आपली राजकीय समज प्रगल्भ करणारे पुस्तक,"हिंदूत्व,बंधूत्व आणि नरेंद्र मोदी"

सध्या आपल्या भारतात लोकसभा निवडणूकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिकाधिक गरम होत आहे.हा मजकुर लिहण्यापर्यत देशात आचारसंहिता लागू नसली तरी ती कधीही लागू शकते.कदाचित आपण हा मजकुर वाचेपर्यंत ती लागू झालेली असू शकते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर तर राजकीय वातावरण अधिकच रंगेल.अस्या या  काळात २१०देशांच्या या जगात, जगातील सर्वात मोठी असलेल्या लोकशाहीतील जवाबदार नागरीक म्हणून आपणास राजकीय पक्षांची पुर्ण समज असणे अत्यावश्यक ठरते.सत्ताधिकारी पक्षातर्फे करण्यात आलेली विकासकामे आपणास प्रत्यक्ष दिसत असली तरी, त्या पक्षाची विचारधारा काय आहे?याची आपणास माहिती मिळाल्यास आपण अधिक जागरुकपणे मतदान करु शकतो‌.मात्र या काळात माध्यमे पेड न्युज अधिकाधिक दाखवत असल्याने त्यातून योग्य ती माहिती मिळेलच ,यांची काही श्वास्वती नाही, त्यामुळे या काळात या विषयी लिहलेल्या पुस्तकाचच आपणास आधार घ्यावा लागतो‌, आणि आपली ही गरज पुर्ण होते,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लिहलेले आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित "हिंदूत्व, बंधुत्व , नरेंद्र मोदी हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सर्वात जूनी सांस्कृतिक संस्था सावानाच्या मदतीने वाचले.
पंतप्रधान मोदींचा ग्रोधा ते पंतप्रधान विकास मानायचा? मोदींचे हिंदुत्व खरचं भारतीयांचं परिवर्तित झालंय का? मोदी मॉडेल आणि भागवत मॉडेल यातील सुक्ष्म संघर्ष
कोणता? हिंदूत्ववादी मोदींचा ओठी परदेशातच गांधी आणि बुद्धाचे नाव जास्त वेळा का असते? मोदींचे परराष्ट्र धोरण पंडित नेहरूंच्या वारस्यातच समृध्द झाले आहे का? संघाचे हिंदूत्व सर्वमान्य आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूत्व आणि संघाचे हिंदुत्व एकच आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील विचारांची लढाई म्हणजे नक्की काय? लोकशाहीतील एक महत्त्वाचे तत्त्व असलेल्या 'बंधुता'  याविषयीची सद्य स्थिती काय आहे?मुळात "बंधुता " म्हणजे काय ? अस्या अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे सदर पुस्तक होय.
176पानाच्या या पुस्तकात 3भाग आहेत. पहिला भाग म्हणजे हिंदुत्व.या भागात 4 प्रकरणे असून यात पुस्तकांची ओळख तसेच संघाचे हिंदूत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूत्व यातील फरक आणि या दोन्हींचे डॉ.आंबेडकर यांच्या विचारधारेशी असणारे नाते.यावर प्रकाश टाकला आहे.या भागात या संकल्पनांचे टीकात्मक विश्लेषण केलेले आढळते.दुसरा भाग म्हणजे बंधूत्व.बंधुत्व या भागात ही संकल्पना मुळात काय आहे?तिचे स्वरुप आणि आवश्यकता,तसेच ती कशी लागू होते?कोणाला ती लागू होते? जगभरात तिची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होते?याबाबत तीन प्रकरणात सांगण्यात आले आहे.पुस्तकाचा तिसरा भाग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या लेखांचा आहे.11प्रकरणाच्या या भागात सरसंघचालक मोहन भागवत आणि  नरेंद्र मोदी यांच्या हिंदूत्वातील फरक, पंतप्रधान मोदी यांनी विकासाच्या मुद्यावर मागितलेली मते,संघाला काहीसे अप्रिय असणाऱ्या महात्मा गांधी यांचा आपल्या परदेशातील दौर्यादरम्यान सातत्याने उल्लेख का करतात, तसेच परदेशी नेत्यांना आपले पुज्यनीय हेडगावकर,गोवळकर श्री गुरुजी यांच्या समाधीच्या ठिकाणी न नेता महात्मा गांधींच्या समाधीस्थळीच का नेतात? या वरुन पंतप्रधान मोदी कशी भारताची प्रतिमा जपतात? या सारख्या मुद्यावर चर्चा केली आहे.
      आपण कोणत्याही विचारसरणीचे असो आपल्याला विरोधी विचारसरणी माहिती असणे समाजात आपले व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी आवश्यक असते.तसेच आपल्या विचारसरणीची इत्यंभुत माहिती असणे विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आवश्यक आहे.त्यामुळे आपण कोणत्याही विचारसरणीचे असो,आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?