नाशिककरांसाठी क्षण हा अभिमानाचा !


  नाशिकने देशाला अनेक रत्ने दिली आहेत.आज अब्जावधींची व्यवसाय झालेल्या बॉलीवूडची उभारणी करणारे दादासाहेब फाळके, ब्रिटीशांना धडकी भरवणारे ज्येष्ठ  क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर सावरकर, उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी,,ही त्यातील काही महत्त्वाची नावे.आता या नावात अजून एक नाव समाविष्ट झाले आहे.ते म्हणजे  सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे नाव.        
         बुद्धीबळ विश्वात जागतिक स्तरावर अत्यंत मानाचे जवळपास पहिल्या क्रमाचे मानाचे समजले  जाणाऱ्या "न्यू इन चेस या नियतकालीकाच्या, मुखपृष्ठावर सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. आतापर्यंत न्यू इन चेस या नियतकालिकांमध्ये ज्यांचा फोटो मुखपृष्ठावर प्रसिद्ध होतो,अस्या खेळाडुने भविष्यात विश्वविजेते पदाला गवसणी घातण्याचा इतिहास आहे‌.तो बघता नाशिकचे भुमीपुत्र असलेले सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे भावी विश्वविजेते आहेत,हे सुर्याप्रकाश्याइतके स्पष्ट आहे, आणि असा खेळाडू आपल्या नाशिक शहरात राहतो ही समस्त नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.
   गेल्या काही वर्षांपासून बघता विदित गुजराथी यांचा खेळ उत्तरोत्तर अधिक बहरत गेला असल्याचे आपणास दिसून येते.त्यांचा नेतृत्वात भारताने दोनदा बुद्धीबळ ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे.अनेक बुद्धीबळपटु खेळताना जी चाल टाळतात अस्या राज्याचा बाजूकडील उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून त्यांनी अनेकदा विजयश्री मिळवली आहे.खेळात अत्यंत मोक्याच्या क्षणी, ज्या स्थितीत अनेक बुद्धीबळपटु प्रचंड तणाव अनुभवतील अस्या स्थितीत देखील अत्यंत शांतपणे परीस्थितीचा कोणताही दबाव न घेता आकर्षक लक्षवेधी खेळी करण्यात विदित गुजराथी यांचा हात अन्य कोणी धरुच शकणार नाही.असी सध्याची स्थिती आहे.विदीत सध्या
आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांचा विविध स्पर्धेतील खेळ बघून दिसून येत आहे.त्यांनी पाच वेळचा विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कार्लसनवर दोनदा मात केली आहे.तर सध्या सुरु असलेल्या टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धेत विद्यमान बुद्धिबळ विश्वविजेता डिंग लारेन यांच्या समवेत खेळलेल्या डावात बरोबरी करत आपण भविष्यात विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत, हे स्पष्ट केले आहे विदित यांनी ग्रँडस्विस स्पर्धा जिंकून कँडीडेट स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केलीच आहे.कँडीडेट स्पर्धा जगातील अव्वल अस्या ८ बुद्धीबळ खेळाडूंमध्ये होते.त्यातील विजेता विद्यमान विश्वविजेत्यास नवीन विश्वविजेता होण्यासाठी आव्हान देतो हे आपण लक्षात घेतला हवे .आकर्षक वाटतील अस्या चाली करत खेळात रंगत आणणे हे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्या खेळाचे वैशिष्ट्य.त्यांचा या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचा खेळ बघणे ,हा दर्शकांना एक वेगळाच आनंद देणारा क्षण असतो.लेखाच्या सुरवातीलाच सांगितले तसे गेल्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने आश्वासक खेळ करत त्यांनी आपला दर्जा काय हे दाखवून दिले आहेत.
       विदित आता २९वर्षाचे आहेत.सध्या विविध स्पर्धांमध्ये ती स्पर्धा गाजविणारे बुद्धीबळ विसीच्या आसपास आहेत.मात्र या वयाचा फरकाचा ,त्यांच्याकडून हरलो तर काय याचा विचार न करता खेळ सर्वोत्तम करण्यावर त्यांचा भर असतो,जो त्यांच्यातील प्रगल्भता दाखवून देतो.आणि असा खेळाडू आपल्या शहरात राहतो,ही नाशिककरांसाठी गौरवाचीच बाब आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?