प्रत्येक पत्रकारांच्या संग्रही असावे असे पुस्तक.., "नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य"

     आपल्याकडे माध्यमांच्या अर्थकारणाच्या बाजू सांगताना, या चार क्षेत्राच्या बातम्यांना नेहमीच प्रेक्षकवर्ग मिळतो. सातत्याने प्रेक्षकवर्ग असल्याने,  जाहिरातीदार नेहमीच या क्षेत्राची बातमी देणाऱ्या माध्यमांकडे जाहिराती देतात.जाहिराती या माध्यमांचा अर्थकारणाचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने, माध्यमे या क्षैत्राची बातमी देण्यास प्राधान्य देतात,असे सांगितले जाते.त्यातील एक म्हणजे राजकारण (अन्य तीन म्हणजे क्रिकेट, सिनेमा, क्राइम {याला यांच्या  सुरवातीच्या अक्षरावरून "थ्री सी वन पी" असे म्हणतात}).तर या राजकारणाचा ठळक आविष्कार म्हणजे खासदार .त्यामुळे कोणत्याही पत्रकारास पत्रकारीता करायची झाल्यास आपल्या क्षेत्रातील विद्यमान खासदार आणि माजी खासदारांची किमान माहिती असणे आवश्यक ठरते.याची माहिती सहजतेने मिळत नसल्याने, कोणत्याही पत्रकारास  सुरवातीच्या काळात अनेक कष्ट घ्यावे लागतात. मात्र नाशिक परिसरातील पत्रकारांची यातुन मोठ्या प्रमाणात सुटका झाली आहे.याला कारण ठरले आहे, डांग सेवा मंडळाच्या अभोणा येथील महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ .प्रा.प्रदीप देशपांडे यांनी या संदर्भात लिहलेले आणि जळगावच्या प्रशांत पब्लिकेशन या प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक. सुमारे ३६०पानांच्या या पुस्तकात, १९५२ ते २०१८ पर्यंतच्या नाशिक जिल्ह्यातील खासदारांची माहिती देण्यात आली आहे.सध्या जरी २०२४ साल सुरू असले तरी पुस्तक २०१८साली लिहले गेलेले असल्याने, तो पर्यतचीच माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.मी जे नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था, सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्या सहकार्याने वाचले‌
       पुस्तकाचे लेखन 25वर्ष राज्यशास्त्राचे अध्ययन करणाऱ्या, अनुभवी प्राध्यापकाने केलेले असल्याने, पुस्तक अभ्यासपूर्ण झाले आहे. पुस्तकात नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघ ,2009 पुर्वीचा मालेगाव मतदारसंघ तर 2009साली मतदारसंघाचे पुनर्गठन झाल्यानंतर अस्तित्वात  आलेल्या दिंडोरी मतदार संघ ,तसेच सध्या धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण,(सटाणा) आणि मालेगाव जिल्ह्याचा विचार करुन धुळे मतदार संघातील खासदारांची ओळख करून देण्यात आली आहे. धूळे लोकसभा मतदारसंघातील खासदारांची ओळख करून देताना त्यात बागलाण आणि मालेगाव तालूक्याचा समावेश झाल्यानंतरच्या काळातील खासदारांची माहिती देण्यात आलेली आहे.बागलाण आणि मालेगाव तालूक्याचा समावेश नसतानाच्या काळातील खासदारांची ओळख करून देण्यात आलेली नाही, हे आपण पुस्तक वाचण्याचा आधी माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे.
     पुस्तक दोन भागात विभागले असून पहिल्या भागात जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, भौगोलिक या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागात प्रकरणनिहाय प्रत्येक खासदारांची ओळख करुन देण्यात आलेली आहे.प्रत्येक खासदारावर एक, एक प्रकरण आहे. अनेकांना खासदार म्हटले की फक्त लोकसभेचे खासदार आठवतात.मात्र सदर पुस्तकात लोकसभेबरोबर जिल्हाशी या न त्या कारणाने संबंध आलेल्या राज्यसभा खासदारांची देखील ओळख करून देण्यात आली आहे.तसेच संसदेचे सदस्य नसलेल्या मात्र भारतीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेल्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे.
     या पुस्तकात खासदारांची ओळख करुन देताना सुरवातीलाच त्यांचे संपूर्ण नाव अन्य कौंटुबिक माहिती, संपर्क पत्ता, आणि त्यांनी भुषवलेली विविध पदे यांची तक्ता स्वरुपात माहिती देवून या तक्त्यापुढे त्यांचा राजकीय प्रवास सांगितला आहे.राजकीय प्रवास सांगताना ही माहिती सहजसोप्या सर्वसामान्य जनतेला चटकन समजेल,अस्या स्वरुपात सांगितली आहे उगीचच पांडित्य दाखवण्याची सवय अनेक लेखकांना असते,मात्र याचा लवलेश देखील या पुस्तकात आढळतो नाही.
       पुस्तक जरी पत्रकारांना अधिक उपयोगी पडत असले तरी, सध्याचे लोकसभा निवडणूकीचे वातावरण बघता आपण ज्या पदासाठी व्यक्तीला निवडून देणार आहोत,त्या पदावर आतापर्यंत कोणकोणत्या व्यक्ती, येवून गेल्या?, या व्यक्तींची सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी  काय ,होती ?  त्यांनी  आपल्या परिसरात काय सुधारणा केल्या?याची माहिती मिळाल्यास आपणास लोकसभा निवडणूकीत योग्य खासदार पाठवणे सोपे होईल, म्हणून पत्रकार नसलेल्या व्यक्तीने देखील सदर पुस्तक वाचायलाच हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?