील मोठे हिंसक आंदोलन म्हणुन मणिपूर येथील आंदोलनाचा विचार करावा लागेल.मणीपूरमध्ये गेल्या कित्येक  वर्षांपासून मागणी करण्यात येणाऱ्या मैतेई समाजघटकाला अनूसुचित जमातीचा दर्जा देण्याचा मागणीवर मणिपूर उच्च न्यायालनाने राज्य सरकारला राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे निर्देश दिल्यावर मणिपूर पेटले. विरोधी समाज घटकाला लक्ष्य करत त्यांची घरे मालमत्ता जाळणे, त्यांची हत्या करणे आदी कृत्यांमुळे मणिपुर पेटण्यास सुरवात झाली.आंदोलकांंची मजल मणिपूर येथील खासदार असलेल्या आणि केंद्रात परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री असलेल्या राजकुमार रंजन सिंग
 यांचे घर पेटवण्यापर्यत गेली ‌आज हा मजकूर लिहीत असताना (24डिसेंबर) मणिपूर मध्ये परिस्थिती काहीसी नियंत्रणात आहे‌
एकंदरीत हे सरते वर्ष भारतासाठी काहीसे त्रासदायक गेले असेच म्हणावे लागेल.

सरत्या वर्षात जगभरात काय घडामोडी घडल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_23.html

सरत्या वर्षात भारतीयांना अनुभवायास आलेल्या नैराश्याचे चिंतनाचे अभिमानाचे आनंदाच्या क्षणविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_53.html

सरत्या वर्षात भारताचा जागतिक परिषदेत कसा सहभाग होता हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_22.html

मावळत्या वर्षात भारतात काय काय नैसर्गिक आपत्ती आल्या हे जाणून घेण्यासाठी [पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_66.html

मावळत्या वर्षात भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काय बदल झाले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_20.html

मावळत्या वर्षात वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशांचे राजनैतिक संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_19.html 

सरत्या वर्षात भारताच्या क्रीडाविश्वात काय काय घडामोडी झाल्या हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/blog-post_18.html

सरत्या वर्षात भारताचे सार्क देश वगळून जगातील अन्य देशांशी राजनॆतिक संबंध कसे राहिले हे समजण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html

 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?